Poem on Shikshak Din Marathi

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

सौ सुनीता जयदीप पाटील आणि सौ. कल्पना प्रभाकर चौधरी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem on Shikshak Din Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

काव्य बंध समूह
काव्यलतिका स्पर्धा
विषय:- शिक्षक दिन
दिनांक :- *24/8/2023
शीर्षक :- शिक्षक

शिक्षक Shikshak Din Marathi

शिक्षक Best Poem on Shikshak Din Marathi

5 सप्टेंबर शिक्षक दिन
माझ्या अंतरातील एक क्षण
घडविले मला शिक्षक
तृप्त झाले माझे मन !!1!!

शिक्षक हा ज्यांचा प्रथम मान
ते डॉ.सर्वपल्लीराधाकृष्णन
यांच्यामुळेच आज साजरा होतो
शिक्षक दिनरुपी सण !!2!!

शिक्षक रुपी गुरू भेटतात
शाळेच्या प्रांगणात
जसा बहरतो गुलमोहर
कित्येकदा अंगणात !!3!!

शिक्षक हे जगातील
आहेत अनमोल धन
अनुभवले आहेत मी
याचे कित्येक क्षण !!4!!

मुलांच्या मनाची पाटी
असते कित्येकदा कोरी
शिक्षकच देतात त्यांना
ज्ञानाची शिदोरी !!5!!

ज्ञानाचे धडे घेतले मी
शाळेच्या ज्ञान मंदिरात
सगळे विश्वच व्यापून
टाकले मी अंतरात !!6!!

कधी सुखाच्या कधी दुःखाच्या
गोष्टी होते मी गात
वेळोवेळी योग्य गुरु
भेटले मला जीवनात !!7!!

भाग्यवान लोकांनाच मिळते
अशा गुरूंची साथ
म्हणून माझ्या जीवनात
मी आज गाणे आहे गात !!8!!

आज त्यांच्या आठवणींनी
भावना दाटून येतात अंतरात
इंद्रधनुचे रंग भरले
त्यांनी माझ्या जीवनात !!9!!

माझ्या जीवनाला दिला
शिक्षकांनीच आकार
शिक्षक होण्याचे स्वप्न माझे
आज झाले साकार !!10!!

क्षमाशील,शीलवान हे
शिक्षकांचे गुण
त्यांच्यामुळेच आज पाहिला
विक्रम चंद्रयानाने मून !!11!!

अर्पते मी कविता त्यांना
माझे शिक्षक डॉक्टर शेलार सर
जे आहेत स्मार्टअस अबॅकस
चे तज्ञ डायरेक्टर !!12!!

✍️सौ सुनीता जयदीप पाटील
कल्याण मुंबई

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

काव्यबंध शब्दसमूह
काव्य लतिका कविता स्पर्धा
विषय : शिक्षक दिन
दिनांक :24/08/2023
शीर्षक: गुरुजी

गुरुजी Shikshak Din Marathi

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

गुरुजी तुम्ही नसता तर
कळला नसता कोन नी त्रिकोण
नसताच कळला काटकोन नी चौकोन……
कळलाच नसता पूर्णांक तर जीवन झाले असते अपूर्णांक…

गुरुजी तुम्ही नसता तर
नसते वाचले शाहू नी आंबेडकर
नसते पाहिले शिवाजी नी संभाजी
नसती समजली सावित्री नी जिजाऊ…..

गुरुजी तुम्ही नसता तर
नसते कळले मला चंद्र, सूर्य,तारे
नसता कळला असता पृथ्वीचा गोल..
नसता कळला स्वल्पविराम, अर्धविराम तर माझ्या आयुष्याला लागला असता पूर्णविराम…..

गुरुजी तुम्ही नसता तर
नसता समजला कर्ता,कर्म ,क्रियापद
नसताच शिकवला अर्थ तर जीवन झाले नसते का व्यर्थ…?

गुरुजी अजून पण
आठवतोय तुमचा मार
पण त्यामुळेच कळू शकला मला विद्येचा सार…. विद्येचा सार….

गुरुजी, तुमच्यामुळेच मी घडली
केला होता मी तेव्हाच संकल्प
मी सुद्धा करते आहे विद्यार्थ्यांना ज्ञानदान
नव्हता माझ्याजवळ दुसरा विकल्प…
दुसरा विकल्प…

स्वरचित
सौ. कल्पना प्रभाकर चौधरी
परतवाडा (अमरावती)

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

शिक्षक आणि गुरुजी | 2 Best Poem on Shikshak Din Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *