कोमल मेश्राम आणि रजनी घाटुर्ले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Caption विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शिक्षक झाल्यावर कळालं!! Shikshak Din Marathi Caption

काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक:- २४/०८/२०२३
विषय :- शिक्षक दिन
कवितेचे शिर्षक:- शिक्षक
झाल्यावर कळालं!!
शिक्षक झाल्यावर कळालं
आपल्यापासून विद्यार्थ्यांना
किती मिळालं
शाळेतील ते पुस्तकी ज्ञान
कामात आलं का
विद्यार्थ्यांच्या जीवनात
त्याच्यातील एखाद तरी पान I १||
शिक्षक झाल्यावर कळालं
विद्यार्थ्यांना आपल्यापासून काय मिळालं
शाळेच्या व्हरांड्यात आधी
तर्हेतर्हेचे खेळ होत होते
विद्यार्थ्यांना शिकताना आता वर्गातच वेळ होते ||२||
ग्रामीण भागातील शाळा
फक्त शाळा म्हणून राहिल्या
शहरातील शाळा मात्र
आता डिजिटल झाल्या ||३||
गुरुजी सांगा ना सरकारला
आपल्या शाळेचं छत गळतय
मंदिरे बांधण्यात मोदीजी
1800 कोटी गमावतय I ४||
कष्टकरी मायबापाची पोर
पडक्या छतावर शिकतात
खासदार आमदाराची पोर
परदेशातील डिगऱ्या घेतात I५|
आता सगळी मायबाप
आपल्या पोरांना सीबीएसई
शाळेत पाठवतात
कष्टकरी बापाचीच पोर आता
मोजण्या इतपत सरकारी शाळेत येतात I ६||
शिक्षणाची आवड अजूनही
लय आहे गुरुजी पण
पैश्याअभावी अडतंय
उच्च शिक्षण घेता यावं म्हणून
गरीबाची पोर ढसाढसा रडतंय ||७||
हजारो शाळेच्या पडक्या भिंतीन
मरून जातील पोरं गुरुजी
करोडो रुपये खर्चून
मंदिर बांधण्यात व्यस्त आहे मोदीजी ||८||
✒️~ कोमल मेश्राम
शिक्षकास ठरते एक आव्हान Shikshak Din Marathi Caption

काव्यबंध समूह आयोजित
काव्य लतिका
गुरुवारी स्पर्धा
दिनांक 24/ 8 /2023
विषय :शिक्षकदिन
शीर्षक: शिक्षकास ठरते एक आव्हान
शिक्षक दिन म्हणून खास
मनविला जातोय देशभर
पाच सप्टेंबर हा दिवस
याचे तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण कारण
देशाला लाभलेले एक व्यक्तिमत्व
जे तत्वज्ञ दूरदर्शी असून होते एक शिक्षक
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नाव त्यांचं
पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस
आणि म्हणूनच प्रत्येक ज्ञानमंदिरात
साजरा करतात शिक्षक दिनाचा कार्यक्रम
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच नातं
अपरिचयातून घट्ट होत जातंय
शाळेत घेताना विद्यार्थ्याने प्रवेश
दोघांचाही असतो भिन्न निवास
ज्ञानार्जनासाठी विशिष्ट वेळेपुरते
राहतात शाळेत मुले शिक्षकांसोबत
पण ज्ञान देणे व घेणे या कर्तव्यानं
त्यांच्यात येते घट्ट गुंफण
शिक्षकाने ठेवावा सदैव आदर्श
विद्यार्थ्याने राखावा शिक्षकांचा आदर
शिक्षकास ठरते एक आव्हान
देताना पोरांना प्राथमिक शिक्षण
मुलांमध्ये पूर्णतः असते अज्ञान
त्यांना घडवावं लागतं मोठ्या परिश्रमानं
कोऱ्या पानापरी ते कोमल मन
तयांचे मेंदूत अक्षर रुजवणं
कठीणच ते पाटीवर लिहायला शिकवणे
जिद्दीने मुलांना करतात ज्ञानसंपन्न
मुलांचे हित जाणून शिक्षकांचा ज्ञानसागर
तळमळीने भरविते विद्यार्थ्यांची ज्ञानघागर
संघर्षमय प्रयत्नाने चढवी त्यांचा ज्ञानकळस
ही प्रक्रिया असते प्राथमिक शाळा ते महाविद्यालयापर्यंत
बनविण्यात त्यांना नागरिक सुज्ञ
रजनी घाटुर्ले
उमरेड नागपूर
पिनकोड 44 12 03
shikshak din marathi caption
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह