vadil poem in marathi

माझे बाबा | Best vadil poem in marathi in 2023

विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत vadil poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

vadil poem in marathi

स्पर्धे करिता
काव्यबंध समुह
काव्यलतिका
आयोजित
रविवार काव्यलेखन स्पर्धा
दिनांक १५/१०/२०२३

विषय…. वडील

माझे बाबा | vadil poem in marathi

राबे ते उन्हातान्हात,
तरी देई चिल्या पिल्याना सावली…
वटवृक्ष तो जपी मुलांना,
जशी खंबीर माऊली…

नसे पायात,
त्यांच्या जरी चप्पल…
पोराच्या बुटासाठी,
लडवती वेगवेगळी शक्कल…

स्वतः देई नुसतं,
पाणी पिऊनी ढेकर…
उदरी मुलांच्या पोहचण्या ,
कोर भर भाकर…

स्वतः फिरला उन्हातान्हात,
नेहमीच सायकलवर..
मुलांनी फिरावे चारचाकी तून,
ह्या स्वप्नासाठी कष्ट घेतलं आयुष्य भर…

आली किती जरी संकटे,
घेई ते शीरावर…
मुलांना त्रास ,
न होऊ देई तसुभर..

दिवाळीच्या सणातही,
स्वतः नेसती जुने धोतर…
मुलाबाळांना मात्र देई,
नवी कापडं वावभर..

स्वतः साठी ते जगलेच नाहीत,
हे मात्र नक्कीच खरं…
आता बाप झाल्यावर,
आठवतंय मात्र वेळोवेळी सारं …

राहू दे त्यांचा,
पाठीवर हात आयुष्य भर…
एवढच मागणं बाप्पा,
तू पुरे कर…

✍️विजय तानाजी पाटील✍️
(तासगाव )

माझे बाबा | Best vadil poem in marathi in 2023

vadil poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह