short poem for diwali in marathi

आली माझ्या घरी ही दिवाळी आणि दिवा अंतरी पेटला | 2 Best short poem for diwali in marathi

सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी आणि सुरेशकुमार जी. शेरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem for diwali in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem for diwali in marathi

काव्यबंध समूह आयोजित

काव्यलतिका

दिनांक:- २९/१०/२०२३

विषय :- सण दिव्यांचा

आली माझ्या घरी ही दिवाळी | short poem for diwali in marathi

2 Best short poem for diwali in marathi

आली आली बघा माझ्या घरी ही दिवाळी,
दरवर्षी येते दिवाळी परि वाटे नित्य नव्हाळी !
अंगणी झुलता आकाशकंदील म्हणजे जणू सप्तरंगांची उधळण,
रंगांच्या तेजोमय अस्तित्वात उजळून निघते माझे हे मन !
मंद तेवती पणती देई अनुभूती असीम शांतीची,
इवलीशी ती पणती असे पिवळसर सोनेरी कांतीची !


गाय वासराच्या पुजने होत असे दीपावली आरंभ,
दिव्यांचे अस्तित्व म्हणजे आयुष्यातील प्रकाशाचा प्रारंभ !
परोपरी सहाय्यकारी होणाऱ्या गो मातेस सारे आपण पुजतो,
अंधकारावर मात करत येणाऱ्या दिवाळी पर्वाचे सारे स्वागत करतो !
येई धनत्रयोदशी घेऊनी सुख समृद्धीचे पर्व,
धन धान्याच्या वर्षावाने कृपांकित होतो सर्व !


मांडीला चौरंग तो रेखीव त्यावर घातले वस्त्र नवे,
स्थापिली ती लक्ष्मी माता घेऊनी वंदन करते गज सवे !
तेजाळत्या पणत्यांची अन् समयांची सजवली चौफेर ती आरास,
धूप दीप अन् उदबत्तीचा चहूबाजूंनी दरवळू लागला मंद तो सुवास !
सहकुटुंब सहपरिवार भक्तिभावे करूया सारे लक्ष्मीपूजन,
सुख,समृद्धी,भरभराटीचे सगळ्यांच्या आयुष्यात होत राहो गुंजन !


अलक्ष्मीचा विनाश करून कुटुंबात सदोदित राहावे लक्ष्मीचे वास्तव्य,
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पुनीत होत राहावे साऱ्यांचे आयुष्य !
नवीन वर्षाची पहाट घेऊन तो दरवर्षी येतो तो पाडवा,
सतत वृध्दींगत व्हावा पती -पत्नीच्या नात्याचा गोडवा !
मग येते यमद्वितीया अर्थात भाऊबीजेचा पवित्र सण,
बहिणीच्या आठवणीने फुलूनी जाई भाऊरायाचे मन !


बहीण भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असे भाऊबीज,
हे असे नाते असते ज्याची कधीही न होते झीज!
दहा दिशांनी तेज उधळत येते ही दीपावलीची लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया,
आपसूकच मग पसरले जातात बाहू या आभाळभर आनंदाला मिठीत घ्यावया !
प्रेमाचे उटणे अन् आपुलकीचे तैलस्नान घडते आहे,
घरोघरी बघा आप्तांच्या हास्याची नौबत झडते आहे !
मुक्तपणे रंगली अंगणी नात्यांची रांगोळी,
आली आली बघा माझ्या घरी ही दिवाळी !

©®सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी नाशिक

short poem for diwali in marathi

काव्यबंध समूह काव्यस्पर्धा
………………………………..

दिवा अंतरी पेटला | short poem for diwali in marathi
================

आली माझ्या घरी ही दिवाळी आणि दिवा अंतरी पेटला | 2 Best short poem for diwali in marathi

सण असो की उत्सव
जाणू तयाचे वास्तव
आयुष्य धगधगते विस्तव
संघर्ष आपुले यास्तव!…..

 • कित्येकांच्या कित्येक दिवस
  चुलीच पेटत नाहीत;
  ‘आपले’ असे कोण तयांचे?
  कुणीच भेटत नाहीत!…..
 • सजवली जातात घरे
  लखलख दिव्यांची आरास
  एकामुखी पंचपक्वान्न
  दुजा शिळ्या कुटक्यांचा घास!…
 • स्वातंत्र्य आणि बंधुता
  समता आणि समानता
  काय एकता-एकात्मता;
  जगणे कशासही न जुमानता!…
 • महामानवांनो तुम्ही
  आणखी थोडे दिवस रहायचं होतं!
  आपले देशबांधव कुठवर गेले
  हिंमत करून पहायचं होतं!
 • तसे पाहू जाता ही काही
  केवळ आमचीच चूक नाही,
  पोट भरलं की संतुष्ट होणे
  इतकीच आमची भूक नाही!…
 • कळले याचे मर्म जयांना
  तयांना साक्षात प्रभूवर भेटला
  नीतिच्या तैलवातीने
  दिवा अंतरी पेटला!…..

 • सुरेशकुमार जी. शेरे,
  सिंदखेडकर.
  8605339289.

short poem for diwali in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह