श्री श्रीकांत पाटील आणि जयद्रनाथ आखाडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Teacher Marathi Quotes Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
ज्ञानसागर | Teacher Marathi Quotes Kavita
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक – २४/०८/२०२३
विषय -शिक्षक दिन
शीर्षक – ज्ञानसागर

विद्येचा अथांग सागर
बुद्धीचे शाश्वत माहेर
गुरुजींच्या शिकवणीचा
न कधी पडावा विसर //१//
त्यागाची भूमिका सखोल
विद्यार्थ्यांना अमूल्य ज्ञान
वाहते अमृतासम गंगा
कार्यक्षमता तिची महान //२//
उंच शिखर सर करण्यात
गुरुजींचा सिंहाचा वाटा
ज्ञानामृत पाजण्यात
न कधीही केला तोटा //३//
छडीच्या ओळी पडून
पिढ्यानपिढ्या घडल्या
खट्याळ व वात्रटांच्या
अनेकदा खोडी मोडल्या //४//
रोज गणिताच्या तासाला
गुरूजींची रंगीत तालीम
तासाला हजर नसण्याच
विद्यार्थ्यांच औषध जालीम //५//
मराठीच्या वेशीवरून
इंग्रजीच्या सीमेपार
गुरुजींचे शिष्य सारेच
प्रगतीपथावर स्वार //६//
शाळेच्या मंदिरातील
शिक्षक म्हणजे पांडुरंग
विद्यार्थ्यांच्या मनातील
सहज जाणतात अंतरंग //७//
शहरात किंवा गावात
असोत कुठेही शाळा
शिक्षक तिथले दैवत
आनंदाचा तो निर्वाळा //८//
कृतज्ञता तुमच्या प्रती
विनम्रतेचे अभिवादन
सदैव सहवास घडावा
हेचि आमुचे प्रतिपादन //९//
श्री श्रीकांत पाटील
राजधानी रायगड
गुरूची महानता | Teacher Marathi Quotes Kavita
काव्यबंध समूह काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक २४/८/२०२३
विषय. … शिक्षक दिन
शिर्षक. .. गुरुची महानता

भारताचे विद्वान , माजी राष्ट्रपती
सर्वश्री डाक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
भारत रत्नाने केलेले सन्मानित
त्यांच्या नावाने,झाला शिक्षक दिन….१
पाच सप्टेंबर आहे त्यांचा जन्मदिवस
शिक्षणावर होते प्रेम,आत्मविश्वास
शिक्षक पेशातून,घडविले विद्यार्थी
म्हणून साजरा होत़ो,हा दिवस खास… २
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते
विद्यार्जन देण्याचे आणि घेण्याचे
मैत्री संबंधातून द्यावी लागते विद्या
सार्थक होईल दोघांच्या जीवनाचे ….३
आई,वडिल,आपले पहिले गुरु
तरी देतात शिक्षक,सर्वच ज्ञान
तेच ठरतात,खरे जीवन साथीदार
संपवतात आपले सगळे अज्ञान …४
शिक्षक आणि विद्यार्थी जीवनात
जरी गेला,त्यांच्यापासून खरा दूर
सर्वांच्या आठवणीचा हा दिवस
त्यामुळे विसरत नाही, उपकार …५
जरी असला विद्यार्थी, ढ वा गुणवंत
शिक्षकच असतो,जीवनाचा शिल्पकार
घडवितो प्रत्येकाला,योग्य दिशावान
तेव्हाच होतो श्रेष्ठ, शिक्षक सत्कार…६
शिक्षकाची महती,आहे पहिल्यापासून
गुरु विणा विद्या, ठरते फोल,निष्फळ
गुरु आणि शिष्याचे नाते इतिहासात
जरी लोटला हजारो वर्षांचा काळ …..७
प्रत्येक क्षेत्रात असणारे शिष्य गुरु
संत प्रथेतही निपजला,श्रेष्ठ सदगुरु
यानेच घडला खरा,हा शिक्षक दिन
महात्मा ज्योतिबा,सावित्री सद्गुरु. . ८
ज्ञानाचा दि्वा घरोघरी लावा प्रत्येकाने
ना जात, ना धर्म पंथ मानते ज्ञान
शिक्षकाचा मान
शिक्षकाचा समाजाप्रती हा सद्गगुण
शिक्षक दिनानिमित्त करा संकल्प, बहुमान ….९
जयद्रथ आखाडे
जिल्हा पुणे

ज्ञानसागर आणि गुरूची महानता | 2 Best Teacher Marathi Quotes Kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह