डॉ. मानसी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Short poem for granddaughter विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Short poem for granddaughter
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि १४/९/२३
विषय: आजीची छकुली
माझी लाडकी नात | Short poem for granddaughter

प्रथम जेव्हा तुझे रडणे ऐकले
त्याच क्षणी आमच्या चेहऱ्यावर हसू फुलले
तुला बघताच आमचे मन भरून आले
पुढले काही क्षण डोळे वाहू लागले….१
जेव्हा तू डोळे उघडून बघितले
सूर्यकिरणच लकाकले असे भासले
तुला कुशीत घेतल्यावर मात्र
सारे जग मुठीत आल्यासारखं वाटले….२
हळूहळू इवल्या हाताचे इशारे कळू लागले
पायातले वाळे रूणझुण वाजू लागले
तुझ्या गोड लाघवी हास्याने
घर आनंदात उजळून निघाले….३
आपल्या परिवारातील तू छोटी बाहुली
जणू लक्ष्मीच्या रूपात परीच लाभली
तुझ्या बोबड्या बोलाने हसताना
घरादाराने जणू कातच टाकली….४
माझी लाडकी नात देऊ काय तुला
सुखसमाधान दीर्घायुष्य लाभू दे तुला
होवोत पूर्ण तुझ्या साऱ्या मनोकामना
तुझ्या यशाचे उत्तुंग पतंग पाहू दे मला…५
डॉ मानसी पाटील
मुंबई

Short poem for granddaughter
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह