Subhedar Malharrao Holkar: मराठी इतिहास

“Malharrao Holkar: मराठी इतिहास” जेव्हा मल्हारराव आणि बाजीराव आमने सामने उभे राहतात.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

होळकर यांचे गाव जेजुरी जवळचे ‘होळ’ मुरूम होळकर नाव ह्याच गावामुळे आले खंडूजी वीरकर खुटेकर धनगर चौघुले(पदवी)१ आणि तळांदे सुल्तानपूर यांच्या भोजराजजी बारगळ यांची बहीण यांच्या पोटी मल्हारराव यांचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यू नंतर भाऊबंदांनी जमिनी हडपल्या मुळे मल्हारराव आपल्या आई सोबत वयाच्या तिसऱ्या वर्षी मामा कडे राहायला आले. मल्हारराव जाणते होऊ लागले तसे मेंढरं चरण्यासाठी रानात घेऊन जाऊ लागले, तोच त्यांचा दिनक्रम झाला. एके दिवशी रानात मेंढरं चारत असताना मल्हारराव वारूळा जवळ झोपी गेले, वरुळातून एक नाग येऊन त्यांच्या डोक्यावर फणा काढून बसला.
ही घटना रानात भाकऱ्या घेऊन आलेल्या मातोश्रींनी पाहिली त्यांनी घाबरून घरी जाऊन भावाला बोलावून आणले भाऊ येई पर्यंत नाग आणि मल्हारराव दोघे तसूभरही हलले नव्हते पण माणसांची गर्दी पाहून नाग निघून गेला मतोश्रींनी मल्हारला उठवले तो उठून बसला आईने घरी आणून अंघोळ घालून त्याला जेवायला दिले.
नागाने इतका वेळ बसूनही मल्हारला काहीच कसे केले नाही! ह्याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले,

Malharrao Holkar: मराठी इतिहास

आईने हा काय प्रकार म्हणून जाणकार वृद्धांना विचारणा केली त्यातल्या एकाने ‘माई ब्राम्हणास विचार तो देवाचा काय कौल आहे सांगेल’ मग मतोश्रींनी ब्राम्हणास विचारणा केली ब्राम्हण म्हणाला ‘आई हे मुल जगज्जेता(महापराक्रमी) होईल. त्याला दहा वर्षाचा होईपर्यंत जप, नंतर तो साम्राज्य सांभाळून तुला साम्राज्यपतीची माता होण्याचे भाग्य देईल.
आई ने हेरले की मुलगा शौर्य गाजवेल, मग त्याला रानावनात पाठवण्यापेक्षा युद्ध कसब शिकवावे. त्या दिवसापासून मातोश्रीने त्याचे रानात जाणे बंद करून मामा सोबत घोड्यांची देखरेख सांगितली. तिथेच ते घुडसवारी लढण्याचे कसब शिकले.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

त्या दिवसात सातारचे छत्रपती शाहू राजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई ची वस्त्र नुकतीच देऊन मुलखात लुटालुटीसाठी परवानगी दिली होती. पहिली स्वारी गोदावरी पर्यंत झाली. ‘गंगेत घोडे नाहले’ ही म्हण तेव्हा पासूनच प्रचलित झाली कारण तेव्हा गोदावरीला देखील गंगामाई बोलण्याचा प्रघात होता.
नंतर पेशव्यांनी पवार बनगर वगैरे सगळेच मराठे जमा करून चाल करून गोदावरी ओलांडली तेव्हा पेंढारी सरदार यांच्या पथकात बारगळाच्या पथकात मल्हारराव होळकर हे पाच पंचवीस घोड्यांच्या जिम्मेदारीत पेंढारी यांच्या पथका सोबत होते.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

ह्या चाकरीत तनखा नाही, लूट केली तर ती सगळी सरकार जमा करायची अशी पेशव्यानंची अन्यायवजा ताकीद. अशा प्रकारे नर्मदेच्या दक्षिण तीरा पर्यंत स्वारी लुटालूट केली. मल्हारराव पेंढाऱ्यां सोबत मजल मारून कुणाला कानोकान खबर न लागता दिल्ली पर्यंत गेले. दिल्लीची पातशाही राज्य मोठे फौज. त्यांना मराठी सैन्य कधी आली कधी गेली कसलाच ठाव नव्हता. मराठ्यांनी तिथल्या बड्या असाम्याकडून खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. एका सावकाराकडे खंडणी बदल्यात त्याच्या इलाख्यात नासधूस लुटालुटी न करण्याचा करार केला. पण पगार नाही खाण्याची मारामार घोड्यांना चारा पुरेसा नाही, त्यात सगळी लूट सरकार जमा करायची ह्या सगळ्याला कंटाळून मल्हारराव आणि इतर स्वारांनी त्या सावकाराची बहरलेली शेत कापून घोड्यांना टाकली.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

