Shikshak Din Kavita Marathi

असे शिक्षक आणि मी पाहिलंय त्यांना | 2 Best Shikshak Din Kavita Marathi

संचित कांबळे आणि डॉ मानसी पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Kavita Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

असे शिक्षक | Shikshak Din Kavita Marathi

काव्यबंध समूह …आम्ही मराठी भाषेचे शिल्पकार …
गुरूवार काव्यलतिका स्पर्धा
दिनांक : २४/०८/२०२३
विषय : शिक्षक दिन
शीर्षक : असे शिक्षक…

असे शिक्षक | Shikshak Din Kavita Marathi

ध्यास असतो नित्य जिवीताचा
ध्यास असतो सत्य कर्माचा
ध्यास तो नव निर्मितीचा
ध्यास तो देश घडविण्याचा …

सुजाण अन् बलशाली भारताचे
स्वप्न ठेऊनी उरी
कमाल करतात ते
भावना सत्कर्माची खरी-खुरी …

कोमल त्या बाल-फुलांना
आपुलकीने कुरवाळतात
त्यांच्या सहज अभिनयाने
सुगंधी मने फुलारतात …

खडू-फळ्याच्या खेळातून
स्वप्नांना पंख देतात
कठोर वाणीने कधी-कधी
हृदय परिवर्तन करतात …

असे ते शिक्षक
जगण्याचे आदर्श असतात
चार-भिंतींच्या आभाळात
नव्या भारताचे क्षितीज घडवितात …

अभियंत्यांचे घडवितातआरेखन
वैद्यांचे समजावतात सूक्ष्म परिक्षण
वकिलांचे बहरवतात वाक् चतुरपण
करूनी मार्गदर्शनाचे सखोल निक्षेपण …

लहान मुलांचे लघुपण शिकतात
मोठ्या मुलांचे नकार शिकतात
सगळ्यांचे आकार-उकार शिकतात
असे शिक्षक स्वत:लाच नवा बनवितात…

केवळ विद्यार्थी कल्याणासाठी
फक्त देश घडविण्यासाठी
सुजाण नागरिक बनविण्यासाठी
जागरूक ते सदैव मानवतेसाठी …

संचित कांबळे
कोल्हापूर

मी पाहिलंय त्यांना | Shikshak Din Kavita Marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दि २४/८/२३
विषय: शिक्षक दिन
मी पाहिलंय त्यांना

मी पाहिलंय त्यांना | Shikshak Din Kavita Marathi

मी पाहिलंय त्यांना
तहान भूक विसरून जगताना
मुलांना तळमळीने शिकवताना
त्यांच्यात संस्कार पेरताना.

मी पाहिलंय त्यांना,
ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देताना
हिऱ्याला पैलू पाडताना
वेळप्रसंगी कान पकडताना

मी पाहिलंय त्यांना,
अस्वस्थपणे येरझाऱ्या घालताना 
न सुटलेलं अवघड गणित 
पुन्हा पुन्हा सोडवतांना.

मी पाहिलय त्यांना,
मुलांच्या अडचणी सोडवतांना
त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहताना
त्यांच्या ऊत्कर्षात आनंदाश्रू ढाळतांना.

मी पाहिलंय त्यांना
अपूर्णतेला पूर्णता देताना
शब्दांनी ज्ञान वाढवताना
जगण्यातून जीवन घडवताना.

मी पाहिलंत त्यांना
तत्व मनापासून जपताना
शिक्षणात नव्या कल्पना आणताना
नाविन्यातून‌ फुले फुलवताना

मी पाहिलंय त्यांना
जगाकडे बघण्या सकारात्मक दृष्टी देताना
पंखांमधे बळ भरताना
त्याची उत्तुंग भरारी बघताना

मी पाहिलंय त्यांना,
भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवताना
नवीन आव्हाने पेलायला शिकवताना
मनात आत्मविश्वास जागवताना

मी पाहिलय त्यांना 
मुलात मूल होऊन हसताना
वर्तमानात असूनसुद्धा 
भूतकाळात  रमताना 

अशा माझ्या शिक्षकांच्या पायाशी
आनंद होतो नतमस्तक होताना
असे गुरू लेणे लाभले म्हणून
शिक्षकदिनी देवाचे आभार मानताना

©️®️ डॉ मानसी पाटील

Shikshak Din Kavita

shikshak din kavita marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

1 thought on “असे शिक्षक आणि मी पाहिलंय त्यांना | 2 Best Shikshak Din Kavita Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
24 + 12 =