छत्रपति शिवाजी महाराज कविता | Shivaji Maharaj Kavita In Marathi

छत्रपति शिवाजी महाराज कविता | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita In Marathi
राजे तुमच्यावर लिहिल्या गेल्या कित्येक कविता
पोवाडे अन् कित्येक चित्रपट ही झाले
तुमच्या भूमिका साकारून कित्त्येक
कलाकार नावारूपास देखील आले
पण तुमची खरी प्रतिमा कुणाला कळली नाही
अन् तुमच्या विचारांची महती कुणाला समजली नाही

छत्रपति शिवाजी महाराज कविता | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita In Marathi

प्रजेच्या हितासाठी तुम्ही लढले
गानिमांचे भय तुम्ही स्वराज्यात ठेवले नाही
पण तुमची शिकवण विसरून आता जनतेन
तुमच्या नावाखाली मौजमजेची एकही संधी सोडली नाही

इथल्या गलिच्छ राजकारणासाठी आज राजांच्या नावाचा वापर केला जातो
मतांच्या व्यवहारात देवाण घेवाणीसाठी हा व्यवहार नक्कीच दिसतो
आधी शिवजयंती पुरते तरी तुमचे विचार कानी पडत असायचे
पण राजे धर्मांध लोकांकडून तुम्हाला धर्मात बांधले जाते

छत्रपति शिवाजी महाराज कविता | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita In Marathi

तुमच्या विचारांचे अनुसरण करणारे फार खूप मावळे उरले नाही
आणि इतरांच काय सांगायचं दारू अन् माव्या शिवाय भागत नाही
स्वार्थी लांडगे मावळे असल्याचे नाटक केल्याशिवाय राहत नाही
फ्लेक्सबाजी करताना तुमच्यापेक्षा मोठा फोटो आम्हाला पचत नाही
शिवजयंती निमित्त लहान लहान मिरवणुका उरल्या नाही
पण डीजेवर शिला आणि मुन्नी शिवाय गाणे लागत नाही

हे सगळं बघितल्यावर खरचं राजे माझी मान शरमेने खाली वाकते
थोडं वाचा म्हणलं या लांडग्यांना तर आपलीच खिल्ली उडविली जाते
सुपारीच्या एका खांड्याची ही व्यसन नसणारे आमचे राजे कुठे
आणि संध्याकाळी नशेत लोळणारे हे दिशाहीन तरुण कुठे

अहो राजे तुम्ही तर शत्रूंच्या स्त्रियांना देखील मानसन्मान देऊन वागवले होते…
आणि मुलींवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पाटलाचे हात पाय कापले होते…

छत्रपति शिवाजी महाराज कविता | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita In Marathi

राजे तुम्ही या पुन्हा जन्माला असं कित्येक लोक गाणे गातात
पण तुमच्यासारखे पुत्र घडवणाऱ्या मां साहेब हल्ली गर्भातच मारल्या जातात
जरी जन्मल्या तरी समाजाच्या कुचम्बनेत घरोघरी भरडल्या जातात
मूळअडचणी वरती काम केल तरच वाटा प्रगती कडे जातात

खरचं तुमची वाट आम्ही बघतो आहो राजे
आदर्श कसा पुढे न्यायचा हे विसरलो आहे
डीजे मिरवणुका फ्लेक्स यात हरवलेल्या स्वराज्यावर
राजकारणी स्वार्थापायी अवहेलना का सहन करतो आहे ?

आज जर राजे असते तर असे झाले असते
तुम्ही जन्माला आले असते तर आम्ही तसे केले असते
असे विचारांचे धडेच गिरवण्यासाठी का स्वराज्य निर्मिले ?
धूसर अंधाऱ्या वातावरणात स्वप्रयात्न शिवाय जमेल कसे ?

छत्रपति शिवाजी महाराज कविता | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita In Marathi

शिवजयंतीचा अकांडतांडव बघून नाराज होऊन जाऊ नका
चार तळमळीचे मावळे सोबत घेतल्याशिवाय राहू नका
समाजात बदल घडवायला आता तलवार आणि भाल्यांची गरज नाही
दिखावा आणि नशेच्या चक्रव्यूहातून नवीन पिढीला बाहेर काढल्याशिवाय थांबू नका

शिवचरित्रातून स्वराज्याची किमया कळेल
मावळ्याला खरी जबाबदारी मिळेल
समाजप्रबोधनाची धुरा सांभाळेल
तेव्हाच कुठे स्वराज्याला हातभार लागेल

छत्रपती शिवाजी महाराज बायोग्राफी वाचा

जगण्यासाठी मोटीव्हेशानल विचार वाचा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

1 thought on “छत्रपति शिवाजी महाराज कविता | Shivaji Maharaj Kavita In Marathi”

  1. Pingback: Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
36 ⁄ 18 =