ही वार्ता जेव्हा बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि त्याचे चिरंजीव बाजीरावास समजली, तेव्हा बाजीराव स्वतः हातात काठी घेऊन ताकीद देण्यासाठी स्वारांच्या गोटात निघाले. त्याला होळकरांच्या राहुटी(Tent) पुढे घोड्यासमोर कापून आणलेलं गवत पाहून बाजीरावाने एका नोकरावर काठी टाकली, मल्हारराव राहुटी समोरच चऱ्हाट(दोरी) वीनत(बनवत) बसले होते. त्यांनी ही घटना पाहिली आणि रागाने ओरडत मातीच ढेकूळच घेऊन बाजीरावास फेकून मारले आणि गुरकावून ‘आम्हाला खायला घालून माजवलस का, जे आता काठ्या मारतोस’ असा जाब विचारला.
बाजीराव नरमला आणि आपल्या राहुटीत जाऊन वडिलांना विचारू लागला. ‘असा परमूलखात बेहुकूम होऊ लागला तर ह्याचे परिणाम काय होतील’ बाळाजी पेशव्यांनी विचार करून मल्हाररावांनी राहुटी लुटन्याचा हुकूम केला.

Subhedar Malharrao Holkar: मराठी इतिहास


ही वार्ता मल्हाररावास समजल्यावर त्यांनी सगळ्या नोकर स्वारांना एकत्र करून एक विचार केला ‘जो माझ्या मरणाचा सोबती असेल त्यानेच थांबावे बाकीच्यांनी वेळीच निघून जाऊन स्वतःचा बचाव करून घ्यावा’. ज्यांना जायचं ते जाऊन उरलेल्या वीस पंचवीस जणांनी मारू किंवा मरू ची शपथ घेऊन घोडी लष्करात जमा केली, खोगीर राहुट्या इतर सामान जाळून टाकले अंगाला भस्म लावून ढाल तलवार घेऊन जवळच्या टेकडीवर जाऊन बसले.
ही बातमी फौजेतल्या एका हटकर धनगर जो बाराशे सैन्याचा सरदार होता त्याला समजली. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मल्हाररावांची बाजू धरून त्याने मल्हाररावांना निरोप दिला ‘हिम्मत धरून राहा जी तुमची वाट ती आमची वाट’.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

त्याने मग पेशव्यांकडे जाऊन “सरदारी करू म्हणता आणि शिपायांना वागणूक ह्या प्रकारची! अशाने निश्चयाचा वेल यशाच्या मांडवास कसा जाईल. रागाच्या भरात जो तुम्हाला ढेकूळ मारु शकतो तो उद्या ह्याच रागात शत्रूवर तुटून पडला तर किती पराक्रम करेल! वीस पंचवीस शिपायांची राहुटी लुटण्यात हुशारी की फौजेत एकोपा ठेवण्यात तो तर काय मारायला तयारच आहे पण जर त्याला आजून धनगर शिपाई सामील झाले तर केवढ्याला पडेल?”. त्यानेच अशी समजूत काढून पेशव्यांना राहुट्या लुटण्याचा हुकूम मागे घ्यायला लावला, त्यांची सरकारात जमा केलेली घोडी त्यांना परत करून वर पंचवीस हजार देऊ असा ठराव केला. बाळाजी विश्वनाथ पेशवा आणि चिरंजीव बाजीराव यांनी टेकडीवर जाऊन त्यांना शिपायांची वस्त्र देऊन मल्हाररावासोबत समेट घडवून आणला.

Malharrao Holkar: मराठी इतिहास

शब्द –

१. चौघुला (गावचा नेता)
२. कौल (मनात, हृदयात)
३. हेरले (विचारविनिमय करून)
४. कसब (कौशल्य)
५. चाल (हमला)
६. तनखा (पगार, वेतन)
७. पेंढारी प्रमाणे (पेंढारी चपळ-जलद घुडसवारी करण्यात तरबेज असत)
८. खोगीर (घोड्यावर बसण्यासाठी चांबडाने बनवलेली बैठक)

Subhedar Malharrao Holkar: संदर्भ

शिवराजकोश.(शब्दार्थांसाठी)
होळकरांची कैफियत. (पृ. १४-१७)

Author – Vikram Rasal

Subhedar Malharrao Holkar: मराठी इतिहास

होळकरांचा अधिक इतिहास जाणून घेण्यासाठी  https://ahilyabaiholkar.in या संकेतस्थळाला भेट द्या.   

आमचे इतर महत्वाचे ब्लॉग वाचा

CLICK FOR FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.3 / 5. Vote count: 6

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 ⁄ 10 =