पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
या कथेचा भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

“मस्त दिसतोय ड्रेस तुझ्यावर!”
“थँक यु! आई ने घेतलेला मागच्या महिन्यात.”
“चला निघायचं मग?”
“हो पण जायचय कुठे आपल्याला?”
“आहे एक हॉटेल, मस्त जेवण भेटतं तिथे.”
“बरं बरं, पण आपण लवकर येऊ ना परत? करण मग मैत्रीण वाट बघत बसेल.”
अग तू पाहिले चल तर खर, वाट तर माझ्या घरातलेही बघतील, पण मला त्यांचं भान कुठे? आणि कुठेही निघताना असा प्रश्न केलेला मला कधीही आवडत नसे, पण विणकाम करताना गाठ बसली नाही म्हणून धागा तोडत नाहीत, त्यामुळे मी अगदी विश्वासात बोललो.
“नाही नाही, जवळच आहे ते, आणि उशीर नाही होणार. लवकर परतू आपण.”
आणि ती माझ्या बाईक वर बसली, बाईक घेतल्यापासून आई ने मला नवीन गाडी नीट चालवता येणार नाही म्हणून माझ्या बहिणीलाही मागे बसू दिलं नव्हतं. पण आज माझ्यावर विश्वास ठेवून ती बसली. बसताना एकदाच तिच्या हाताने खांद्याला झालेला स्पर्श मला शहारे देऊन गेला. तिने मागे गाडीला घट्ट धरून ठेवलं आणि आम्ही निघालो.
पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
एरवी गाडीला विमानासारखा चालवणारा मी,आज मात्र गाडी अगदी नियमाप्रमाणे चालली होती. कोणतंही अपघाती काम मी करत नव्हतो. ती मला रस्त्यावर दिसणाऱ्या गोष्टींविषयी गप्पा मारत होती आणि मी अगदी मोठ्या समजूतदार माणसासारखं उत्तर देत होतो. आणि आम्ही हॉटेल जवळ पोहचलो. थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेवायच्या ठिकाणी बसलो.
“आवडली का जागा तुला?”
“हो अरे, जागा तर आवडली. आता जेवणाची चव मस्त हवी फक्त. इथे शाकाहारी भेटेल ना चांगलं?”
शाकाहारी? एकही रविवार आजपर्यंत सुना गेला नाही, मटण भेटलं नाही की आईवर किती रागवायचो मी, आणि आज? अरे काय हे, मग हॉटेल मध्ये का आलोय? बाहेर जेवायला आल्यानंतर कधीही शाकाहारी न खाणारा मी शाकाहारी मेनू पाहायला लागलो.
“हो तर, इथे खूप मस्त भेटेल, त्यासाठी तर हे प्रसिद्ध आहे! तू सांग तुला काय खायचं?”
“हो मी संगेलच पण तुझं काय? तुला काय आवडतं? शाकाहारी की मांसाहारी?”
“मी तस दोन्हीही खातो पण मांसाहार टाळतो शक्यतो, आणि इथे आलोय म्हंटल्यावर आज मस्त शाकाहारी खाणार.”
मी आज मनावर किती मोठा दगड ठेऊ शकतो याची जाणीव मला झाली. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि गप्पा करू लागलो. खरं तर बोलत तीच होती आणि मी तिच्याकडे बघत सगळं मनापासून ऐकत होतो. थोड्या वेळात ती शांत झाली आणि मी बोलायला सुरुवात केली,
“एक विचारू?”
“हो विचार ना, अगदी बिनदास्त!”
“जरा खाजगी आहे, राग येणार नसेल तर विचारतो.”
“हो विचार!”
“तुला कोणी बॉयफ्रेंड आहे की सिंगल आहेस?”
एवढं विचारून मी माझा श्वास रोखून धरला, तिला राग आलाच असणार. किती बावळट आहे मी असं फटकाळसारखं कोणी विचारत का? तेवढ्यात तीच उत्तर आलं,
पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
“नाही नाही, मला ह्या प्रेम वगैरे या गोष्टींमध्ये काही रसच नाहीये. का आपलं सगळं सुखदुःख दुसऱ्याच्या हातात द्यायचं, त्यापेक्षा अस अलिप्त राहिलेलं काय वाईट!” एवढं बोलून तिने नजर चुकवली. आजपर्यंत पुस्तके वाचली होती, आज पहिल्यांदा नजर वाचली. खोटं बोलली होती ती. मग मी सुद्धा तो विषय टाळला आणि जेवायला सुरुवात केली. तिने हॉटेलच कौतुक केलं आणि तेव्हा मला खूप बरं वाटलं. तेवढ्यात तिने प्रश्न विचारला,
“तुझ्या आयुष्यात नाही का कोणी अजून मुलगी?”
मी अगदी हसत हसत बोललो,
“आज पहिल्यांदाच एवढा वेळ मी कोणत्या मुलीसोबत घालवला असेल, मला याविषयी काहीच गंध नाही त्यामुळे मी देखील या प्रेमाच्या भानगडीत पडलो नाही.”
“लकी आहेस!”
“का? काय झालं.”
“काही नाही, सांगेल वेळ आल्यावर.”
“अग काय? आणि आता का नाही? अजून विश्वास नाही वाटतं माझ्यावर!”
“अरे अस का बोलतोय? मी बोलले का तसं? पण आता जरा मस्त वेळ चाललाय ना, म्हणून म्हटलं नंतर सांगेल.”
मी तिला पुन्हा पुन्हा विचारू लागलो, मला ते रहस्य कळलंच पाहिजे, मी माझे सगळे प्रयत्न केले आणि तिला शेवटी उत्तर देण्यास भाग पाडले.
“बरं नाराज नको होऊस, सांगते सगळं, पण उशीर नाही ना रे होणार? ती वाट पाहत बसेल आणि खालच्या काकू विचारलीत तिला उशीर का झाला म्हणून.”
“हे बघ, तुला वेळेवर पोहचायची जबाबदारी माझी, तू बोल पटकन.”
“सहा महिने झाले साधारणपणे, सगळं सुरेख चाललं होतं, पण छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आल्या आणि आमचं मोठं भांडण झालं. आणि शेवटी आम्ही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मनोज नाव त्याचं.”
“मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार, मी मगाशीच बोलणार होतो पण मग नंतर राहवलं नाही गेलं. मग अजूनही आहेत का तुम्ही एकमेकांच्या संपर्कात?” मी अक्षरशः भीतीपोटी विचारलं.
“नाही गेले सहा महिने काही संपर्क नाही, फक्त एक दोन वेळा आलेला त्याचाच फोन, पण मग आता त्याचा काही उपयोग नाही आता.”
“शेवटचं बोलणं कधी झालं तुमचं?”
“थांब, पाहून सांगते, तीन महिने झाले.”
मला ते ऐकून बरं वाटलं, तेव्हा मी असा विचार केला की आता काहीही झालं तरी आपण असं काही वागून जायचं की तिला त्याची आठवनच यायला नको.
पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
“अच्छा, मग जाउदे ग, पण चूक कोणाची होती?”
“चूक दोघांची होती, एकमेकांच्या प्रेमात पडायलाच नव्हतं पाहिजे. सोड तो विषय दुसरं बोलू.”
मग मी सुद्धा जास्त प्रश्नावली न मांडता विषय बदलला.
“बरं बरं, पण एक सांगू का, तुला कधीही काहीही मदत पाहिजे असली तर मला बिनधास्त सांगत जा. आणि स्वतःला एकट बिलकुल समजायचं नाही. मनात जेवढं असेल तेवढं सांगून मोकळं व्हायचं, अगदी त्याच्याविषयी असलं तरी, म्हणजे एकदा का त्या गोष्टी निघून गेल्या की नवीन गोष्टींना जागा मिळते.”
एवढं बोलून मी माझा संपूर्ण खांदा तिला देऊन टाकला.
“किती मस्त बोलतोस तू, आणि समजावतो पण छान. गेल्या कितीतरी दिवसांनी हलकं झाल्यासारखं वाटतंय.”
विणकाम मस्त चालू होतं, आणि हल्ली तर गाठी देखील पटापट बांधल्या जात होत्या.
आता निघायची वेळ झाली, मी बिल दिलं आणि आम्ही निघालो.
येताना गाडीवर बसलेली ती आणि जातानाची ती यामध्ये मला खूप फरक जाणवला(तिच्या बोलण्यातून). तिची रूम आली, आम्ही वेळेत पोहचलो होतो.
“थँक्स या लॉट फॉर टुडे! इट वॉज माय बेस्ट डे फ्रॉम लास्ट फिव मंथस्!”
“वेडी आहेस का! आता असंच राहा अगदी मोकळेपणाने, वेलकम टू न्यू वल्ड!”
“नक्कीच, चल तुही सावकाश जा आणि पोहचला की मला नक्की कळव.”
नाही सांगू शकत मी आता कोणत्या ढगात होतो, किती काळजीपोटी बोलली ती? मी त्याच तंद्रीत तिथून निघालो, घरी जाऊन पाहिले तिला मेसेज केला, आणि थोडा वेळ आजच्या भेटीविषयी बोलून दोघेही झोपी गेलो.
पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
दिवसेंदिवस आमच्यातील आपुलकी, ओढ, जवळीकता(नात्यातील) वाढतंच होती. फोन वर बोलताना तासंतास कधी निघून जायचे पत्ता लागतच नव्हता. आमच्यात तसं कोणतंच प्रेमच नातं नव्हतं पण जर दुसरं कोणी हे पाहिलं असतं तर त्याला विश्वासच बसला नसता. अगदी सकाळी पाठवलेल्या “गुड मॉर्निंग” च्या मेसेज पासून रात्रीच्या “गुड नाईट, टेक केयर!” पर्यंत वेळ मी तिच्यासोबतच संपर्कात असायचो. तिला नसेल वाटलं कधी असं पण माझ्याविषयी हे पहिल्यांदा घडत होतं.
आईने मला दळणाचा डबा आणायला सांगितला, आणि मी जाणार तेवढ्यात तिचा मेसेज आला,
“तुला मला आता भेटायला जमेल का?”
चक्क आमंत्रण, मी डबा खाली ठेवला आणि लगेच रिप्लाय केला,
“हो भेटुयात की, काही झालाय का पण असं अचानक मेसेज केला?”
“नाही तसं काही नाही, पण भेटल्यावर बोलू.”
“हो चालेल मी तासाभरात घ्यायला येतो तुला.”
“लगेच नाही जमणार का?”
“एक मिनिट हा, सांगतो लगेच.”
मी तितक्यात घराजवळच्या माझ्या एका मित्राला फोन करून बोलावलं आणि त्याचे पाय पडून विनंती केली की एवढं दळण झालं की आमच्या घरी सोडून दे, आणि घरी कोणी काही विचारलं तर सांग तो येईल अर्ध्या तासात त्याचा कोणी मित्र गाडीवरून पडलाय तो तिथे गेलाय. एक वडापाव आणि चहाची लाच देऊन त्याला कबुल केलं.
“हॅलो, अगं मी येतोय लगेच, थोड्या वेळात खाली येऊन थांब.”
आणि अगदीच “फास्ट अँड फ्युरिअस- दुचाकी एडिशन” सारख्या वेगाने मी तिथे जाऊन पोहचलो. तिचा चेहरा संपूर्णपणे चिंतेने ग्रासला होता. ती गाडीवर बसली आणि मी एक निवांत जागी तिला घेऊन गेलो. तिथे पोहचल्यावर ती उतरते न उतरते तोच मी तिला “काय झालं?” असं विचारलं.
“हो हो सांगते ना, जरा शांत बसूयात आपण.”
“बरं, सांग पण लवकर.”
चिंतेत ती होती आणि त्रास मला होत होता. आणि मला तिची भयंकर काळजी वाटू लागली.
“प्रेमात त्रास एकाला झाला तर दुःख दोघांना होत.” ह्या वाक्याचा मला जिवंत पुरावा भेटला. पण आमचं प्रेम कुठे होतं, किंबहुना तिच्या मनात तसं काही नसेलही, मीच आपला स्वप्न रंगवत असतो.
पंधरा मिनिटे झाली ती शांत बसली होती, आणि मी तिच्याकडे वेड्यासारखं पाहत होतो.
“सांग ना आतातरी, काय झालंय?”
आणि तिने सांगायला सुरुवात केली.
पहिलं प्रेम भाग 3: Love story Marathi
आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा तिसरा भाग. जर तुम्ही पुढील भागाची वाट पहात असाल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.
Author – स्वप्नील खैरनार

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love
Kiti suspense ?..sanga na pudhe kay zhal…ticha bf parat bhetla ka tila ??
भेटेल भेटेल ??
धन्यवाद?
Mast….
Nice story..
Waiting for part 4
धन्यवाद?
??
धन्यवाद?
खुप सुंदर, अप्रतिम लेख.
धन्यवाद?
Very nice story ??I am waiting for next part?
धन्यवाद?
अतिशय उत्तम स्टोरी आहे???
धन्यवाद?
तुमच्या अनमोल अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद, असच प्रेम देत रहा…??
पहिलं प्रेम भाग 4
https://mazablog.online/2020/07/26/%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%aa-first-love-story-marathi/
Khup sundar????
Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.