Upwas recipe in Marathi

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe

उपवासाचा ढोकळा

साहित्य- १ कप शिंगाड्याचे पीठ, १/४ कप भगरीचे पीठ, १/२ कप दही, १ हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३/४ लहान चमचा इनो, १ लहान चमचा काळीमिरी पूड, मीठ चवीनुसार, लाल तिखट आवश्यकतेनुसार, १ टेबलस्पून ओलं खोबरं, तेल आवश्यकतेनुसार

कृती- एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, मिरचीचा ठेचा, दही ,बारीक चिरलेली कोथींबीर, काळीमिरी पूड ,मीठ हे सगळे साहित्य एकजीव करा आणि १० मिनिटे मुरायला ठेवा. दहा मिनिटांनी त्यात एक टेबलस्पून तेल आणि इनो टाकून एकजीव करून घ्या

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes

ढोकळ्याच्या साच्याला थोडेसे तेल लावून त्यात हे मिश्रण टाका आणि त्यावर वरतून लाल तिखट टाका. मिश्रण मोठ्या आचेवर दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

साधारण पंधरा मिनिटांनी त्यात सुरीचे टोक बुडवून बघा. ढोकळा तयार झाला की साचा स्टीमर मधून बाहेर काढून थोड्यावेळ थंड करून घ्या. ढोकळा साच्यातून बाहेर काढून त्याच्या वड्या पाडून घ्या. त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाका आणि उपवासाच्या चटणी बरोबर फराळी ढोकळ्याचा आस्वाद घ्या.

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe

उपवासाचा शिरा

साहित्य :
एक वाटीभर निवडलेली भगर
साखर पाऊण वाटी
अर्धी वाटी तूप
एक पिकलेले केळे
12 किसमिस
चारोळ्या एक एक चमचा
थोडी जायफळ व 1/8 लहान चमचा विलायची पूड
चिमुटभर मीठ
दोन वाटी दूध

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe

कृती :
भगर धुऊन चाळणीत टाका व पाणी निथरु द्या. कढईत चमचाभर तूप गरम करा. त्यात भगर लालसर रंगावर भाजा. दोन वाटी दूध चांगले तापवून वरईवर त्यातले एक वाटी भर ओता. थोडे मीठ टाका. चमच्याने हालवा. दाटसर होऊ लागल्यावर उरलेले एक वाटी दूध ओता. भगर शिजत आल्यावर साखर, चारोळ्या, विलायची पूड, किसमिस, जायफळ पूड टाका. 1 मिनिट चांगले परतवून घ्या. आवश्यकते नुसार तूप टाका. केळ्याचे पातळ काप करा. त्यात टाका. पुन्हा ढवळून घ्या. एक वाफ आल्यावर भांडे खाली उतरा. गरम असताना खा.

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes

उपवासाचे भगर पॅटीस

भगर भाजून घ्यावे, आता त्यात तीन पट पाणी घालून घट्ट शिजवून घ्यावे, बटाटा उकडून कुस्करून घ्यावा,तो भगर मध्ये घालून त्यात आले मिरची ठेचा दाण्याचे कूट सैंधव मीठ साखर लिंबू रस कोथिंबीर मिरपूड घालून घट्ट मळून घ्यावे, त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत, आरारोट मध्ये घोळून आप्पे पात्रात कमी तेलावर पॅटीस तयार करून घ्यावेत.

दही चटणी : दह्याचे पाणी काढून टाकावे, त्यात सैंधव मीठ, साखर,मीरपूड , आवडत असल्यास हिरवी मिरची ठेचा घालून छान मिक्स करावे…

तयार आहेत गरमागरम पॅटीस….

साबुदाणा पीठाचे लाडू: Upwas recipe in Marathi

साहित्य:
• १ कप साबुदाणा पीठ
• ३/४ कप साजूक तूप, वितळलेले
• १/२ कप पिठी साखर
• १/२ कप खारीक पूड (भरडसर)
• १/२ कप सुके खोबरे, किसून भाजलेले
• १/२ टीस्पून वेलची पूड

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/

कृती:
• कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे.
• पिठाचा रंग किंचित बदलेस्तोवर भाजावे, साधारण १० मिनिटे. भाजताना तळापासून ढवळावे.
• साबुदाणा पीठ भाजले कि आच बंद करावी आणि कढई बाजूला करावी.
• यात खारीक पूड, साखर, भाजलेले खोबरे आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
• मिश्रण हाताळण्याइतपत कोमट झाले कि लगेच लाडू वळावेत.

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes

टीप:
• लाडू नाजूक असतात त्यामुळे वळताना काळजी घ्यावी. लागल्यास थोडे कोमट केलेले तूप वरून घालावे.
• खारीक पावडर ऐच्छिक आहे. पण त्यामुळे चव आणि टेक्स्चर चांगले येते. लाडूचा चिकटा बसत नाही.

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes

Author : Snehal, Ahmednagar

Cake Recipe in Marathi

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

आणखी वीडियोस इथे पहा..
1. #BabyReceipe#StayHome:Wheat Kheer:With very IMP information:8+month:गव्हाची खीर:महत्वपूर्ण माहिती
https://youtu.be/QQYJUoGnfOU

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe

2. बाळाचे आरोग्य पावसाळ्यात कसे जपावे आणि घरगुती उपाय सहित आणखिहि बरेच काही#BabyCare Monsoon:0 to 5year
https://youtu.be/eTvjkmDLnzA

3. New,trending45+baby girls name Begin with letter ‘A’:नवीन ४५+ मुलींची मराठी ‘अ’ने सुरवात होणारी नावे

https://youtu.be/-sD-o2rGRZ0

4.New Hindu baby girl & boy names begin with”S”letter:100+:हिंदू लहान मूली व् मुलांची नविन नावे

5.#BabyReceipe#Bread:10+ Baby:Shahi Tukda:ब्रेड पासून बनवा टेस्टी शाही टुकड़ा बाळासाठी

6#OriginalBabyPhotoshoot: DIY Latest and Trending Baby Photoshoot at home with zero budget
https://youtu.be/3da_Rw5Kai4

Upwas recipe in Marathi/ ekadashi upvas/ upvasache padarth/ Upvas recipes/ Upvas recipe

7.#BabyActivities:12 Baby Engaging Activities at home with Zero budget for 10 -15month babies

8.चॉकलेट पेढा :खवा चॉकलेट पेढा:Mava Chocolate Pedha:Rakshabandhan sweet:chocolate pedha::15 MinReceipe

Subscribe To My Channel on:

https://www.youtube.com/channel/UCFLTlDsF5S8r5siAIBMheZQ?sub_confirmation=1

?Like?Comment?Subscribe?Share?
Thank you!!?☺️?

3 thoughts on “Upwas recipe in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *