Shikshak Din Nimitta Kavita

स्थान आणि माझे गुरुजी | 2 Best Shikshak Din Nimitta Kavita

सौ.संघमित्रा सोरटे आणि सौ.अनिता डोंगरवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Nimitta Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

स्थान | Shikshak Din Nimitta Kavita

काव्यबंध समूह काव्य लतिका
दि.२४/८/२०२३
विषय..शिक्षक दिन.
शीर्षक.. स्थान.

स्थान | Shikshak Din Nimitta Kavita

कुणी लहान कुणी मोठा
नसे यांचे ठाई भेदभाव
मानवातही ठरे महान
शिक्षक त्यांचे नाव

साक्षर करणे हेच तयाचे
ध्येय जीवनी खरे
प्रगतीची शिखरे गाठता
शिष्यावर छत्र कौतुकाचे धरे

गिरऊन अक्षर एक,एक
शिकवी जीवन कला
विद्यादानाचे कार्य करुनी
घडवी यशस्वी नागरिक भला

पदोपदी देई महती
त्यांच्या थोर कार्याची
इतिहास शिकऊनी करती
पुनरावृत्ती नव्या इतिहासाची

आयुष्याचे गणित शिकविती
सर्व सोपे करुनी सूत्र
कधी होती गुरू प्रेमळ
तर क्षणात कठोर मित्र

सरस्वतीची करुनी पूजा
घडवी विद्यार्थी जिवनशिल्प
अखंडित करती सेवा
वाहून जीवन पुष्प

अनुभवाचे बोल सांगुनी
समृद्ध जीवन करती
शिक्षक होती कधी मायपिता
नतमस्तक होऊ चरणावरती

शिक्षित पिढी घडविण्यात
ठरे त्यांचे मोलाचे योगदान
करू साजरा दिन त्यांचा
देऊ सदैव मनमंदिरी स्थान.

सौ.संघमित्रा सोरटे. माळशिरस.सोलापूर.

माझे गुरुजी | Shikshak Din Nimitta Kavita

काव्यबंध समुह
काव्यलतिका
गुरुवारी स्पर्धा
दिनांक 24 /8 /2023
विषय- शिक्षक दिन
शीर्षक – माझे गुरुजी

माझे गुरुजी | Shikshak Din Nimitta Kavita

शिक्षक दिनाला मनवु सारे
ज्यांनी आम्हांले घडविले
त्यांना वंदुया आदराने सारे
नतमस्तक होवुया त्यांच्यापुढे
ज्यांनी आव्हानाला सामोरे
जाण्याचे दिले धडे


गावातल्या शाळेत होतो शिकत
गुरुजी आमचे होते मोठे कडक
मनाने होते एकदम नरम
पोरं शिकावी म्हणून होते गरम


गुरुजींची पुण्याई म्हणून जीवनात गाठलो शिखर
आठवते अजून पहिली दुसरीत होतो
रोज शाळेत यावं म्हणून चॉकलेट देत असत
गाव खेड्यातील पोरं शिकवी म्हणुन
घरी येवुन विचारपूस करत
बळीराजाच्या पोरावर जास्त नजर


शिकले पोरं तर बळीराजा सुखावल
नाही भेटल नोकरी तर जोडधंदा शोधल
शिकतील गावची पोरं
इतिहास घडवतील नवं
शहरातील पोरं अभ्यासात हुशार
गावची पोरं कष्ट न् बुध्दीनं हुशार
जाणुन होते गुरूजी म्हणुन
पोरांना घडविण्यात जीवन सार्थक करीत

शिक्षक दिनाचे मानकरी
सावित्रीबाई फुले व माझे शिक्षक
यांना विनम्र अभिवादन

सौ.अनिता डोंगरवार
मु्.पो. जि. गोंदिया

shikshak din nimitta

माझे गुरुजी | Shikshak Din Nimitta

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
38 ⁄ 19 =