✍︎ कु.वैष्णवी सं.ठाकरे आणि सौ .रोहिणी अमोल पराडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Day Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गुरू आमचे देवेंद्राचे रुप | Teacher Day Marathi Kavita
काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक:- २४/०८/२०२३
विषय :- शिक्षक दिन
कवितेचे शिर्षक :- गुरु आमचे देवेंद्राचे रूप

बोलावे काय हे कळता – कळत नाही.
भावना आहेत मनी , पण शब्द सुचता – सुचत नाही.
आहात तुम्ही दयाळू , मनमोकळे , स्वाभिमानी.
तुमच्या पुढे फिक्या पळतील , चांदी सोन्याच्या नाणी.
निरक्षर माणसाला ही शिकवता तुम्ही आयुष्याची उजळणी.
धन्य झालो आम्ही , कारण तुमच्या कळून मिळाली आम्हा शिक्षणाची वाणी.
हसत – खेळत , नाचत – बागळत सर्व गुण संपन्न तुम्ही झालात.
भाग्य लाभले आम्हा कारण तुम्ही या शिक्षण क्षेत्रात आलात.
शिक्षणाचा मुल मंत्र तुम्ही आम्हा अडाण्यांना दिलात.
खरं सांगतेय मी कोळशाला हिरे तुम्ही केलात.
मायेने सांभाळली तुम्ही परक्यांची मुले.
ज्ञान गंगेच्या सागरात तुम्ही , आम्हा आयुष्य नवे दिले.
रागाने किव्वा प्रेमाने तुम्ही यशस्वी आम्हा केले.
तुमच्या मुळेच आमचे संपूर्ण स्वप्न पूर्णत्वास गेले.
साक्षात देव इंद्राचे रूप आता मानावे तुम्हाला.
स्वतः काटेरी मार्ग निवळून , सरळ वाट दाखवली आम्हाला.
संपूर्ण जगाची ओळख करून दिली आमच्या छोट्याश्या जीवाला.
एवढेच मागणे आहे , आता माझे देवाला
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यश मिळो तुम्हा – आम्हाला.
✍︎ कु.वैष्णवी सं.ठाकरे
हाडाचा शिक्षक | Teacher Day Marathi Kavita
काव्यबंध समूह काव्य लतिका आयोजित स्पर्धा
स्पर्धा करीता
दिनांक :– २४/०८/२०२३
विषय :– शिक्षक दिन
शीर्षक:- हाडाचा शिक्षक

हाडाचा शिक्षक शिकवतो
कच्च मडक पक्क करुनी
तोच वर्ग तोच फळा
विद्यार्थी नवे घडवी जीवनी
काही शिक्षक शांत प्रिय
काही शिक्षक कठोर शिस्तबद्ध
नावडता विषय होतो आवडता
कळता सोपे सूत्रशब्द
चंदनाप्रमाणे झिजून देह
दरवळतो ज्ञानाचा सुगंध
ज्ञानाचे अद्भुत शिल्पकार
संस्काराचे घालुनिया बांध
शिक्षकांची व्यथा जाण
मुले असती सुट्टीत मस्त
शिक्षक असतात पेपर
तपासण्यात व्यस्त
शिक्षकांचे एक ब्रीदवाक्य
“घडा घडवा स्वतः बरोबर दुसऱ्यांना”
देवाघरच्या कळ्यांवर ज्ञानाची फुंकर
घालून संस्कार केले उमलविताना
विद्या मंदिरी ज्ञानाच्या
शिक्षणाची गंगा वाहत
उंच भरारी घेतात मुले
उच्चपदस्थ पद भूषवत
गावोगावी जाऊन शिकवणे
खेडेगाव केले साक्षर
शिकून गेलं सातासमुद्र पार
शेतकऱ्याच पोर ओळखून अक्षर
सौ .रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर

teacher day marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह