कवी सरकार इंगळी आणि सौ. भारती गाडगिलवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Marathi Status Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शिकवा मास्तर शिकवा | Shikshak Din Marathi Status Kavita
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
विषय …शिक्षक दिन
शिर्षक. शिकवा मास्तर शिकवा

शिकवा मास्तर शिकवा
या चिमुखल्या पाखरांना हो
गीत संस्काराचे नवे नवे
तुम्हीचं गुरू ज्ञानी बनवा. हो……।।धृ।।
ज्ञानदिवा नव्याने पेटवा
गाडा अज्ञान,अंधाकाराला हो
ज्ञानज्योतीचा प्रकाश नवा
तुुम्हीच मास्तर दावा हो………।।१।।
छडीचा तुम्हच्या चमत्कार
विध्या देई बालमनाला हो
घडेल उद्या पालक नवा
आदर्श मास्तर घडवा हो…….।।२।।
राष्ट्राची त्या शान वाढवा
द्या नव्या विचारा चालना हो
मातीतून उगवे अ़ंकुर नवे
बिज ज्ञानाचे मास्तर,जपा हो…….।।३।।
इतिहास घडवाया नवा
विज्ञानाची कास धरा
नव तंत्राची नवी क्रांती
झेप आकाशी घेऊ द्या हो..!!४!!
नवी आशा नवी दिशा हो
बलशाही होवो जगी या
नव ज्ञान तम्ही शिकवा हो.!!.५!!
तुम्हीच घडवा मास्तर
नव्याची जगाची क्रांती हो
ज्ञानाची शिदोरी शाळेत
बालमनी करा संस्कार हो..!!६!!
नव्या जगाची नवी
देश महान बनवूया हो
ज्ञानाच्या पेटवून मशाली
ज्ञानव़ंत माणस़ घडवा हो………।।७!!
कवी सरकार इंगळी ता हातकणंगले
९६५७८८८२६८
गुरू महिमा | Shikshak Din Marathi Status Kavita
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दि : २४/८/२३
विषय : शिक्षक दिन
शिर्षक : गुरू महिमा

जगी सर्वश्रेष्ठ गुरू असतो…!
गुरूच्या श्रेष्ठत्वाची ईश्वरही देतो साक्ष…!
पुराणातही आहे उल्लेख…!
गुरू शिवाय ज्ञान नाही…!
गुरू हा जीवनाचा सागरू…!
वाटाड्या, मार्गदर्शक, जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली असे गुरूच्या हाती…!
गुरू शिल्पकार जीवनाचा…!
गुरू म्हणजे ज्ञानामृताचा कुंभ….!
आज कोणी म्हणे तयासी गुरू, गुरूजी, शिक्षक, सर…!
नानाविध भूमिका साकारती धरेवर…!
प्रथम गुरू माय माऊली….!
करते वर्षाव संस्कारांचा….!
संस्कारांची ही शिदोरी देते दिशा संपूर्ण आयुष्याला…!
द्वितीय गुरू बाप, बाबा….!
मुखावर सदा कठोरता आव…!
पण देतो जगाच्या वास्तवाचे ज्ञान….!
तृतीय आणि महत्वाचे गुरू म्हणजे शिक्षक…!
घटकारासम कोवळ्या मुलांचे घडवतो शिल्प…!
उघडतो ज्ञानाची कवाडं…!
भाषा, गणित, विज्ञान, इतिहास सह कौशल्य, व्यक्तित्व नि व्यक्तिमत्वाची करी घडवणूक….!
योग्य, अयोग्याचे मार्गदर्शन…!
मुल्य, संस्कृती, संस्कार वहन…!
समाजाप्रती कर्तव्याची करतो रुजवणूक….!
गुरुच्या अंगी भावी पिढी घडविण्याचे सामर्थ्य…!
देश विकास, प्रगतीसाठी मार्गदर्शक….!
गुरू असे वैशिष्ट्यांची खाण…!
अपुरे पडती शब्द माझे वर्णाया गुरू महिमा…!
नमन त्या गुरूवर्या जयाच्या आधारे होतो जीवनाचा प्रवास सुखमय….!!
सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर

shikshak din marathi status
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह