Teacher Day Marathi Shayari

गुरुमाऊली आणि गुरुजी तुम्ही आहात म्हणून | 2 Best Teacher Day Marathi Shayari

सौ .भारती राजेंद्र बागल आणि संजय देशमुख पिपंरी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Day Marathi Shayari विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

गुरुमाऊली | Teacher Day Marathi Shayari

काव्यबंद समूह
काव्य लतिका
दिनांक 24 ऑगस्ट 2023
विषय शिक्षक दिन

शीर्षक

🌹 गुरुमाऊली🌹

गुरुमाऊली | Teacher Day Marathi Shayari

जग बदलवण्याची ताकत
एका शिक्षकात असते
सर्वांना समान ज्ञानाच अमृत पाजणारी
तिच्यासारखी दुसरी माऊलीच नसते

माणसं म्हणतात दिवा जळतो
जळत असते वात
प्रत्येक यशस्वीतांच्या पाठी असतात
ज्ञानदात्या शिक्षकांचे हात

सर्वगुणसंपन्न मूर्ती घडवण्यासाठी
करतात जीवाचं रान
जीवन मैदानात लढायला शिकवताना
विसरतात देहभान

दगडाचा देव करतात
करतात मातीचा घडा
अतिदक्षतेने काळजी घेतात
जाऊ न देती मनाला तडा

ईश्वराधी वंदन करावे
ज्ञानदात्या गुरुमाऊलीला
ईश्वर भेटी योग्य बनवतात
सदावर्तनी आपणाला

शिक्षकांमुळेच घडते
सुंदर संस्कारी भावी पिढी
नित्य नव्या उपक्रमाने शिकवतात
जपायला परंपरा अन रूढी

जगण्यासाठी जेवढे श्वासाला
तेवढेच महत्त्व द्यावे शिक्षकाला
आयुष्यभर ज्ञानदान करून जो शिकवतो
परस्थिती ही बदलवायला

परीसचअसतो शिक्षक
अज्ञानाला ज्ञानवंत बनवणारा
जीवन चित्रात सुंदर
रंग भराय शिकवणारा

आई वडील घालतात जन्माला
शिक्षक सुंदर आकार देतात आयुष्याला
संयमाने शिकवतात
भवसागर पार करायला

शिक्षकच असतात
सुंदर आनंदी जीवनाचा पाया
शिक्षकाविन गेले
कित्येकांचे आयुष्य वाया

जीवनाला देतात
तेच नवी दिशा
कोवळ्या कोवळ्या मनात भरतात
उच्च ध्येय स्वप्नांची आशा

अज्ञानाचा अंधार घालवण्या
आयुष्यभर झटतात
उज्वल देशाच्या भवितव्यासाठी
ज्ञानवंत पिढ्या घडवतात

गुलामगिरी नष्ट करण्या
देतो ज्ञान अनुभवांची शिदोरी
स्वाभिमानाने जगण्या
आत्मविश्वास भरतो उरी

सर नाही जगात कोठे
आईच्या प्रेमाला
सत्कार्य अन्
गुरूंच्या आशीर्वादाला

निरपेक्ष भावनेने
दान देतो विद्येचे
पाया होऊन स्वतः
शिखर चढवतो यशाचे

प्रत्येक विद्यार्थ्यात
स्वतःस तो पाहतो
प्रकाशवंत करण्या त्याला
स्वतः जळत राहतो

एक थेंब खर्ची घालून
जन्म देतो बाप
चारित्र्य पूर्ण मूर्ती घडवतो
शिक्षक पाठीवरती देऊन थाप

मनोमनी नित्य स्मरावे
आपल्या गुरु माऊलीला
ईश्वराधी वंदन करावे
साक्षात दिसणाऱ्या शिक्षकरुपी ईश्वराला

🙏🙏संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक शिक्षका चरणी समर्पित🙏🙏

🌹दोन शब्द फुले🌹

सौ .भारती राजेंद्र बागल, वडुज सातारा

गुरुजी तुम्ही आहात म्हणून | Teacher Day Marathi Shayari

काव्यसंग्रह समूह…आम्ही मराठी भाषेचे शिल्पकार, गुरुवार. काव्य लतिका स्पर्धा.2023.
🌻🌸 गुरुजी तुम्ही आहात म्हणून🌸🌻

गुरुजी तुम्ही आहात म्हणून | Teacher Day Marathi Shayari

पोरगी-पोरगं शाळंत जातंय
लिहाय-वाचायंबी शिकतयं,
मराठी बरोबर इग्रंजी वाचतयं,
थोरा-मोठयांचा मान ठेवतंय,
गुरुजी तुम्ही आहात म्हणून–!

झेडपी चा पोरगा स्काॅलरशीपला आला
राज्यात शाळेचा बोलबाला झाला
गावकरी सारा आनंदून गेला
शाळेचा पट वाढून आला
गुरुजी तुम्ही आहात म्हणून.!

शिक्षणाची गंगा दारात आली
शिक्षणाची गोडी पोरांना लावली
ज्ञानदानाची चुरस शिक्षकात लागली
शिकवून-सवरुन सारी शहाणी झाली
गुरुजी तुम्ही आहात म्हणून..!

गणित-शास्रात रस दावतयं,
इतिहास-भूगोल ध्यानात ठेवतयं.
वकील, इंजिनिअर-डॉक्टर झाला,
गावचा पोरगा सातासमुद्रापार गेला.
गुरुजी तुम्ही आहात म्हणून–!

गाव सारा साक्षर झाला,
अधिकाऱ्यांचा गाव म्हणून,
देशात बोलबाला झाला,
चमत्कार हा तुमच्यामुळं झाला,
गुरुजी तुम्ही आहात म्हणून
गुरुजी तुम्ही आहात म्हणून…!!!

 कवी-संजय देशमुख पिपंरी, पुणे-411018
गुरुजी | Teacher Day Marathi Shayari

teacher day marathi shayari

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
23 × 25 =