short poem on grandmother in marathi

स्पर्श आजीच्या मायेचा | Best short poem on grandmother in marathi 2023

सौ. राधा खानझोडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem on grandmother in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem on grandmother in marathi

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा..
दिनांक:-१४/९/२०२३
विषय :-आजीची छकुली

स्पर्श आजीच्या मायेचा.. short poem on grandmother in marathi

स्पर्श आजीच्या मायेचा | Best short poem on grandmother in marathi 2023

मौल्यवान शिदोरी ही
आहे आपली संस्कृती
आजी आजोबा जिथेही
नाही येणार विकृती…!!१!!

आहे आधारस्तंभ हे
आजी आजोबा घरांचे
राहो शिरी आशीर्वाद
लाभो सान्निध्य थोरांचे…!!२!!

स्पर्श आजीच्या मायेचा
प्रेम पान्हा वात्सल्याचा
आहे आजीची छकुली
ठाव घेई हृदयाचा…!!३!!

माझी लाडाची छकुली
मागे मागे पळवते
दमछाक भारी होई
क्षणातच हसवते…!!४!!

नाही दिसताच आजी
होई कावरी बावरी
धुंडी कोपरा कोपरा
दिसताच ती सावरी…!!५!!

सौ. राधा खानझोडे
नागपूर

short poem on grandmother in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *