Shikshak Din Kavita

माझे गुरुजी आणि बाकी काही नाही मडॅम | 2 Best Shikshak Din Kavita

ऋषिकेश कारभारी आव्हाळे आणि कु. कविता बाळासाहेब आढागळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेतShikshak Din Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

माझे गुरुजी | Shikshak Din Kavita

काव्यबंध समूह आयोजित काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय:- शिक्षक दिन

शीर्षक:माझे गुरुजी

माझे गुरुजी | Shikshak Din Kavita

गुरुजी तुम्ही आहात खूपच महान
तूमच्यामुळे झाले माझे व्यक्तित्व छान
पुस्तकातील धडे देत
आयुष्याचे धडे तुम्ही मला दिले
माझ्या अबोल मनात
ज्ञानाचे अंकुर पेरले
वेळो वेळी त्या अंकुराला
ज्ञानाचे दिले खत
ज्ञानामुळे मिळेल
माझ्या आयुष्याला बरकत


तुमचे काही शब्द
अजून ही आठवतात
संकटात मला योग्य शिकवण देवून जातात
तुमची प्रत्येक शिकवण
राहील माझ्या स्मरणात
तुमची थोडी कमी भासते
आता आयुष्याच्या वळणात
तुम्ही दिली करून
ओळख माझी माझ्या स्वप्नांशी
मी घेतोय झेप आता
स्वप्न पूर्ण करण्याची
तुमची शिकवण आठवते क्षणोक्षणी
तुमचे नाव मोठे कार्याचे ठरवले मनोमनी


यशाची वाट दाखवली
मजला तुम्ही
त्या वाटेवर चालण्याचा
निर्धार केला मी
तुमच्यावर लिहायला
संपतील सारे पाने
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
देवून संपवतो मी माझ्या काव्याचे गाणे


-ऋषीकेश कारभारी आव्हाळे,
छत्रपती संभाजीनगर

बाकी काही नाही मडॅम | Shikshak Din Kavita

काव्यबंध शब्दसमुह
काव्यलतिका कविता स्पर्धा

विषय- शिक्षक दिन
शिर्षक- बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटलं..!

बाकी काही नाही मडॅम | Shikshak Din Kavita

तो शाळेतला पहिला दिवस
आणि,ते रडणं कसलं.
तुम्ही दिलेला तो हातात हात
आणि ,डोळ्यातलं पाणी सुद्धा हसलं.
तुम्ही दिलेली ते प्रेम मनोमनी दाटल.

बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल….
कधी-कधी तो मायेचा उबारा
आणि ,कधी-कधी ती रागावलेली छडी.
आज ही आठवते मायेनं भरवलेली, ती भातण-कडी .
आता तुम्ही जवळ नाही म्हणून एकटं वाटल .

बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…
होती थंडी कुडकुडची तरीही, तुमच्या अंगातल स्वेटर काढून दिल मला.
पोटच्या लेकरापलीकडे तुम्ही जपलं मला, तुमच्यासारख्या शिक्षकरुपी माय मला मिळाल्या.
आणि ,यातूनच सिंधुताई सपकाळ मला कळाल्या,
आता कळालं रुसून माझं फसलं

बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…
तुम्ही अक्षर गिरवता गिरवता , आव्हानांना पेलवनं हि शिकवल.
निराधार ह्या मातीच्या गोळ्याला, तुम्ही मात्र माणूस बनवलं.
शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाच बळ तुम्ही दिलंस,
यातुनच सावित्रीबाई फुले चे शिक्षण मनात साठवल

बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल….
तुमची शाबासकीची थाप पडता पाठिवर ,एक नवी ऊर्जा निर्माण होई.
त्यावेळी वाटे मनामध्ये ह्या स्वप्नांच्या, पलीकडले जाऊन इतिहास घडविण मी.
पण आज तुमच्या शाबासकीच कुठेतरी नवलच वाटल…
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…

कवयित्री:कु .कविता बाळासाहेब आढागळे (अहमदनगर)

Shikshak Din Kavita in Marathi

shikshak din kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
30 ⁄ 15 =