love poem in marathi text in 2024

महारथी कर्ण | best Suryaputra karn poem in marathi in 2024

भारती राजेंद्र बागल ची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Suryaputra karn poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Suryaputra karn poem in marathi

काव्यबंध आयोजित काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 3 मार्च 2024

महारथी कर्ण | Suryaputra karn poem in marathi

सूर्य देवाने दिलेला
लग्नाआधी लाभलेला
पुत्र कुंती मातेचा पहिला
जन भयाने त्यागलेला

सापडला गंगामाईच्या कुशीत
अधीरत झाला बाप राधामाई आई
काळजाचा गोळा तिच्या
ठाऊक जन्मदात्री नाही

पाच पांडव भाऊ
थोरला कर्ण सहावा
कुंतीच्या हृदयात बंद
रहस्याचा ठेवा

पुत्र सूर्य देवाचा
सूर्यासारखाच तेजस्वी
जन्म क्षत्रिय कुळात जरी
कर्मदात्रीकडे वाढला अभागी

दुष्ट बुद्धी कौरव पुत्र
दुर्योधन मित्र बनला परिस्थितीने
सत्यप्रिय कर्ण जरी
बद्ध होता वचनाने

महारथी महादानी होता
कर्ण धनुर्धारी
कवच कुंडले ही दान केली इंद्रास
मृत्यूस कारण ठरणारी

जन्मभर जागला
दिल्या वचनाला
ना त्यागले दुर्योधनाला
न मारले पांडवाला

वृषालीचा पती
अजिंक्य योद्धा
झाला श्रेष्ठ धनुर्धारी
द्रोणाचार्यांनी विरोध करून सुद्धा

शिकविले युद्ध
परशुराम गुरुने
खोटेपणाने मिळवता विद्या
त्यागले त्यास दुष्ट शापाने

कवचकुंडलधारी सूर्यपुत्र
पसरली दुर्वासा ऋशींच्या वराची महती
सर्वश्रेष्ठ योद्धा
दानशूर कर्णाची ख्याती

वचनामुळे सापडला
दुर्योधनाच्या अधर्मी सापळ्यात
न्यायनीती निष्ठावान कर्ण जरी
विरोध नाही केला द्रौपदी वस्त्रहरणात

कर्तव्यात कर्णाचे
पूर्ण होते समर्पण
असत्याच्या साथीत जरी
नित्य तळमळायचे मन

आई भाऊ वहिनी
सारे असून जिव्हाळ्याचे
जन्मभर एकटेपणाने भोगले
भोग त्याने दुर्भाग्याचे

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

Suryaputra karn poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *