Short Katha Lekhan in Marathi

बिरबलाची खिचडी मराठी लघुकथा | Short Katha Lekhan In Marathi

कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे ‘ गोष्ट ‘. घडलेली घटना , प्रसंग ह्या कधी कधी कथा म्हणून सांगितल्या जातात . त्या कथेचा कथानक हा आत्मा असतो.हे कथानक भूतकाळातील घडलेल्या घटनांचे किंवा प्रसंगाचे असते. या कथेतूनच व्यक्तीच्या स्वभावाचे दर्शन होते.कथा सांगण्याच्या पद्धतीवरच त्या कुठे परिणामकारकता अवलंबून असते. त्यामध्ये संवाद वापरले जातात आणि त्यातूनच कथा गतिमान होत राहते. कथा लेखन हि एक कला आहे. कथा माहित असणे या पेक्षा ती सुंदर पद्धतीने आणि योग्य शब्दात मांडता येणे गरजेचे असते.आणि ही कला सरावानेच आत्मसात करता येते.कथा फक्त सांगणे हे सोपे असते. त्यापेक्षा कठीण असते ते कथा लिहिणे. कथा लिहून त्याला योग्य शीर्षक देणे पण महत्वाचे असते.
Short katha lekhan in marathi 10th class pdf

कथा लिहिताना पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत.

Short katha lekhan in marathi 10th class pdf

१) कथेसाठी दिलेले मुद्दे ,घटक आणि सुरुवात काळजीपूर्वक वाचावी.
२) मध्यवर्ती दिलेली कल्पना लक्षात घ्यावी .
३) सूचित होणाऱ्या घटना समजून घ्याव्यात.
४) घटनेचा क्रम ठरवणे .
५) आरंभ , मध्य आणि शेवट असे तीन भाग करावेत.

Short katha lekhan in marathi 10th class pdf


६) कथेची भाषा सुटसुटीत आणि साधी असावी. शेवट हा परिणामकारक असावा.
७) शक्य तिथे कथेमध्ये म्हणी, वाक् प्रचाराचा वापर करावा.
८) कथा ही भूतकाळातील असावी.
९) कथेला योग्य शीर्षक द्यावे.
१०) मुद्यांप्रमाणे परिछेद करावा.

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा.

PDF Download करा.

अकबर बादशहा – रात्रभर थंड पाण्यात उभे राहणाऱ्यास बक्षीस – एक अतिशय गरीब म्हातारा -दूरवर असणाऱ्या दिव्याकडे पाहत पाण्यात उभा – बक्षीस देण्यास नकार-
बिरबलाचे बादशहाना भोजनासाठी निमंत्रण -खिचडी – अकबर बादशहाला चूक उमगणे- म्हाताऱ्या माणसाला बक्षीस.

उत्तर :- कथा लेखन बिरबलाची खिचडी

दिवस थंडीचे होते. बादशहा अकबर यांनी एके दिवशी एक अजब घोषणा केली. राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर जो उभा राहिल त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील.अशी दवंडीही पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते धाडस करायला तयार होतो. तो माणूस रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर बादशहा येतात ,तेव्हाही तो गरीब म्हातारा आपल्या जागेवर उभा असतो. पण त्यावेळी अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते अकबर बादशहा सेवकाला विचारतात , दिवा रात्रभर तेवत होता का? तेव्हा सेवक होय म्हणतो.

Short katha lekhan in marathi 10th class pdf

रात्रभर दिवा तेवत राहिला त्यामुळे जलकुंडात उभा राहणार्‍या माणसाला त्याची उब मिळाल्याचे अनुमान अकबर बादशहा काढतात .आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस त्या म्हाताऱ्या माणसाला देण्यास नकार देतात . तो ‍खूप दु:खी होतो. बिरबलच आपल्याला न्याय देतील या विचाराने तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, ‘तू घरी जा , मी बघतो आता काय करायचे ते.’

दुसर्‍या दिवशी रोजच्या प्रमाणे दरबार भरतो. रोज अगदी वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही. म्हणून अकबर बादशहा सेवकामार्फत बोलाविणे पाठवितात .सेवक परत येतो व बिरबल खिचडी शिजवत असल्याचे महाराजांना सांगतो. खिचडी शिजल्यानंतरच बिरबल दरबारात येणार असल्याने राजा दरबाराच्या कामास सुरवात करतात .दुपार झाली पण बिरबल काही आला नाही. म्हणून राजाने सेवकाला परत पाठविले . दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी अजून झाली नाही असे सांगतो.

Short katha lekhan in marathi 10th class pdf

Short Katha Lekhan In Marathi

अकबर बादशहाला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी पण बिरबल येत नाही म्हणून अकबरच त्याच्या घरी जातात . तेथे गेल्यावर पाहतो तो काय. बिरबलाने छोटी चूल पेटवली होती .आणि बर्‍याच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवली होती. बादशहा अकबर हसतात आणि म्हणतात , अरे बिरबला तू एवढा चतुर आणि हुशार . मग तुला एवढे पण समजत नाही,की खिचडी आणि विस्तव यांच्यात एवढे अंतर असेल तर ती कशी शिजेल ?

त्यानंतर बिरबल म्हणतो, ‘क्षमा करावी महाराज, जर दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा म्हातारा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो,तर मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? राजाला आपली चूक लक्षात येते. रात्रभर पाण्यात उभा राहणारया म्हताऱ्या माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो.

तात्पर्य -प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहावे.

Short katha lekhan in marathi 10th class pdf

कथा लेखनाचे आणखी ब्लॉग वाचा

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *