short poem for aaji in marathi

अमूल्य भेट | Best short poem for aaji in marathi 2023

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem for aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem for aaji in marathi

काव्यबंद समूह
काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 14 सप्टेंबर 2023
विषय:- आजीची छकुली

अमूल्य भेट short poem for aaji in marathi

अमूल्य भेट | Best short poem for aaji in marathi 2023

अमूल्य भेट बणून
छकुली आली आयुष्यात
सुख आनंदाचे रंग भरू लागली
बेरंगी वृद्धत्वात

तिच्या सवे बोबडे बोल बोलून
बालपण पुन्हा अनुभवले
खेळ खेळून बालपणीचे
मन तृप्त झाले

रुणझुण बोलात पैंजणांच्या
मन हरवून जाते
थकलेल्या चेहऱ्यावर
क्षणात स्मित येते

रूप ते गोजिरे प्रसन्न निरागस
अवचित देही बिलगते
सुख आनंदाच्या वर्षावात
तन मन माझे नहाते

कर्ण मधुर बोलांनी
घर बोलके करते
परी माझी मुक्या भिंतींना ही
मृदू वाचा फोडते

हळूच येऊन पप्पी घेता
जीवनास गोडी अमृताची येते
कोमल प्रेमळ स्पर्शाने
मनी वात्सल्य पेरते

तोंडातला काढून घास
घालते आजीच्या मुखात
आनंदाची ही सरिता
हिरवळ पेरते जीवनात

कमजोर झालेल्या डोळ्यात
बघते डोळे घालून
तिच्या नजरेने पाहायला शिकवते
पुन्हा आयुष्याकडे वळून

आरोही माझी म्हणजे
आनंदाची पंढरी
हात धरून चालवते तेव्हा वाटते
करविते मजला वारी

हास्य पाहून तिचे
आठवतो नंदादीप
पौर्णिमेचे चांदणे
वाटते आले समीप

सुख आनंदाच विश्व
तिच्या रूपाने परतलं
वृद्धत्वातही मन
पुन्हा अल्लड बनलं

तिच्यामुळेच राहतं
नित्य ओठांवर हसू
कधी होते आई
कधी होते सासू

तिच्याकडे पाहून मी
शिकले दुःखातही हसायला
झालं गेलं विसरून
क्षणात नव्याने डोलायला

चिंतन केले तर कळते
ती खूप काही शिकवते
हसता हसता रडून रडता रडता हसून
साऱ्यांचे प्रेम मिळवते

आनंदाने पार होतो
तिच्यामुळेच वृद्धत्वाचा टप्पा
बाकी शून्य उरणार्‍या आयुष्याचा विसर पाडते
मारून गोड गप्पा

वाटलेल्या वृक्षाला वर्षा ऋतूत
जशी नवी पालवी फुटते
थकलेल्या मनी तशीच
छकुली माझी नवी आशा फुलवते

माझी छकुलीच आहे दुवा
दोन जनरेशन मधल्या गॅपची
आनंदाच्या बंधात बांधणारी
मैत्रीण माझी शेवटची

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

short poem for aaji in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

1 thought on “अमूल्य भेट | Best short poem for aaji in marathi 2023”

  1. खुपचं सुंदर आणि मनाला त्या क्षणात भुरळ टाकून त्याच विश्वात रमुन टाकणारे शब्द, अगदी मोजक्या अक्षरांत खुपचं उत्तम पेरले आहेत मॅडम… 👌🏻👌🏻👌🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *