विजया गोरे आणि गजानन दशरथ पोटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Images in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गुरुमहिमा | Shikshak Din Images in Marathi
काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धा
दि.24.08.23
विषय – शिक्षक दिन
शीर्षक – गुरुमहिमा

मूल असते मातीचा गोळा
आई देते त्याला आकार
अक्षरे गिरवत शिकवताना
गुरु करतात ज्ञानाचे संस्कार
शिक्षक म्हणजे गुरु थोर
पुढे चालवी ज्ञानवारसा
अंधारात अवतरावा जसा
लख्ख प्रकाशाचा कवडसा
गुरु ब्रह्मा ,गुरु हे विष्णू
महेशही असती गुरु
वंदन त्यांना नित्य करावे
सुसंस्काराची कास धरू
घडवितो विश्वाचे दर्शन
उपदेशाचे पदरी दान
ज्ञानयज्ञ हा अखंड चालू
पडत नाही कसली वाण
अनुसरावे सदा गुरुसी
गुरु तर असे आत्मा
ठसा उमटवूनी कार्याचा
शिष्यांसाठी ठरे परमात्मा
हात हाती धरून गुरुजी
लावतात अक्षरांचा लळा
प्रगतीच्या खुल्या होतात वाटा
विसरत नाही कधी शाळा
ज्ञानमंदिर हे खुले सदैव
ज्ञानाचा जिथे मिळेल वसा
माणूस म्हणून इथेच घडतो
उमटत राहतो अमीट ठसा
खाचखळग्यांची अवघड वाट
गुरुच दावी मार्ग खरा
आव्हानांचे पूल ओलांडताना
ढळत नाही तोल जरा
यथोचित करावा गौरव
राखावा गुरुजींचा मान
ज्ञानदीप तेवत ठेवावा
हीच गुरुदक्षिणा त्यांना छान .
विजया गोरे.
सिव्हिल लाइन्स , नागपूर.
440001.
तो शिक्षक असतो | Shikshak Din Images in Marathi
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका काव्य लेखन उपक्रम
विषय: शिक्षक दिन
शीर्षक : तो शिक्षक असतो….

देशाचे भविष्य जो घडवतो
जो चंदनासम झिजतो
ज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवतो
जो ज्ञानदान करतो तो शिक्षक असतो ||
भेदभाव त्याच्या मनी नसतो
सुंदर ज्ञानाची बाग तो फुलवतो
निरागस बालकांवर माया करतो
बाल उद्यानात रमणारा शिक्षक असतो ||
आपल दुःख, राग सारं विसरून
कर्तव्यावर हसत मुख असतो
सदैव करत असतो ज्ञानदान
पथदर्शक म्हणून पथ दाखवितो||
अज्ञानातून ज्ञानाचा प्रकाश दाखवी
संस्कारक्षम पिढी तो घडवी
पाखरांना उडण्याचे बळ देई
शिक्षक शिष्याची नाव पैलतीरी नेई||
तो शिक्षकच असतो जगाला वर्गात आणतो
तो शिक्षकच असतो जो जगणे शिकवतो
सार्या विद्यार्थ्यांचा तो मार्गदर्शक असतो
तो शिक्षक असतो जो देश घडवतो ||
होतो तो कधी नेता
कधी बनतो तो अभिनेता
विद्यार्थ्यांचा तो असतो आवडता
शिक्षकच नवी मूल्ये मनी रुजवतात ||
अवघड वाटेवर चालणं शिकवी
योग्य वाट तो दाखवी
एकतेचा भाव मनी जागवी
शिक्षक जागवी मनी चेतना नवी ||
संशोधक, लेखक,गायक
कधी खेळाडू, कधी जादूगार
शिक्षक असतात करामती फार
तो शिक्षकच असतो किमया करणारा किमयागार ||
गजानन दशरथ पोटे
अकोला

shikshak din images in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह