Teacher Day Marathi Quotes

हृद्यांकित गुरुजन आणि ज्ञानाचा सागर | 2 Best Teacher Day Marathi Quotes

रवी आटे आणि सौ. सुनिता कावसनकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Day Marathi Quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

हृद्यांकित गुरुजन | Teacher Day Marathi Quotes

काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका काव्य लेखन उपक्रम
विषय -शिक्षक दिन
शीर्षक-❤️हृदयांकित गुरुजन ❤️

हृद्यांकित गुरुजन | Teacher Day Marathi Quotes

भूतलावरची पहिली शिक्षिका अर्थातच आईच
हसणे रडणे गुणगुणणे शिकवी गर्भातच घाईत

स्वप्नांच्या जगातून शिक्षकच मला जागा करतो
अन्यथा या जगात माणूस अभागा मरतो

त्याच्याशीच प्रत्येकाची जुळलेली असते नाळ
त्याच्याच नावाने सजले आहे माझे तुमचे भाळ

नसे काही उणे त्याच्या प्रकाश संदेशात
शब्दांनीच पोहोचवतो रम्य नंदन वनात

दिवस असतो त्याचाच व रात्रही असते त्याचीच
अविरत हृदयांवर कोरत असतो नक्षी ज्ञानाची

शिकवतो तो विज्ञान -तंत्रज्ञान मुल्ये मानवी
मनातली त्याच्या तळमळ सर्वांना जाणवी

शिक्षण प्रशिक्षणातूनच होऊ शकतो विकास
कृषी उद्योग व्यापाराचा प्रकाश पडतो झकास

सर्वांनी पाठीशी उभे राहावे शिक्षकांच्या
भूमिका वठवाव्यात समाज रक्षकांच्या

शिक्षकही माणूस आहे तळहातावर त्याचे पोट
नसेल जरी अनुदान नेसवू त्याला भरजरी कोट

देशवासीयांनो शपथ घेऊया शिक्षक दिनी
देशाच्या विकासा सर्वस्व अर्पण त्याच्या चरणी

रचना-रवी आटे. सानपाडा ;नवी मुंबई.

ज्ञानाचा सागर | Teacher Day Marathi Quotes

काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक:- २४/०८/२०२३
विषय :- शिक्षक दिन
कवितेचे शिर्षक :- ज्ञानाचा सागर..

ज्ञानाचा सागर | Teacher Day Marathi Quotes

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन,
जन्मदिन यांचा असे शिक्षकदिन..
शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू अन्
राष्र्टपती होते ते करू त्यांना वंदन..

छमछम बसता छडी पाठी वळते
वळणदार अक्षर सुंदरसे,
गुरुजी देती प्रकाश ज्ञानाचा मग,
विद्यार्जन करता आयुष्याचा मार्ग दिसे

विद्येचे माहेरं, बुद्धीचे आगरं,
ज्ञानाचा सागर गुरू अखंडीतं..
तेजाचा प्रकाश गुरूचेच ठायी
गुरूविना नाही ज्ञान अपरिमित..

गुरु विद्येचा जननी जनक
गुरू ज्ञानसिंधू असे..
व्रत घेऊनी समाजसेवेचे,
ज्ञान जगाला सदैव अर्पितसे..

गुरू दाखवी मार्ग सन्मार्गाचा
गुरू देतसे मंत्र सत्शीलतेचा नवा..
शिक्षण बनवी समाज सुदृढ
गुरु तेजोमय ज्ञानाचा दिवा ..

विद्यार्थ्याला सिद्ध करून उच्च
शिखरावर नेई तो ज्ञानदायी गुरु..
रोपट्याला प्रतिकूल परिस्थितीत
समृद्ध वृक्ष बनवी तो गुरु..

गुरू श्रेष्ठ जाण नको प्रमाण
गुरूस्थान युगांतरे अबाधित..
गुरूचा महिमा असे अगाध
मिळे यश किर्ती अकल्पित ..

सौ. सुनिता कावसनकर..
छञपती संभाजीनगर..

ज्ञानाचा सागर | Teacher Day Marathi Quotes Kavita

teacher day marathi quotes

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *