Shikshak Din Message Marathi Kavita

शिक्षक दिन आणि माझ्या बाई | 2 Best Shikshak Din Message Marathi Kavita

नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे आणि सायली पराड कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Message Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शिक्षक दिन | Shikshak Din Message Marathi Kavita

स्पर्धेकरिता
दिनांक :- २४/०८/२०२३
विषय :– शिक्षक दिन

खुल्या नभा खाली
शाळेचा वर्ग आमचा
पोरांना शिकवयासाठी
आटापिटा केला जीवाचा

मायेचा पांघरून
होता छडीचा हार
उज्वल भवितव्य घडविण्या
केला शब्दांचा मार

संस्कारांचा वर्षाव
सोबतीला सत्याचे धडे
शील, प्रामाणिकतेला
त्यामुळे गेले नाही तडे

स्वतःच्या पैशाने
दिले शिक्षणाचे धडे
प्रसंगी कठोर शब्द
बोलून काढले वाभाडे

कोळशाच्या खाणीतील
हिऱ्या सारखी आमची स्थिती
निरखून , पैलू पाडून
वाढवली आमची किमती

किती गुणगान गाव
किती सांगावी महती
आमच्या गुरुजींच्या मनाला
नव्हत्या कसल्याच गर्वाच्या भिंती

जात , पात, द्वेषमत्सर याला
शाळेत कसलीच नव्हती भिती
सर्वांनी एका जीवान राहायचं
ही गुरुजींची शिकवण आमच्या चित्ती

गुरुजींनी हात सोडून दिला
तेंव्हा पाणी आलं डोळ्यामंदी
समाजात कसं राहायचं
याचं शिक्षण दिलं त्यांच्या संगी

काळ निघून गेल्यावर
गुरुजीन ची आठवन आली
पोरांची शिक्षणासाठीची
धडपड डोळ्यातून वाहु लागली

देव भेटल कुठं
कुणी विचारलं आत्ता
हात जातो आपसूक
डोळ्या समोरच्या शाळेत

©️✍️
कवी
नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे
मेढा तालुका जावली जिल्हा सातारा

माझ्या बाई | Shikshak Din Message Marathi Kavita

काव्यबंध समूह काव्य लतिका
२४/८/२३
विषय- शिक्षक दिन.
कवितेचे शीर्षक – माझ्या बाई.

माझ्या बाई | Shikshak Din Message Marathi Kavita

चढले पहिली पायरी शाळामातेची,
दाटली होती मनी भिती नव्या वातावरणाची,
“बाई” तुम्ही दिलात हात आधाराचा,
नकळत नाळ जुळली तुमची अन माझ्या बालमनाची….

निरागसता जपत ह्या मातीच्या गोळ्याला घडवलं तुम्ही,
कलेकलेने जपत कोवळं मन अभ्यासाचे धडे गिरवून घेतलेत तुम्ही,
आपलेपणाने रागावलात तर कधी मायही केली,
शाळेला माता का बरं म्हणतात ते जाणवून दिलं तुम्ही….

वरच्या वर्गात गेले अन तुमचीही जबाबदारी वाढली,
आता पाठयपुस्तका सोबत कलेशीही तुम्ही ओळख करून दिलीत,
स्वतःतलं ‘स्व’त्व विसरून रिता केलात ज्ञानाचा सागर,
आजही मनी दाटून येतो बाई तुमच्या करता आदर….

माझे अक्षर मोत्यासारखे व्हावे म्हणून घेतलेत तुम्हीही श्रम,
लेकीला शिकवताना आज मला आठवते आपसूक आपल्या शाळेतील गंमत,
बालमन ते कोवळं जपून तुम्ही दिलीत सुजाण पिढी समाजाला,
शिक्षणासोबत जगण्याचाही चाकोरी बाहेर जाऊन तुम्ही शिकवत होतात धडा….

©️®️सायली पराड कुलकर्णी

shikshak din message marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 − 18 =