Tikhat Shev Recipe Barik Diwali Besan Sev in Marathi
दिवाळीसाठी लागणारी बेसनाची तिखट कुरकुरीत अशी शेव जिभेवर ठेवायच्या आधीच भरपूर जणांच्या तोंडाला पाणी सुटते. काय करणार हा पदार्थ आहेच असा. कारण एकता जरी खाल्ला तरी तो त्याची अनोखी चव जिभेवर रेंगाळत ठेवू शकतो आणि एखाद्या भाजीत, भेळेत किंवा पोह्यावर जरी वापरला तरी तो त्याच्या चवीला चार चांद लावून टाकतो. पण असे होण्यासाठी तुमची शेव खुसखुशीत झाली पाहिजे आणि तिला हवाहवासा वाटणार तिखट पण आलं पाहिजे. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत शेव रेसिपी. चला तर मग पाहूया हि पाककृती.
शेव साहित्य
1 किलोग्रॅम बेसनाचे पीठ 3/4 कप तांदळाचे पीठ,
2 चमचे ओव्याची पूड,
मीठ चवीप्रमाणे,
4 चमचे लाल तिखट (आवडीप्रमाणे)
1/2 कप तेलाचे मोहन (थोडे उकळलेले तेल)
आवश्यकतेप्रमाणे पाणी
तेल तळण्यासाठी (आवश्यकतेप्रमाणे)
2 चमचे हळद
Tikhat Shev Recipe Barik Diwali Besan Sev in Marathi

कृती
सर्वप्रथम परातीमध्ये बेसनाचे पीठ चाळून घ्यावे. म्हणजे जेणेकरून त्याच्या गाठी राहणार नाही. नंतर एका बाजूला 1/2 कप तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून द्यावे. तेल गरम होईपर्यंत बेसनाच्या पिठामध्ये ओव्याची पूड मीठ चवीप्रमाणे, लाल तिखट,हळद घालून घ्यावी. त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ घालावे. व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
त्यानंतर त्या पिठामध्ये गरम झालेले तेलाचे मोहन ओतावे थोडेसे गरम असतानाच पीठ एकत्र करावे म्हणजे जेणेकरून ते एकजीव होईल. व त्याच्या गाठी राहणार नाही.
थोडे थोडे पाणी पिठामध्ये घालून ते व्यवस्थित मळून घ्यावे. पीठ जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट ही नको. थोडा तेलाचा हात लावून पीठाला एकजीव मळून घ्यावे.
शेव करताना हाताला व सोऱ्याला व्यवस्थितपणे तेल लावावे जेणेकरून पीठ हाताला व सोऱ्याला चिकटणार नाही. थोडा गोळा घेऊन तो शेवयाच्या सोरात टाकावा आणि सोऱ्याचे तोंड बंद करावे
Tikhat Shev Recipe Barik Diwali Besan Sev in Marathi
कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. तेल गरम झाले की गॅस मंद आचेवर ठेवावा. भरलेल्या सूर्यातून बारीक शेव तेलामध्ये पाडावी.
शेव करताना कढई मध्ये सोऱ्या गोल फिरवावा म्हणजे शेवचा आकार गोली येईल. दोन मिनिट शेव कढईमध्ये व्यवस्थित तळून घ्यावी.
अशा पद्धतीने सगळे शेवाचे वेढे तळून घ्यावे. खमंग कुरकुरीत अशी शेव तयार झाली आहे.
स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.
पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.