Torna Fort Information in Marathi

तोरणा किल्ला मराठी माहिती | Torna Fort Information in Marathi Best 2023


तोरणा किल्ल्याचा अभिमानास्पद इतिहास जाणून घेण्यासाठी Torna Fort Information in Marathi तुम्हाला उपयोगी पडेल इतकच नाही तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल

Torna Fort Information in Marathi

तोरणा किल्ला मराठी माहिती | Torna Fort Information in Marathi Best 2023

अति दुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा तोरणा किल्ला, पुणे जिल्ह्यामध्ये आहे .आपल्या सर्वांना अभिमानाची बाब आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून घेतला होता. तोरणा गडाचे प्रचंड गड असे नाव देखील देण्यात आले होते .तोरणा किल्ल्याचे दुसरे नावच प्रचंड गड होते. पुणे या जिल्ह्या पासून तोरणा किल्ल्याचे अंतर सरासरी बघितले तर ६० किलोमीटर अंतर आहे.
तोरणा गडावर उभे राहिल्यानंतर त्यावरून तुम्हाला अतिसुंदर असे लिंगाणा, राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, आणि पुरंदर किल्ला हे सर्व गड स्वतःच्या डोळ्यांनी दिसतात.

तोरणा किल्ला इतिहास

तोरणा किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला तर. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे इसवी सन १६४७ मध्ये सर्वात पहिले तोरणा किल्ला जिंकण्यात आला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना हा किल्ला जिंकून घेतला होता. तेव्हा फक्त शिवाजी महाराज १६ वर्षाचे होते. आणि ही खरच आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे .की सोळा वर्षाचा मुलगा स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी धडपडतो आणि त्या वयात किल्ला जिंकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले असे म्हटले जाते.

शिवाजी महाराजांनी जेव्हा त्या किल्ल्याची पाहणी केली. तेव्हा त्या ,किल्ल्याचा वाढता विस्तार पाहून शिवाजी महाराजांनी तोरणा हे नाव बदलून त्या किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड असे ठेवले.
तोरणा गड जिंकून घेतल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली ,तेव्हा त्यांना तिथे गुप्तधन सापडले .

Torna Fort Information in Marathi

शिवाजी महाराजांनी या गुप्तधनाचा उपयोग राजगड किल्ला बांधण्यासाठी केला. असं म्हटलं जातं की, तोरणा किल्ला हा तेराव्या शतकात बांधला गेला आणि हीच मान्यता आहे. शिवपंथ यांनी बांधलेला हा तोरणा किल्ला. याचे पुरावे बघितले तर लेण्यांन आणि अवशेषावरून दिसून येते की शिवपंत यांचा आश्रम हा तोरणा किल्ला असावा.

बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने, इसवी सन 1470 ते 1486 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला असे म्हटले जाते. यानंतर हा किल्ला निजामशाहीत आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला याच्यावर काही इमारती बांधल्या आणि याला मुख्य पृष्ठ दिले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदी मधून सुटून आले. तेव्हा शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची बांधणी केली. त्या मध्ये सर्वात जास्त रक्कम म्हणजेच 5000 होन इतकी रक्कम तोरणा गडावर त्यांनी त्या वेळेला खर्च केली. आणि त्याला एक नवरूप दिलं.

Torna Fort Information in Marathi

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तोरणा किल्ला मुघलांकडे गेला.
दुःखद गोष्ट म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा तोरणा किल्ला हा मुघलांकडे गेला इतकच नाही तर नंतर शंकर नारायण या व्यक्तीने तोरणा किल्ला परत आपल्या स्वराज्यात आणला. परंतु औरंगजेब बादशहाने तोरणा किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला इसवीसन सतराशे चार मध्ये जिंकून घेतला.

लढाई करून जिंकलेला पहिला बादशहा औरंगजेब याने हा तोरणा किल्ला जिंकला होता.
औरंगजेब बादशहाने या किल्ल्याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले.

Torna Fort Information in Marathi


Fort of Maharashtra – Manjarsumbha Fort

पन्हाळा 1200 वर्षापेक्षा जुना इतिहास | Panhala Fort Information in Marathi


तोरणा गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे.

बिनी दरवाजा

तोरणा गडावर जाताना जे पहिले दार लागते त्याला बिन दरवाजा असे म्हटले जाते हा सुरुवातीला लागणारा दरवाजा आहे.

तोरणा दरवाजा

बिन दरवाजा ओलांडल्यानंतर काही पायऱ्या लागतात त्या पायऱ्या सरळ तुम्हाला तोरणाचा दरवाजाकडे घेऊन जातात.

मेंगाई देवीचे मंदीर

सर्वात जुना आणि सर्वात प्राचीन मंदिर तिथे पाहण्यासारखं म्हणजे मेंगाई देवीचे मंदिर आहे आणि हे खूप पुरातन मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.

Torna Fort Information in Marathi

झुंजार माची

तिथे असलेला झुंजार माची, या माचीवरून आपल्याला सिंहगड, पुरंदर ,राजगड लिंगाना यासारखे किल्ले दिसून येतात.

कोकण दरवाजा

झुंजार माचीवरून पुढे जात असताना तुम्हाला बुधला माचीकडे जाताना एक मोठा कोकण दरवाजा लागतो हे सरळ आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही कडा घ्यायची गरज पडत नाही.

बुधला माची

झुंजार माचीवरून पुढे गेल्यानंतर बुधला माझी कडे एक रस्ता मिळतो तो रस्ता पार केल्यानंतर ,कोकण दरवाजा आपल्याला बुधला माचीकडे घेऊन जातो.

Torna Fort Information in Marathi

प्रश्नपत्रिका मध्ये जास्तीत जास्त विचारण्यात येणारे हे प्रश्न ज्याचे उत्तरे देखील आहेत तुम्हाला अभ्यास करताना सोपे जाणार

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कधी जिंकला?
इसवी सन 1647

प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो?
तोरणा किल्ला

तोरणा किल्ला कुठे आहे?
वेल्हे तालुका, पुणे

शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला?
तोरणा किल्ला

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *