Shikshak Din Marathi Shayari

गुरू आणि माझा गुरू | 2 Best Shikshak Din Marathi Shayari

सौ .सुवर्णा पवार आणि के.पी.बिराजदार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Shayari विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

गुरू | Shikshak Din Marathi Shayari

स्पर्धा करीता
काव्य बंध समूह आम्ही मराठी
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
विषय = शिक्षक दिन
दिनांक = २४ ऑगष्ट २०२३
स्वरचित
काव्यप्रकार = दशाक्षरी
शीर्षक = गुरू

गुरू | Shikshak Din Marathi Shayari

गुरू पुजन शिक्षक दिन
जीवनात प्रथमता स्थान ,
घडवले यशस्वीता मज
मला त्यांचा असे अभिमान….१

डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली
स्मरणार्थ हा शिक्षक दिन,
जीवन जगण्या घडवती
शिक्षकां चरणी होऊ लीन…..२

लहानपणी कच्च्या गोळ्यास
देती गुरू ज्ञानाचा आकार,
शिक्षक घडवी विद्यार्थ्याना
सत्कार्याचे करती संस्कार …..३

आत्मसात करूनिया ज्ञान
जीवनाचा जाई अंधकार ,
यशस्वी जीवन घडविण्या
विद्यार्थ्यांचा खरा शिल्पकार….३

बालपणी विद्यार्थी दशेत
आदर ठेऊ शिक्षकांप्रती,
शिक्षण कालावधीत मुलां
जीवन जगण्या मिळे गती …..४

ज्ञानार्जनाचे करीती काम
सन्मार्गाचे,संस्काराचे धडे,
सफलता देण्या जीवनात
सुनावती सत्य बोल खडे……. ५

महा ज्ञानाचे भांडार खुले
मुलां प्रगतीचा मार्ग दावी,
जीवनाचा खरा गुरुवर्य
शिक्षक शिष्य घडवी भावी…..६

सत्य ,सत्कार्य आणि अहिंसा
नव्या प्रकाशाची दावी वाट,
मुलां आयुष्यात उगवती
नव जीवन नवी पहाट…….७

शिक्षक असे साक्षात गुरू
राहु ज्ञान मंदिरी संगती ,
गुरुंचा आशिर्वाद लाभता
जीवनी होत राही प्रगती ……८

होऊया शिक्षकाप्रती लीन
जीवनात लाभे समाधान ,
जीवनात सतत पाठीशी
सत्य आचरण ठेवू भान ……९

जीवनाचा मार्ग दाखवती
ज्ञानाचे उघडती कवाड ,
अज्ञानाचा जाई अंधकार
संघर्षात ज्ञानाचा पहाड…….१०

सौ .सुवर्णा पवार , इचलकरंजी
जि. कोल्हापूर

माझा गुरू | Shikshak Din Marathi Shayari

काव्यबंध समूह
आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार
काव्यलतिका
विषय:-शिक्षक दिन
दि.२४.०८.२३
माझा गुरू

माझा गुरू | Shikshak Din Marathi Shayari

जीवनाचा शिल्पकार हा खरा गुरू
तिथून खरा जीवनमार्ग होतो सुरू

विना गुरू ज्ञान मिळणे होणे नाही
जागोजागी जीवनात लागतात गुरू

प्रथम जन्मदात्री आई असते गुरू
नंतर जीवनात शिक्षक असतो गुरू

आयुष्याच्या वाटेवर खडतर संकटे
संघर्षातुन धडा शिकवतात संकटे

दुःख आहे कायमचा शिक्षक आमचा
सतत पाठलाग करित असतो आमचा

जगी जगावयास लायक बनवतो
ज्ञानदानाने यशस्वी जीवन घडवतो

शिकवताना असतो सर्वधर्मसमभाव
तो कधी करित नाही कसला भेदभाव

सारी लेकरे आपलीच हि भावना असते
कुणाला जादा कुणाला कमी वृती नसते

गुरू ब्रम्हा- गुरू विष्णु-गुरू महेशा हा धर्म
गुरू हा साक्षात परब्रम्ह हेची मर्म

शिक्षक हाची एकाअर्थी पालक आमचा
जीवनप्रवासाचा मार्गस्थ चालक आमचा

गुरू आशिर्वाद आणि कृपा हाती मोक्ष
माणूस म्हणुन सन्मानित जगतो हि साक्ष

के.पी.बिराजदार
तुरोरी(धाराशिव)

माझा गुरू | Shikshak Marathi Shayari

shikshak din marathi shayari

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *