Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

गुरूचा नेमका अर्थ आणि माझा शिक्षक | 2 Best Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

नागेश नाईक आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Shubhechha Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

गुरूचा नेमका अर्थ आणि माझा शिक्षक | 2 Best Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

गुरूचा नेमका अर्थ Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

काव्य लतिका
विषय–शिक्षक दिन
शीर्षक — गुरूचा नेमका अर्थ

 गुरूचा नेमका अर्थ Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

गुरू असतो पाण्याचा झरा
शिष्याच्या ज्ञानाला वाहत नेणारा
गुरू असतो वर्षातला पाऊस (वर्षा- ऋतू)
सतत शिष्याला ज्ञानाने भिजवणारा

गुरु म्हणजे विशाल सागर
पाण्याच्या ऐवजी भरले आहे ज्ञान
कल्पनेतल अमूल्य रूप
किंवा जगासाठी सुंदर वरदान

वाट दाखवणारा कधी कठोर
कधी प्रेमळ मित्र आपुलकीचा
कधी पालक बनून काळजी घेणारा
स्वभावच कळत नाहि गुरूचा

गुरु असतो अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून
बाहेर काढणारा एक क्रांति कारक
समाजाला नवी दिशा दाखवून
देणारा एक समाज सुधारक

गुरु म्हणजे आयुष्याच्या
बंद कुलूपाला उघडणारी चावी
गुरुमुळेच उजळल पूर्वजिवन
गुरूमुळेच उजळनार जिवन भावी

गुरु फक्तं शाळेतच नसतो आयुष्यात चांगला उपदेश देणारा
प्रत्येकजण गुरु असतो
अपयश म्हणजे गुरु अन् अनुभव सुद्धा
एक प्रकारचा गुरूच असतो

नसेल गुरु
तर होईल काय
गुरु म्हणजे हात
गुरु म्हणजे पाय

नागेश नाईक

shikshak din marathi shubhechha

माझा शिक्षक Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

काव्यबंध समुह आयोजित साप्ताहिक स्पर्धा
दिनांक: २४/०८/२०२३
विषय : – शिक्षक दिन
शिर्षक : .माझा शिक्षक

माझा शिक्षक Shikshak Din Marathi Shubhechha Kavita

गुरु विणा होतो मी तहानलेला तुमच्याअनंत ज्ञानाच्या भांडार्याला व्याकुळ ले ते माझे मन तुमच्या ज्ञानाला॥१॥

कधी ज्ञान दिल मायेन कधी ज्ञान दिल फुलां प्रमाणे ज्ञान दिले तुम्ही मला सांगराहून महान ॥२॥

जसा होतो मि मातीच्या गोळ्या सारखा आकार दिला त्या मडक्या सारखा॥३॥

ज्ञान दिले हाडाच पाणी करून आणि पंखात बळ दिल आकाशात भुर्रर्र कन भरारी
घेण्यासाठी ॥४॥

केलं जिवाच राण आणि दिल संस्काराच राण तेच मि ठेवल होत आयुष्य भर जपुन॥५॥

तुमच्या साठी काय लिहू कस लिहू कळतच नाही मला तुम्ही शिवकल्या त्या
बाराकड्याहून ॥६॥

जमिनीवर राहून सुर्याला बोट दाखवल्या प्रमाणे तुम्ही मलाअथांग ज्ञान दिले हेच माझे भाग्य लाभल॥७॥

रूप तुमचे सरस्वतीचे कल्पतरु आथांग प्रवास हा आहे तुमच्या मुळे गुरु सुरु ॥८॥

त्या काळ ची पाठी पेन्सिल
आजुन माझ्या मनी
तरळतआहे॥९॥

गुरु तुमच्या सारखे तुम्हीच होता नाही दुसरे जगात भारी ज्ञान दिले पोरावाणी ॥१०॥

या पवित्र भुमीवर जन्मलो तुमचा शिष्य घडायला आणि घडविला तुम्ही आदर्श विद्यार्थी मला॥११॥

कवि- कु :अंकुश कुपले कोल्हापूर

shikshak din marathi shubhechha

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
15 − 3 =