vadilanvar kavita in marathi

आधारवड | Best vadilanvar kavita in marathi in 2023

सौ. सुवर्णा पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत vadilanvar kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

vadilanvar kavita in marathi

स्पर्धा करीता
काव्यबंध समूह
काव्यलतिका
आयोजित रविवार काव्यलेखन स्पर्धा
दि . = १५ / १० /२०२३
विषय = बाबा

आधारवड | vadilanvar kavita in marathi

छाया ठेविती तव सर्वांवरी
योगी तपस्वी बनला असा,
बनले आधारवड साऱ्यांचे
कुटुंबाचा वत्सल दिप जसा.

करीति सुसह्य जीवन सर्वांचे
संसाराचे दुःख नित्य पेली,
संघर्षाचा भार त्यांच्या माथी
बाप माझा जीवनाचा लढा झेली.

करीती संस्कारीत सारी मुले
नाते सलोख्याचे समाजात जडवी,
कष्ट करुनी अफाट रात्रंदिन
पिढी आमची संस्कारीत घडवी.

वसा घेई खंबीर प्रेरणेचा
देई आम्हां आधार धैर्याचा,
दुःख लपवी हळूच सामोरी
पहाड वटवृक्ष बनले शौर्याचा.

ठाम निर्णय असे तयाचा
मूर्ती असे त्यांची स्वाभीमानी,
कास धरूनी नित्य सत्त्याची
निर्मीयले विश्व तयां अभिमानी.

जुळले तयांचे ऋणानुबंध
समाजाशी प्रेमाचे नाते जडे,
तव आभाळाची मिळे माया
आम्हां जगी प्रेम बंध घडे .

झिजवती श्रमास नित्य काया
ईच्छा पूर्ती आम्हां करण्यास,
आठवण परिश्रमाचे तयाचे
उतराई कसे सांगा होण्यास.

सहा बहिणी व तीन भाऊ
एकूण सदस्य कुटुंबात नऊ ,
माझे आई नी बाबा मिळूनी
आम्ही सारे कुटुंबात एकत्र राहू.

कष्ट करून त्यांनी केले
आम्हां सहा बहिणींचे लग्न,
कर्ज सावकारांचे, बँकाचे तया
फेडण्यात असती सदा मग्न.

झाली भावंडे सारी मोठी
हातपाय आता त्यांचे थकले ,
बाबा साऱ्यांचे कष्ट करीता
एक दिनी देवाघरी बाबा गेले .

सुख मुलांचे पाहण्यासाठी
आज नसे त्यांच्या नशिबी,
त्यांना सुखात ठेवण्यासाठी
आम्ही ठरलो हो कमनशिबी.

आज बाबा मुळे आम्ही सर्व
भांवडे राही छान सुखात,
असा जन्मदाता आम्हां भावंडाना
मिळावेत पुढील सात जन्मात.

सौ . सुवर्णा पवार , इचलकरंजी

आधारवड | Best vadilanvar kavita in marathi in 2023

vadilanvar kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह