दत्तिंदुसुत पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर आणि वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Images Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
ज्ञानदाता तो महान | Shikshak Din Marathi Images Kavita
काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीय काव्यलतिका स्पर्धेसाठी
दि.२४अॉगस्ट २०२३ गुरूवार
विषय- शिक्षकदिन
शीर्षक- ज्ञानदाता तो महान

जसा स्वातंत्र्यदिन तो
जाई थोडा मावळती
येई मनात भावना
आपापल्या गुरूंप्रति १
पाच सप्टेंबर असे
दिन राष्ट्रीय शिक्षक
जन्मदिन सर्वपल्ली
राधाकृष्णन ते नेक २
गुरू कोणा म्हणावं ते
दत्तात्रेय सांगे छान
सदा जे मार्गदर्शक
ज्ञानदाता तो महान ३
जीवनाच्या वाळवंटी
गुरू जलसाठा असे
ज्यांचे मार्गदर्शन ते
सदोदित मनी वसे ४
कबीरांनी गुरूंचेच
मुखी महात्म्य गायिले
देवांनाही दाखवती
गुरूंनाही ते स्मरिले ५
आधुनिक काळातही
गुरू शिष्य परंपरा
विश्वातही प्रकटली
मनी गुरूंनाही स्मरा ६
ज्ञानेश्वर-निवृत्ती ते
प्लुटो-ॲरिस्टॉटलही
गांधी-विनोबाही झाले
रीत निभावण्यासही ७
शिल, क्षमता, कर्तव्य
अशा गुणांचे वाहक
अभ्यासून संपादने
शिष्या नसती दाहक ८
कधीमधी केव्हातरी
हाती देई छडी शिक्षा
पण उद्देश मनाशी
शिष्याचीच सदा रक्षा ९
मिळे मान समाजात
जणू ते कुटुंबातील
धावे प्रत्येकासाठीच
ताईतही गळ्यातील १०
आहे आव्हान मोठंच
तंत्रयुगी टिकण्याचं
अॉनलाईनच्या युगी
स्वतःला विकासण्याचं ११
पुन्हा एकदा वाढवू
महत्त्वही गुरूजींचे
वाह! गुरूजी म्हणावे
मानू त्यांना प्रीतीचे १२
✒️शीघ्रकवी दत्तिंदुसुत पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर, भाषा-इतिहास शिक्षक श्री सरस्वती भुवन प्रशाला, कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जि. जालना
धडे त्यांच्या संस्काराचे | Shikshak Din Marathi Images Kavita
“काव्यबंध समूह आयोजित साहित्यिक काव्यलतिका काव्यलेखन स्पर्धा “
दि. – २४ ऑगस्ट २०२३
वार – गुरूवार
विषय – ” शिक्षक दिन “
काव्यप्रकार – “अष्टाक्षरी “
शीर्षक – ” धडे त्यांच्या संस्कारांचे “

जीवनाच्या वाटेवर
मार्ग दाखवतो गुरू
ज्ञान मिळण्याचा टप्पा
शाळेतचं होतो सुरू…१
धडे शिकवी शिक्षक
सुविचार आणि पाढे
अध्ययन करताना
ज्ञान विद्यार्थ्यांचे वाढे…२
इतिहास सांगतात
व्यवस्थित समजून
गणिताची सारी सूत्र
घेती पहा वदवून…३
शास्त्राचीही बसवती
व्यवस्थित छान घडी
नाही केला गृहपाठ
हातावर मिळे छडी…४
नागरिकशास्त्राचेही
रंगवती सारे धडे
गुण मिळता चांगले
थाप कौतुकाची पडे…५
हिंदी-मराठीची गोडी
लावतात गूरुजन
इंग्रजीचे नियमित
घेती वर्गात वाचन…६
दाखवती वर्गामध्ये
जेव्हा नकाशा जगाचा
समजतं विद्यार्थ्यांना
तास आहे भुगोलाचा…७
जेव्हा आणती हातात
मोठं कंपास शिक्षक
मुले पाहतात तेव्हा
फळ्याकडे एकटक…८
मुलं जरी गेली पुढं
तरी गुरु तिथे राही
वाट शिक्षक दिनाला
माजी विद्यार्थ्यांची पाही…९
विद्यार्थीही जाणतात
भाव गुरूच्या मनाचे
मनामध्ये जपतात
धडे त्यांच्या संस्कारांचे….१०

©️®️
✍️... वैशाली पडवळ ( एंजल वैशू )
अहमदनगर ( अ. होळकर नगर )
shikshak din marathi images
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह