Shikshak Din Images in Marathi Kavita

करू गुरुजींचा सन्मान आणि शिक्षक म्हणजे | 2 Best Shikshak Din Images in Marathi Kavita

वीणा.पाटील कोल्हापूर आणि कु. कशमीरा उल्हास गुप्ते यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Images in Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

करू गुरुजींचा सन्मान Shikshak Din Images in Marathi Kavita

काव्यबंध समुह काव्य लतिका
24/8/2023
,विषय….शिक्षक दिन
शीर्षक..करू गुरूजींचा सन्मान

करू गुरुजींचा सन्मान Shikshak Din Images in Marathi Kavita

अ,आ, इ, ई शिकलो शाळेत जाऊन
आज आठवण होता मज वाटते
गुरूजींचा धाक केवढा होता आम्हास
म्हणून तर हे दिवस पहायला मिळते..

होते आमचे गुरुजी खूप कडक
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
किती घ्यायच्या छडीवर छडी हातावर
डोळ्यातून पाणी झरझर वहायचे एकदम..

शिकवायचे गुरूजी अगदी जीव ओतून
प्रत्येका कडे जातीने लक्ष देऊन
त्यांची तळमळ किती असे मनापासून
खूप अभिमान वाटतो त्यांचा म्हणून..

कधी कधी चिडून वैतागून गुरूजी
काढायचे चिमटे आमच्या पोटास
गृहपाठ केला नसेल तर मग काय
सांगणार बाकावर उभे रहाण्यास…

गुरूजी म्हणजे आमची गुरूमाऊली
त्यांच्यामुळेच आम्हास मिळाले ज्ञान
आमच्या जीवनात त्यांचे मोलाचे स्थान
कसे सांगू केवढे त्यांचे कर्तृत्व महान…

आज त्यांच्याच परिश्रमामुळे कितीतरी
कुणी डाॅक्टर इंजीनिअर,झाले आहेत
विद्यार्थ्यां बद्दलची कळकळ आत्मीयता
बघता सारे श्रेय गूरूजीनाच द्याया हवेत….

शिक्षकच घडवती मुलांचे जीवन
गुरूमाऊलीचे कार्यच आहे महान
शिक्षक दिन धरू त्यांचे चरण
त्यांचा करू नित्य मानसन्मान….

वीणा.पाटील कोल्हापूर
पिनकोड…416006

शिक्षक म्हणजे | Shikshak Din Images in Marathi Kavita

काव्यबंध समूह
काव्यलतिका
स्पर्धा
विषय.शिक्षक दिन
शिर्षक. शिक्षक म्हणजे?
दिनांक.२४/०८/२०२३

शिक्षक म्हणजे | Shikshak Din Images in Marathi Kavita

शिक्षक म्हणजे अशी
व्यक्ती जी जीवनाला
आकार उकार शब्द
उचारायला शिकवते .१

जी समूहात काय
करावे व काय नाही
हे समजावते
ती आपल्याला आपल्याशी
ओळख करून देते . २

आपल्याशी संवाद साधते
मन मोकळे करून देते
शिक्षकांशी नाते हे वेगळे
काहीसे इंद्रधनुष्य खेळणे.३

कधी होई सौम्य रुप
कधी घेई रौद्र रूप
शिकवील चांगलाच धडा
पाठच करुन घेई पाढा.४

आडवा तिकडा असेल विद्यार्थी
सरळ साधा करी शिक्षक
कोण कुठला तू रे ? न विचारे
भेदभाव न करी.५

आयुष्याच्या टप्प्यात वेळोवेळी
मार्गदर्शन करी शिक्षक जरी
संवादात संवाद साधे
एक कल्पतरू तयार करी.६

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या
आयुष्याचा भावी शिल्पकार:
५ सप्टेंबर शिक्षक दिन
साजरा करी जगभर.७

नाव:- कु. कशमीरा उल्हास गुप्ते
डोंबिवली पश्चिम

shikshak din images in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
28 ⁄ 2 =