Shikshak Din Photo Kavita

ईश्वरसमान शिक्षक आणि जीवनाचे शिल्पकार | 2 Best Shikshak Din Photo Kavita

सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर आणि रमेश चव्हाण यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shikshak Din Photo Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ईश्वरासमान शिक्षक Shikshak Din Photo Kavita

स्पर्धेसाठी,
काव्यबंद समूह आपल्यासाठी घेऊनआले आहेत
काव्य लतिका स्पर्धा,
दिनांक २४/८/२०२३
विषय शिक्षक दिन

शीर्षक ईश्वरासमान शिक्षक

 ईश्वरासमान शिक्षक Shikshak Din Photo Kavita

ईश्वरा समान शिक्षक असतात
देतात जीवनाला आकार
मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे असती
करतात त्यांचे स्वप्न साकार

चिमुकल्या पंखात बळ,
नेहमी ते देत असतात
उंच गगन भरारी आपल्याला,
घ्यायला ते शिकवू पाहतात

गुरुजी छडीच्या धाकामुळे
अभ्यास व्हायचा आमचा पटकन
हातात घेतली तुम्ही की,
सगळे आठवायचे कसे चटकन

कधी आमच्यावर रागवलात
कधी आम्हाला शिक्षा केली
त्यामुळेच आम्ही शिकलो
अभ्यासाला चालना मिळाली

तुमचे मार्गदर्शन आम्हाला
नेहमीच मोलाचे ठरले
वरच्या वर्गात गेल्यावर
जिद्दीने अभ्यास करायचे ठरवले

संस्काराचे बाळकडू तुम्ही
पाजले आम्हाला लहानपणी
आजूनही आदर करतो मोठ्यांचा
आदर, सन्मान, आमच्या मनी

तुम्ही रागाने बघितले जरी
धाक तुमचा वाटायचा
मान खाली घालून बसायचो
डोळ्यातून आश्रु टीपकायचा

आभार तुमचे मानते मी
बनवला मातीचा सुंदर घडा
अजूनही आठवतो आम्हाला
तुम्ही शिकवलेला प्रत्येक धडा

सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

शीर्षक:- जीवनाचे शिल्पकार Shikshak Din Photo Kavita

स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धा
दिनांक: २४/०८/२०२३
विषय: शिक्षकदिन
शीर्षक:- जीवनाचे शिल्पकार

शीर्षक:- जीवनाचे शिल्पकार Shikshak Din Photo Kavita

अ पासून सुरवात अज्ञानातून
ज्ञ पासून शेवट ज्ञाना पर्यंत
शिकविला जगण्याचा पाया
घडलो आम्ही गुरूंच्या सानिध्यात!!१!!

माझे गुरू जीवनाचा कल्पतरू
प्रेरणा ज्ञान यश प्राप्तीचा आधार
मायपरी ममतेची वात्सल्य मूर्ती
जीवनाचा मायेरूपी अथांग सागर!!२!!

पेटवूनिया ज्ञानरुपी ज्योत अंतर्मनी
अंधारमय झालेल्या ह्या जीवनी
उजळवले आमचे तममय भाग्य
सत्याच्या ह्या अथांग सद्गुणांनी!!३!!

अपूर्णत्वाला पूर्णत्वास आणूनी
शब्द सुमने अर्पूनी वाढवला ज्ञान
जगण्यातून जीवन घडविले आमचे
दूर केला जीवनांचा कायमचा अज्ञान!!४!!

घडविला गुरूंनी भविष्याचा पाया
समजवली जीवन जगण्याची महती
जाणितो आम्ही गुरूंची महान कीर्ती
तुमच्यामुळे लाभली आम्हा सुसंगती!!५!!

दाखविला जगण्याचा सुजान मार्ग
नाही आम्हा राहिली अज्ञानाची भीती
जन्मोजन्माचे उपकार तुमचे आम्हावरी
गुरू तुमच्या चरणी कर माझे जुळती!!६!!

जीवनाचे शिल्पकार Shikshak Din Photo Kavita

रमेश चव्हाण
तोंडली मंडणगड

shikshak din photo

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
30 + 24 =