रूपाली मठपती आणि सौ. सुवर्णा अनिल बाबर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Day Marathi SMS Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शिक्षक – एक शिल्पकार Teacher Day Marathi SMS Kavita
काव्यबंध समूह आयोजित….
गुरुवार:- काव्यलतिका स्पर्धा. २०२३
विषय:- शिक्षक दिन
शीर्षक :-शिक्षक – एक शिल्पकार
…………………………..

काय भेट द्यावी गुरुवर्य आपणास
दिलात आकर मातीच्या गोळ्याला
दाखविला मार्ग नवा जीवनाचा
अर्थ दिला नवा जगण्याला …१
आहात गुरुजी तुम्हीच
शिल्पकार जीवनाचे आमच्या
करावी तुलना कशी
परोपकाराची तुमच्या …२
अफाट ज्ञानरुपी सागरात
हेलकावे खाणाऱ्या आमच्या नौकेला
यशाचा दाखवून किनारा
अखंड तारत ठेवले प्रवासाला …३
छम छम छडीचे फटके
बसले जेव्हा हातावर
ज्ञानचे छत मिळाले
तेव्हाच डोक्यावर …४
महती काय सांगावी गुरुजनांची
होईल दाटी इथे शब्दांची
अ पासून अः पर्यंत ओळख
करून दिली जीवनाच्या बाराखडीची …५
धैर्य, हिम्मत आणि बुद्धीने
लढण्याची शिकवण शिवरायांची
वाचन, लिखाण, अपार कष्टाने
यशाच्या पायऱ्या चढवल्या गुरुवर्यांनी …६
शत्रूशी दोन हात करून शिवरायांनी
रोवला स्वराज्याचा झेंडा इतिहासात
अज्ञानाच्या अंधारात गुरुवर्यांनी
रोवला अक्षरज्ञानाचा तुरा समाजात …७
जन्मादात्यां नंतर गुरुजी
आपणच आमचे भाग्यविधाते
निमित्त फक्त शिक्षकदिनाचे
योगदान तुमचे युगायुगांचे …८
शिक्षकदिनी नतमस्तक होवूनी
गुरुदक्षिणी स्वीकार करा
चरणी आपल्या करीते
मानाचा मुजरा …९
……………………………….
सौ. सुवर्णा अनिल बाबर, पुणे
द्रोणाचार्य Teacher Day Marathi SMS Kavita

काव्यबंध समूह
काव्यलतीका
प्रत्येक गुरुवारी होणारे स्पर्धा
दिनांक 24. 8 .23
विषय .शिक्षक दिन
कवितेचा शीर्षक. द्रोणाचार्य
प्रयत्नांच्या रथाला आश्र्वे जुंपून
परिश्रमाचा चक्रव्यूह भेदून
सूर्यपुत्र सारख्या समस्यांना
निरुत्तर करायला भाग पाडणारे
शिक्षक माझे द्रोणाचार्य……
प्रगतीच्या वाटेवर
मनाची मरगळ मोडून
यशाच्या यज्ञकुंडात
आळसाला अहूती द्यायला लावणारे
शिक्षक माझे ऋषी पुत्र………
शंका ..कुशंकाना
तिलांजली देऊन
भव्य दिव्य प्रांगणात
अजिंक्य धनुर्धारी बनवणारे
शिक्षक माझे प्रेरणादायी..,
अहंकाराचा वध
अगत्याचे आहे
यासाठी लढणे शिकवणारे
अभिमानाची गधा उचलायला लावणारे
शिक्षक माझे गधाधारी…..
दिशाच नसणाऱ्या
अथांगविश्वसागरात
तरंगणाऱ्या माझ्या नावेला
आधारस्तंभ बनणारे
शिक्षक माझे दीपस्तंभ……
अस्ताव्यस्त वादळात
काळया कुट्ट अंधारात
भरकटलेल्या माझ्या मनाला
ध्येयपूर्तीची दिशा दर्शविणारे
ध्येयवादी माझे शिक्षक……
ज्ञानयोग आचरण करून
ज्ञान विज्ञान संपन्न करून
ज्ञानाच्या बळावर सुखाने जगता यावे
याचं ज्ञान देणारे
ज्ञानी माझे शिक्षक..,…..
सूर्यासारखं तळपून
वटवृक्षाच्या छायेत बसवणारे
ज्ञानाच्या मूलमंत्रावर उदार अंतकरणाने
जग जिंकायला शिकवणारे
अजिंक्य माझे शिक्षक….
ध्येयाच्या मार्गावर चालताना
काय गमावलं काय मिळवलं
याकडे लक्ष न देता
ध्येय प्राप्ती करून देणारे
ध्येयवादी माझे शिक्षक…..
वस्तूंचे मूल्यमापन
व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन
बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं
हे सक्तीने शिकवणारे
शिक्षक माझे हाडाचे……
बुद्धी भावना संकल्प शक्ती
याचा संघटित रित्या संस्करन करून
संपन्न व्यक्तिमत्त्वाचा
संस्काराचा संकल्प घ्यायला लावणारे
संघर्षाचे शिक्षक माझे…..
विद्यार्थ्यांच्या अंगी नाविन्यता
आवश्यक ती अनुरूपता
अभ्यासामधील कृतिशीलता शिकवून
विचार सभेत उपस्थित करणारे
उपासक माझे शिक्षक…
अभ्यासामध्ये रुची निर्माण व्हावी
स्वतंत्रता निर्माण व्हावी
चरित्र संपन्न माणूस घडावा
त्यासाठी मुक्तपणे भरड पोषण करणारे
धडपडणारे शिक्षक माझे….
सन्माननीय नागरिकत्वाचा अंगीकार करून
स्वतःचा समाजाचा देशाचा
कल्याण साधता येईल
अशा वातावरणाची निर्मिती करणारे
कल्याणकारी शिक्षक माझे….
वयाने झालो मोठे
राहू तुमच्यासाठी छोटे
चरणावर सदैव तुमच्या
कृतज्ञतेची वाहू फुले
पण सदैव राहू विद्यार्थी तुमचे
रूपाली मठपती
teacher day marathi sms
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह