वेदना सैनिकाच्या | Best Soldier Marathi Poem in 2024

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Soldier Marathi Poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Soldier Marathi Poem in 2024

काव्यबंध समूह आयोजित

काव्यलतिका
रविवारीय काव्यस्पर्धा

दिवस : २५/०२/२०२४

विषय :- सैनिकासाठी कविता

वेळ:- रात्री ११.५९ पर्यंत

वेदना सैनिकाच्या | Soldier Marathi Poem in 2024

आपणा सर्वांच्या रक्षणासाठी
रक्ताचा थेंब न् थेंब ज्यांंचा जाइ
या भारताचा धन्य तो पुत्र
धन्य माऊली त्याची आई… १

आपण झोपतो निवांत रातीला
सैनिकांचा मग ठेवा मान
म्हणून लाल बहादूर म्हटले
जय जवान जय किसान… २

उपकार अनंत सैन्याचे असती
आपल्या हर एक श्वासावर
आपण असतो कुटूंबात मस्त
सैनिकांना सीमेवर होणाऱ्या त्रासावर.. ३

रात्रीचा दिवस करून बिचारे
करत असतात देशाचे रक्षण
चीन पाकिस्तान सम दुश्मन आपले
टपले करण्या आपले भक्षण.. ४

आडव्या येणाऱ्या शत्रूंना ते
काडत असती उभे चिरुन
कधी पाहत असतील आपल्या
बायको पोरांना डोळे भरून.. ५

म्हाताऱ्या आई बापाची सेवा
पत्नी त्याची करून उरते
विरह सख्याचा सहन करत
फक्त आतून मनात झुरते.. ६

नेत्यांची आमच्या मुले परदेशी
पुढारी खाती जनतेचा मेवा
लेकरं गरिबांची इमानेइतबारे
करती सरहद्दीवर देशसेवा… ७

पुढच्या सुट्टीत माझा धनी
येईल नक्की घरी रहायला
पाऊल पाऊल टाकतय बाळ
डोळे भरभरून पहायला… ८

बळावतोय आजार बापाचा
शेवटचं एकदा बघावं लेकाला
वृध्द आई डोळे लावी
सीमेकडील रस्त्याच्या त्या टोकाला.. ९

एकदाची सुट्टी होता मंजूर
मनात येतो आनंदाचा पूर
काय काय करेन मी जाऊन घरी
मनात माजून जाइ काहूर.. १०

घरी जायच्या असता घाईत
वरून अचानक येई संदेश
आक्रमण झाले सुट्टी रद्द
चला लवकर चढवा गणवेश.. ११

अंदाधुंद गोळीबार, स्वप्ने चक्काचूर
दुश्मनाची गोळी घुसते छातीत
विश्व डोळ्यापुढे तरळे क्षणात
मृतदेहच जाइ गावाच्या मातीत.१२

अशी जिंदगानीची व्यथा सैनिकाच्या
ना आई, बा, भावंडे, पत्नी, मुले
प्यावे लागे मरताना पाणी म्हणून रक्त
हात करती सलामी वर तिरंगा डुले.. १३

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद पंढरपूर
7038313235

Soldier Marathi Poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *