Shikshak Din 5 September Kavita

गुरू मित्र आणि शिक्षक असावा असा | 2 Best Poem Shikshak Din 5 September

छाया प्रवीण नाळे (भुजबळ) आणि सौ. शुभांगी सुभाष धुमाळ -रानवडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem Shikshak Din 5 September विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

गुरु मित्र Shikshak Din 5 September Kavita

काव्यबंध आयोजित साप्ताहिक कविता स्पर्धा
दिनांक-24/8/2023
विषय-शिक्षक दिन
शीर्षक- गुरु मित्र

गुरु मित्र Shikshak Din 5 September Kavita

गुरु तुम्ही आमचे
आहात हे खरे
मित्रच त्यापेक्षा
वाटलात बरे ..

मार्गदर्शन ते योग्य
केले आम्हाला
यशाची दारे खुली ती ..
केली सर्वांना

सतत राहावे आनंदी
तुम्ही दिली शिकवण
जाण्यास योग्य मार्गी
दाखवले ते वळण

सचोटी कणखरते सवे
मायेची उब दिली
कठोर होऊन कधी कधी
सत्यता ती दाखवली

सुखदुःखांच्या नावे सवे
संकल्पाची दीक्षा दिली
सरस्वती सवे जगण्याची
वाट ती खुली केली

सांगण्यास योग्य ज्ञान
गुरू लाभले छान
जीवनात आम्ही खरंच
ठेवून योग्य भान

चार शब्द मोलाचे
तुम्ही ते दिले
घडण्यास ते पुढे योग्य
शिक्षण दिले

मातीशी ओलावा जपण्याचा
तुमचा अनमोल ठेवा
स्वच्छंदी पण आनंदी
राहा गुरु देवा

जगण्यातील सार्थकता
निर्भय, खंबीरता
आत्मविश्वासाची किल्ली
समानते सवे दिली

आता द्या आशीर्वाद
पुढे आम्हा जाताना
आठवण येईल सतत
आयुष्यात काही करताना…🙏

छाया प्रवीण नाळे (भुजबळ)
सातारा(दहिवडी)

शिक्षक असावा असा Shikshak Din 5 September Kavita

काव्यबंध समूह …आम्ही मराठी भाषेचे शिल्पकार
गुरूवार काव्यलतिका स्पर्धा
दिनांक : २४/०८/२०२३
विषय : शिक्षक दिन
शीर्षक : शिक्षक असावा असा

शिक्षक असावा असा Shikshak Din 5 September Kavita

शिक्षक असावा असा
विद्यार्थ्यांना समजून घेणारा..
अभ्यासा बरोबरच
शिस्तीचे धडे देणारा..

शिक्षक असावा असा
विद्यार्थ्यांवर निस्वार्थ प्रेम करणारा…
प्रेम म्हणजे काय?
हे समजावून सांगणारा….

शिक्षक असावा असा
नजरेचा धाक देणारा….
मला हे पटले नाही
हे डोळ्यातून दाखविणारा….

शिक्षक असावा असा
अभ्यासाचे धडे देणारा…
विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना
सतत वाव देणारा..

शिक्षक असावा असा
विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा…
आपुलकी व जिव्हाळ्याने
प्रत्येकाला बोलता करणारा…

शिक्षक असावा असा
प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ देणारा…
वेळेचे महत्व सदोदित
पटवून देणारा….

शिक्षक असावा असा
निरपेक्ष मूल्यमापन करणारा…
विद्यार्थ्यांच्या गुणांचे
परीक्षण करणारा…

शिक्षक असावा असा
समानतेची वागणूक देणारा…
प्रत्येक विद्यार्थ्याला नीति, मूल्याचे
धडे देणारा…

शिक्षक असावा असा
विद्यार्थ्यांना सतत प्रिय वाटणारा..
आपलेपणाची जाणीव
निर्माण करून देणारा…

शिक्षक असावा असा
न्याय, नीति, शिस्त, हुशारी, चांगुलपणाने भरलेला…
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात
मोलाचा वाटा उचललेला…

सौ. शुभांगी सुभाष धुमाळ -रानवडे
उरूळीकांचन, पुणे.

shikshak din 5 september

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

1 thought on “गुरू मित्र आणि शिक्षक असावा असा | 2 Best Poem Shikshak Din 5 September”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
8 − 2 =