Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरू ज्ञान, गुरू आणि शिक्षक | 3 Best Shikshak Din Bhashan Marathi Kavita

सौ. पल्लवी गरूडे, नारायण गणपती हुलवान आणि वंदना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Bhashan Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरू ज्ञान Shikshak Din Marathi Kavita

गुरू ज्ञान Shikshak Din Marathi Kavita

असही एक गुरू ज्ञान असतं…
जे नि:शब्दपणे बोलत असतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे मुक्तपणे पाठिंबा देत राहतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे आनंदाने बहरून येतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे मायेच्या उबेत घट्ट धरून ठेवतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
ज्याच्या स्पर्शाने अंतरंग खुलतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे जाणिवांच्या संवेदनांपलिकडे नेतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे समईच्या ज्योतीसारखं अखंड तेवत राहतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे अंतर्मनाला स्पर्शून दिव्यत्वाला नेतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे परिघाच्या पूर्णत्वाला पोहोचवतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे समुद्रासारखं विस्तीर्ण,
आकाशासारखं निरभ्र, आणि
जमिनीसारखं अचल असतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे चैतन्याच्या मुळाशी सापडतं


असही एक गुरू ज्ञान असतं…
जे ऐलतिरी पैलतीर साधतं.

सौ.पल्लवी हर्षद गरुडे

Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरु Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरु Shikshak Din Bhashan Marathi Kavita

जन्म झाला,
बालपण झाले सुरु,
आयुष्यात आला,
भविष्य घडवणारा गुरु.

आयुष्याचा ग, म, भ, न,
गुरुनं आमच्या शिकवलं,
बाजारात जे विकलं जातं,
व्यक्तिमत्वात आमच्या पिकवलं.

विद्येच्या मंदिरातील,
पुजारी तो सरस्वतीचा,
जीवनरथ चालवणारा,
वेग तो प्रगतीचा.

ज्ञानगंगेत पोहणारा,
शारदेचा वंश तो,
अज्ञान अंधार घालवणारा,
प्रखर सूर्याचा अंश तो.

विचारांचा सागर तो,
कधी न लागणारा थांग,
उपकाराचा डोंगर तो,
कसं फेडायचं त्याचं पांग.

यशाच्या आकाशी भरारी घेता,
जमिनीवर पाय त्यांने टिकवलं,
अपयश पदरी पडता आमच्या,
उभारी घ्यायला शिकवलं.

उज्वल आमचे भविष्य घडवणे,
हाच त्याचा ध्यास सदैव,
सहवास त्याचा लाभला आम्हा,
मोठे आमचे हेच सुदैव.

झिजून स्वतः सुगंध देणारा,
जीवनातील आमच्या तो चंदन,
जीवात जीव असेतोवर,
विनम्र त्यास आमचे वंदन.

नारायण गणपती हुलवान, मिरज.

shikshak din bhashan marathi kavita

शिक्षक Shikshak Din Bhashan Marathi Kavita

गुरू ज्ञान, गुरू आणि शिक्षक | 3 Best Shikshak Din Bhashan Marathi Kavita


गुरु घेवुनी माझा भार
शिकविती पोटतिडिकीने फार


गुरुजी आमचे सुविचारी
जीवनातील संकट मार्ग काढूनी तारी


समंजस,प्रामाणिक आणि आनंदी
मुले बनती अध्ययनात छंदी
शिक्षक आमुचे अभ्यासू,
मुले बनती जिज्ञासू


शिस्त त्यांना किती हो प्रिय
परोपकारी असे ही वृत्ती
समाजप्रिय ही त्यांची कृती


साधा हा किती हो असे
पण आता झाला डिजिटल
तरीही समाजात रमणे हाच कल


संकटे आली कितीही,तरीही दुरावला नाही मूलांपासूनी
मुलांचे आरोग्य खेळण्याशी जोडले
हे मनोमन जाणूनी ,स्वता झाले खिलाडू ही
शिक्षणाचा घेवूनी वसा
अज्ञानावर उमटवला ठसा


शिक्षक नसते या जगती
नसती ठावे आम्हां महती
गुरुशिवाय ज्ञान नाही
गुरुशिवाय मान नाही


गुरुवीण माझे अंधकार जीवन
अन् गुरुमूळेच प्रकाशमय मम जीवन
गुरुसाठीच आयुष्यातील क्षण न् क्षण
कितीही लिहिले तरी अपूर्ण हे मन

श्रीमती वंदना कुलकर्णी

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *