short poem on diwali in marathi

आजची दिवाळी आणि प्रेम आपुलकीची प्रदुषण रहित दिवाळी | 2 best short poem on diwali in marathi

केशवराव चेरकु आणि संध्या देशपांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem on diwali in marathi

काव्यबंध साहित्य समुह
आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दि. — २९/१०/२०२३
विषय :- सण दिव्यांचा

आजची दिवाळी | short poem on diwali in marathi

आजची दिवाळी आणि प्रेम आपुलकीची प्रदुषण रहित दिवाळी | 2 best short poem on diwali in marathi

दिपावली हा सणच दिव्यांचा
समृद्धीचा आणि चैतन्याचा।
तेजोमय लक्ष लक्ष दिव्यांचा
उत्सवाचा भारतीय परंपरेचा।।१।।

तोच फराळ अन् तेच फटाके
तीच दिवाळी आजही असते।
पण ते प्रेम अन् तो जिव्हाळा
ती आपुलकी मात्र कुठे दिसते।।२।।

दिवाळीची खरेदी करण्यासाठी
सर्व मित्र मंडळी एकत्र जायची।
एक सारखे कपडे,आकाश दिवे
त्यात एकीची भावना असायची।।३।।

मोजकेच पैसे मोजकीच खरेदी
पण आनंद मनमुराद लुटायचा।
मित्र मंडळी नातलगांचा उत्साह
मग ओसंडून वाहताना दिसायचा।।४।।

उटण्याचा सुगंध,दिव्यांची रोषणाई
फटाक्यांचा जोश,फराळाचा गोडवा।
माणसाला माणसाशी जोडून ठेवी
परंपरागत दिपावली आणि पाडवा।।५।।

फराळाला आमच्या कडे यायचं
एकमेकांना आमंत्रण असायची।
आलेल्यां प्रत्येकाची विचारपुस
आपुलकी आणि प्रेमाने व्हायची।।६।।

आता मॅसेज मध्ये फराळ फटाके
अन् बरोबर शुभेच्छा संदेश सुध्दा।
मित्र, शेजारी, नातलग यांच्या ही
ऑनलाईन गप्पा अन् भेटी सुध्दा।।७।।

फारवर्डेड मेसेजेस येतात आता
माणसांच्या उथळ या भावनांनी।
जुळतील का हो मन कधी आता
अशाच उसणे आव आणल्यानी।।८।।

केशवराव चेरकु
कोपरखैरणे,नवीमुंबई

short poem on diwali in marathi

काव्य बंध समूह आयोजित साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा

विषय :- सण दिव्याचा

प्रेम आपुलकीचीफ प्रदूषण रहित दिवाळी | short poem on diwali in marathi

प्रेम आपुलकीची प्रदुषण रहित दिवाळी | 2 best short poem on diwali in marathi

आली आनंद घेऊन बघा

दिवाळी
प्रदूषण टाळून करू साजरी ही दिवाळी

विचाराची पेटवू छान
ज्योत
सहकार्याची खाऊ सर्व मिळून गोळी

फटाक्याचा आनंद काय
तो क्षणभर असतो
नकळतपणे होत्याचं नव्हतं करतो,

सर्वत्र धूर धडाडधूम
आवाजाने प्रदूषण पसरतंय सगळी कडे
साध्याच दिवाळीत आनंदी आनंद गडे,

अघटित काही घडले
तर जीवनाची होते बघा
राखरांगोळी
काय वाईट त्याआधीच घेतलेली आपण
काळजी
यामुळे येणार नाही कुणावर ही पाळी

फटाक्यामुळे नको कोणते दुःख जीवनी
मनऊ सर्व प्रदुषणमुक्त दिवाळी अंगणी,

आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करू साजरी ही
दिवाळी…

स्वजनांच्या गाठीभेटी
घडवून आणते नेहमी ही दिवाळी,

लहानांसाठी तर मजाच
मज्जा असते प्रत्येक दिवाळी
स्वादिष्ट फराळाचा आस्वाद आणते ही दिवाळी..
नवनव्या भेटवस्तू
मिळवून देतो दिवाळी
सान थोरांचा आनंद द्विगुणित करते ही दिवाळी,

दिवाळीचा सण
उत्सवाचे संमेलन
पेटवून पणती
धरा झाली पावन

हा पावन दिवाळी सण
महालक्ष्मीचे करू पूजन
नववर्षांचे स्वागत करुनि
करू आपण प्रेम सिंचन

सत्याची, सुंदर मांगल्यतेची दिवाळी
प्रत्येक घरी सजावी
स्नेहमय आणि प्रेम आपुलकीने सर्वांची
मनी उजळावी,

संध्या देशपांडे

2 best short poem on diwali in marathi

short poem on diwali in marathi

जर आपल्याला देखील कविता लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता.

आमच्या इतर कविता वाचा

लग्न म्हणजे काय असते ?

लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह