नवीन वर्ष सुरु झाले कि सगळेच अगदी आतुरतेने वाट बघतात फेब्रुवारी महिन्याची .फेब्रुवारी महिना जसा जवळ येतो तसे वेध लागलेले असतात ते म्हणजे Valentine Day चे. प्रेमाचं प्रतीक म्हणून मानला जाणारा हा महिना फक्त तरुणाईचाच नव्हे तर सगळ्यांच्याच मनाला हवाहवासा वाटणारा आहे.(व्हॅलेंटाईन डे)Valentine Day म्हटलं कि आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. त्याचबरोबर आठवणी ही जाग्या होतात.पण प्रेमाबद्दल बोलायला गेलो तरआपल्याला शब्द हि लवकर सुचणार नाहीत . शब्दात आपण प्रेम व्यक्त करू शकत नाही. ती हृदयातून व्यक्त होणारी भावना आहे.फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून म्हणजेच ७ तारखेपासून ते १४ तारखेपर्यंत हे दिवस साजरे केले जातात .Valentine Day का साजरा केला जातो ? या मागचे कारण काय आहे बर? हे आपल्याला माहित आहे का? तर नाही !
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi
व्हॅलेंटाईन डे: महत्त्व
चला तर मग आपण जाणून घेऊया या दिवसा विषयीच महत्त्व, का ? साजरा केला जातो Valentine Day(व्हॅलेंटाईन डे), या दिवसा मागे काही वेगळ कारण नाहीये , तर एक पुरातन कथा आहे.ज्यामुळे आज आपण Valentine Day(व्हॅलेंटाईन डे )चा आठवडा साजरा करतो.हि कथा आहे तिसऱ्या शतकातील. रोम साम्राज्यामध्ये एक राजा राहत होता. त्याचे नाव Claudius(क्लॉडियस) होते. तो स्वभावाने खूप क्रूर होता,त्याचे मानणे होते कि युद्धात लग्न न झालेले सैनिकच चांगल्या प्रकारे युध्द करु शकतात . तुलनेत ज्यांचे लग्न झालेले आहे त्याच्या पेक्षा लग्न न झालेल्या सैनिकांना कोणतीही भीती नसते , आपल्या पाठीमागे राहणाऱ्या व्यक्तीची . पण लग्न झालेल्या सैनिकांना आपण गेल्यानंतर आपल्या मागे परिवाराचे काय होईल हि भीती असते . म्हणून ते युद्धामध्ये चांगल्या प्रकारे लढू शकत नाहीत .म्हणून त्या राजाने निर्णय घेतला कि, त्याच्या राज्यामध्ये कोणतीही व्यक्ती लग्न करणार नाही. हा निर्णय सर्व प्रजेला मान्य करावा लागेल.त्यामुळे प्रजेला हे मान्य नसून ही तो नियम त्यांच्यावर लादला गेला. सगळी प्रजा अगदी त्रस्त झाली होती.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi
त्या राज्यामध्ये एक दयाळू,प्रेमळ व्यक्ती राहत होती . त्यांचे नाव होते Valentine(व्हॅलेंटाईन ) . तिथले सर्व लोक त्यांना संत मानत असतं .त्यांना राजाने दिलेला आदेश अजिबात मान्य नव्हता, सर्व जनते सोबत हा अन्याय होत आहे. असे त्यांचे म्हणणे होते .म्हणून त्यांनी राजाच्या परस्पर लपून-छापून काही व्यक्तींची त्यांच्या प्रेमिकांसोबत लग्न लाऊन दिले.पण एक दिवस या सगळ्या गोष्टी राजाला माहिती पडल्या . राज्यामध्ये आपल्या आदेशाचे उल्लंघन होत आहे,हे त्याच्या लक्षात आले.मग त्याने Valentine(व्हॅलेंटाईन ) ला मृत्युदंड देण्याचा आदेश दिला.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi

त्यानंतर Valentine(व्हॅलेंटाईन ) ला कारागृहात बंद करण्यात आले. तेथील जेलरला त्यावेळी असे माहिती झाले कि Valentine(व्हॅलेंटाईन )
जवळ एक दिव्य शक्ती आहे, आणि आपल्या मुलीची जी डोळ्यांची दृष्टी गेलेली आहे. ती दृष्टी Valentine परत आणू शकेलं .त्यासाठी जेलरने त्याच्या मुलीला Valentine(व्हॅलेंटाईन ) कडे आणले . दयाळू आणि उदार मनाच्य Valentine(व्हॅलेंटाईन ) ने जेलर च्या मुलीच्या डोळ्यांची दृष्टी परत आणून दिली . त्यांनतर जेलर च्या मुलीमध्ये आणि Valentine(व्हॅलेंटाईन ) यांच्या दोघांमध्ये जवळीक वाढली .त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होत गेले.Valentine(व्हॅलेंटाईन ) ला राजाने शिक्षा ठोठावली होती. त्याला मरण येणार आहे,याचा धक्का तिला बसाला.आणि Valentine(व्हॅलेंटाईन ) च्या शिक्षेचा दिवस उजाडला .त्यादिवशी Valentine(व्हॅलेंटाईन ) ने जेलरकडून कागद आणि पेन घेऊन सुंदर प्रकारे एक पत्र आपल्या प्रेयसी साठी लिहिले.ज्यामध्ये त्यांनी तिचा शेवटचा निरोप घेतला. “तुझाच व्हॅलेंटाईन”असे लिहून पत्राची सांगता केली, हेच ते शब्द आहेत ज्या शब्दांना अजूनही लोक आठवतात.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi
Valentine Day In Marathi – कविता
आपण जर कोणावर प्रेम करत असाल तर नक्की तुमचं प्रेम व्यक्त करा . नाहीतर म्हणावं लागेल ……
“किती तरी भेटी झाल्या
मज बोलता आले नाही,
भाव माझ्या मनातले
तुला सांगता आले नाहीत
जेव्हा जेव्हा समोर आलास
शब्द माझे मुके झाले ,
दुसरेच काहीतरी बोलले
मनातले मात्र राहूनच गेले. ”
म्हणून आपलं प्रेम मनात दाबून न ठेवता ते लवकर सांगून टाका.आणि मन मोकळं करा.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi
मी आपल्या सगळ्सायांसाठी अश्याच प्रकारे आणखीन लेख घेऊन येणार आहे, त्यासाठी आमच्या ” माझा मराठी ब्लॉग ” सोबत कनेक्ट रहा.
आशा करते की आजच्या या लेखातून आपल्याला भरपूर माहिती मिळाली असेल, आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल ,
मग…..आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय–Valentine Day In Marathi
Author:- Mrs. Swati Kshirsagar
शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता
पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १
Click to read- The Power Of Relationships