Shikshak Din Image

सलाम आणि भवसागर | 2 Best Shikshak Din Image Kavita

दीपा दामले आणि प्रा.शरदचंद्र काकडे देशमुख यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Image Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

सलाम | Shikshak Din Image Kavita

काव्यलतिका स्पर्धेसाठी
दिनांक: 24/08/2023
विषय: शिक्षक दिन
शीर्षक: सलाम

सलाम | Shikshak Din Image Kavita

सलाम आमुचा घ्यावा गुरुजी, त्रिवार आमुचा सलाम
उजळून उषा ज्ञानाची केले अज्ञानाचे काम तमाम

मिट्ट अडाणी काळोखातले जगणे दबले पिचलेले
शाप जणू पिढ्या पिढ्यांना असणे लाचार मिंधे गुलाम

गंध नव्हता आम्हास माहीत पुस्तकांतील अक्षरांचा
नशिबी आम्हा मोलमजुरी हातांना या कसला आराम

घट्टे पडल्या लहानग्या हाती जेंव्हा दिली तुम्ही लेखणी
उधळले चौखूर स्वप्नांचे वारू दशदिशांत बेफाम

शिकवली आम्हा रीत जगण्याची ठेवत ताठ ही मान
नि क्षाळून ज्ञानगंगेत तुम्ही केला गोट्यांचा शाळिग्राम

पोलादाचा कणा दिला अन् दिली हाती क्रांतीची मशाल
शब्द धीराचा देई आणि लढण्या जीवन संग्राम

दीपस्तंभ जणू बनून तुम्ही मार्ग दाखविला सत्याचा
तत्त्वनिष्ठ आचरून सदा धिक्कारला तुम्ही मार्ग वाम

दिले तुम्ही हाती भरकटल्या आयुष्याचे ध्येय लगाम
शिक्षक दिनी स्मरून तुम्हाला करतो त्रिवार सलाम

दीपा दामले
बोरिवली, मुंबई

भवसागर | Shikshak Din Image Kavita

काव्यबंध समूह
आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार
.. काव्यलतिका
… स्पर्धेसाठी
विषय. शिक्षकदिन
दि. २४ /८ /२०२४
शीर्षक….. भवसागर

भवसागर | Shikshak Din Image Kavita

ज्ञानदाता सफलजीवन दर्शक
सामान्य नव्हे हे तर कल्पतरु
आला डॉ.सर्वपल्लींचा जन्म दिवस
चला शिक्षक दिन साजरा करु ।।१।।

भरकटलेल्या आम्हा वाटसरुंना
योग्य दिशेला घेऊन जातो गुरु
प्रगट करण्यासाठी आदरभाव
चला शिक्षकदिन साजरा करु ।।२।।

खाचखळगे काटयाकुटयांचा मार्ग
दिला पुष्पमार्ग ज्यांनी त्यांना स्मरु
अंधश्रद्धा त्यागून विज्ञान दिले गुरुंनी,
चला शिक्षक दिन साजरा करु ।।३।।

गुरु आयुष्य फुलवणारा तपस्वी
सहवासात जाऊनी ज्ञानाची ओंजळ भरु
ऋण फेडण्यासाठी आदरभावे
चला शिक्षकदिन साजरा करु।।४ ।।

कदापि नसतो दुजाभाव असते फक्त ज्ञान
सामील होवूनी आपण ज्ञानाची कास धरु
श्रद्धा भक्ती टाकू ओवाळून
चला शिक्षक दिन साजरा करु।।5 ।।

दिला सन्मार्ग ज्योतिबा सावित्रीने
घेऊ आदर्श तरच भवसागर तरु
पहाट पहावयाची आहे प्रगतीची
चला शिक्षक दिन साजरा करु।।६।।

जर लाभला अखंड सहवास गुरुंचा
भाग्यवान आमच्या सारखे आम्हीच ठरु
राजहंसासम प्राशून फक्त दूध
चला शिक्षकदिन साजरा करु।।७।।

प्रा.शरदचंद्र काकडे देशमुख
पुरंदर .पुणें.

Shikshak Din Image Kavita

shikshak din image

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
38 ⁄ 19 =