short poem on grandmother in marathi

आजी जन्मोजन्मी मिळो हीच | short poem on grandmother in marathi 2023

रजनी घाटुले यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत short poem on grandmother in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

short poem on grandmother in marathi

काव्य बंध समूह आयोजित स्पर्धा
काव्य लतिका
विषय- आजीची छकुली
दिनांक- 14/09/2023

आजी जन्मोजन्मी मिळो हीच | short poem on grandmother in marathi

आजी जन्मोजन्मी मिळो हीच | short poem on grandmother in marathi 2023

सौभाग्याने म्हणायचे की दुर्भाग्याने
कळत नाही बाळ अवस्था पासूनच
कायम राहायला वाट्याला आले
स्वतःचे घर व गाव सोडून आजोळीच

माझी आजी उत्तम स्वभाव गुणाने
गुण गायला तिच्या कर्तव्याचे शब्द कमीच
खूप जिव्हाळा लावायची बोल प्रेमाचे
वडिलांच्या निधनानंतर सावली तिचीच

प्राथमिक शाळेत नेवून देणे आणणे
कार्य तिचे माझ्यासाठी नित्याचेच
शिक्षिकेला महिन्यातून एकदा भेटणे
मी अभ्यासात प्रवीण व्हावे या उद्देशानेच

घर चिरेबंदी मोठा वाडा आजीचे
अंगणी फळ झाड, फुलझाड जणू बगीच्याच
शेजारी खेळायला नाही पाठवायचे
वाईट सवय लागू नये ठेवले दुरूनच

माध्यमिक शाळेत मैत्रिणी सवे खेळायचे
पावसाळी शेवाळ्यात पाय घसरताच
आजी विक्स लावायची कोमल हाताने
वेदना गायब तिच्या हातात जणू जादूच

बाजारात जातांना मला सोबत घेत असे
येतांना खाऊ देण्याची आठवण पक्कीच
क्षणोक्षणी आनंद दिला गुलमोहराप्रमाणे
संस्काराचे धडे ही दिले आवर्जूनच

मी मोठे होताना धडे दिले जबाबदारीचे
सांग बोल भाषेत जपायची नम्रताच
जीवन सफल होण्यास दिले पाठ मार्गदर्शनाचे
ईश्वराला प्रार्थना आजी जन्मोजन्मी मिळो हीच

रजनी घाटुले
उमरेड, नागपूर

short poem on grandmother in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

1 thought on “आजी जन्मोजन्मी मिळो हीच | short poem on grandmother in marathi 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *