Vadil kavita in marathi

बाबा | Best Vadil kavita in marathi in 2023

विजया भट यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Vadil kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Vadil kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका साप्ताहिक उपक्रम…
१५/१०/२०२३

बाबा | Vadil kavita in marathi

बाबा माझे खूप प्रेमळ.
अठरा वर्षाचा सहवास….
लग्न केलं तुटला संपर्क.
जाता नाही आलं फारसं भेटण्यास….

माझ्यावर त्यांचे खूप प्रेम. माझ्या कडूनच अपेक्षां असायची…
पण तशी शिस्त होती कडक.
चिडले तर सामना मिस करायची….

मला गुलाब खूप आवडे .
रोज शाळेत, पुढे कॉलेजला…
एक गुलाब माझ्यासाठी असे.
फ्लावर पॉट फिशपाँडही मिळाला…

बाबांचा ऑफिस घराजवळ.
मी दुपारी चहा द्यायला जायची….
त्यांच्या डोळ्यातील प्रेमाची चमक.
मला सारे सुख द्यायची….

माझे बाबा पक्षाघाताने आजारी .
माझी खूप आठवण काढत…
घरच्या जबाबदाऱ्या होत्या.
मिळाली नाही फुरसत….

त्यांची तब्येत खूपच खालावली.
जणू माझ्यासाठीच प्राण थांबला…
शेवटी कसेतरी जायचं ठरलं.
सकाळी कोणाच्या स्पर्शाचा भास झाला….

एकदम झटक्यात जागी झाले.
कुणीच नव्हतं केवळ भास …
आम्ही प्रवासाला निघालो.
मला भेटण्याची होती आस…

पण पण दैवाचा योग पहा.
मला ज्यावेळी सकाळी भास झाला …
त्यावेळी वडिलांचा प्राण गेला.
आम्ही पोहोचलो पण सारा खेळ संपला….

विजया भट .धुळे.

बाबा | Best Vadil kavita in marathi in 2023

Vadil kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह