Valentine Day Quotes In Marathi

Valentine Day Quotes In Marathi: Marathi Message

आयुष्यात माझ्या आलास तु ,
न मागता माझा झालास तु
भरभरून प्रेम दिलेस तु मला ,
बस.. आणखीनं काय हवं मला..…Valentine Day Quotes msg In Marathi

प्रेम हे काय असतं ?
ते एक सुंदर नातं असतं ,
करणाऱ्याला ते कळत
पाहणाऱ्याला मात्र वेगळच वाटतं …

तुझ्या प्रेमाचा रंग असाच ..
आयुष्यात बहरु दे ,
अखेरच्या श्वासापर्यंत
मला तुझीच राहू दे…Valentine Day Quotes In Marathi

जुळले बंध नात्याचे
नातेही जुळले मनाचे,
नजरेतुनही अगदी
समजून घे बोल हृदयाचे …

डोळ्यातील स्वप्नांना
कधीतरी प्रत्यक्षात येऊ देतं ,
खूप प्रेम करते तुझ्यावर
हे न बोलताही जाणवु देतं …

Part 2-Valentine Day Marathi Message: व्हॅलेंटाईन डे मराठी

आयुष्य जगताना
प्रेम करायचं असतं,
मनाच्या कोपऱ्यात
ते जपायच असतं …

जवळ असतो जेव्हा तू
हसू उमटे अलगद ओठांवरी ,
पाहत राहावे सारखे तुला
आणि तुलाच जपावे मी
लाड सर्व पुरवून घ्यावे ,
लडिवाळपणे छळावे तुला…

कोणास ठाऊक असे दिवस
पुन्हा कधी यावे,
असतोस तु जेव्हा समोर
कुशीत तुझ्या शिरावे …

क्षणभराच्या सहवासात
जन्मो -जन्माचे जगून घ्यावे,
डोके खांद्यावर ठेवून
कायमचे तुझेच होऊन जावे…Valentine Day Quotes msg In Marathi

काही न सांगताच तू , मला समजते सारे
कळतात तुला ही, शांततेचे इशारे
दोघांत कशाला मग, शाब्दीक बांध,
तुझा नि माझा निःशब्ध संवाद…

Part 3- Valentine Day Marathi Message:व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती

हात घे हाती माझा
जगातील सारं सुख तुझं असेल,
माझ्या प्रेमाच्या सीमेपुढे
ब्रह्मांड ही खुजं असेल…

असंच कधी तुला
माझ्या आठवणींत
हसताना पाहायचंय,
जीवनाचं सुंदर स्वप्न मला
आता तुझ्याचसोबत जगायचंय…

तुझ आयुष्यात येणं खूपच छान आहे
हृदयात जपलेली तुझीच छबी आहे
दूर जाऊ नकोस कधीही माझ्यापासून ,
प्रत्येक क्षणाला तू सोबत हवा आहेस…Valentine Day Quotes In Marathi

मनातले शब्द तुला सांगायचे आहेत
वेध भविष्याचे तुला कवेत घेऊन घ्यायचे आहेत,
रंगवलेली सुंदर स्वप्ने सत्यात उतरावयाची आहेत
त्यासाठी फक्त तुझीच साथ हवी आहे…

विस्तीर्ण आकाशाच्या खाली
निजलेली धरती शांत
मी बावरले अवघडले,
घेता तु हाती हात…

तुझ्या सहवासात
प्रेमाची व्याख्या चांगली समजली,
तु सोबत असता
रीत जगण्याची मज उमगली…

Part 3-Valentine Day Marathi Message:व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती

माझ्या अन तुझ्या प्रेमाचं
गुपित मी जाणलंय,
मनात मात्र आता
फक्त तुलाच ठाणलंय…

ओळखीचा आवाज जसा
काळोख्या जंगलात,
तुझ्या प्रेमाची साथ
आयुष्याच्या एकांतात…Valentine Day Quotes In Marathi

नाही कसली बंधने
नाही कसली वचने,
प्रेम म्हणजे खरंतर
फक्त मनाने जवळ असणे…

एकटीच चालली आहे
हात हातात घेशील का?
तुजसवे घेईन उंच भरारी
साथ मला देशील का?…

प्रेमाची भाषा मला कळते आहे
मन माझे नकळत तुझ्याकडे वळते आहे,
लांब असून ही मन मनाशी जुळते आहे
तुझ्या भेटीचे सुख आठवणीतही मिळते आहे…Valentine Day Quotes In Marathi

खूप लोक प्रेमात असतात
पण सोबत नसतात,
आणि काही सोबत असतात
पण….. प्रेमात नसतात…

Valentine Day Quotes In Marathi

तुमच्या जोडीदाराला
आहे तसे स्विकारा ,
चांगलं शोधत बसलात
तर एकटेच रहाताल …

तुझी सोबत मला
आयुष्यभरासाठी नकोय ,
तु जोपर्यंत सोबत आहेस
तोपर्यंतच आयुष्य हवंय…

माझ्या आयुष्यात तुझं येणं
हे एक सुरेल गाणं आहे ,
तुझं अन माझं सहजीवन
नक्षत्रांचं हे देणं आहे…Valentine Day Quotes In Marathi

Valentine Week Days 2022-
७ फेब्रुवारी – Rose Day

तु दिलेला गुलाब मी
मनात जपून ठेवला आहे,
तुझी आठवण झाली कि
त्यालाच मी बघत आहे…

८ फेब्रुवारी – Propose Day

प्रेम अन प्रेम ….
तुझी प्रेमाची साथ,
याशिवाय अजून काय मागू
तुझ्याशिवाय काहीच नाही खास …

९ फेब्रुवारी – Chocolate Day

किट -कॅट सारखा स्वाद आहेस तु
डेअरी मिल्क सारखी गोड आहेस तु
कॅडबरी पेक्षाही खास आहेस तु
काहीही असो माझ्यासाठी तर ,
तु माझी ‘फाईव्ह स्टार आहेस .

Valentine Week Days 2022- १० फेब्रुवारी – Teddy Day

माझ्या आयुष्यातील तु मोलाचा क्षण
राहु दे तुझे प्रेम माझ्यावर,
प्रत्येक वेळेला हा टेडी
करुन देईल मला तुझी आठवण…

११ फेब्रुवारी – Promise Day

आयुष्यभरासाठी असावी तुझीच साथ
हीच एक मनापासून इच्छा आहे,
निभावेन शेवटपर्यंत तुझी साथ
देते हे वचन तुला मी आज…

१२ फेब्रुवारी – Hug Day

मिठीत तुझ्या असताना
थोडं वेळेनेही थांबावं
क्षणभंगुर असणाऱ्या क्षणांना
दीर्घायुष्य हे लाभावं…

१३ फेब्रुवारी – Kiss Day

या जगात जन्माला आल्यानंतर
सगळ्यात अगोदर जो किस असतो
तो असतो आपल्या आईचा…

१४ फेब्रुवारी – Valentine Day

तु जवळ असलास की
मला माझा ही आधार लागत नाही ,
तू फक्त आयुष्यभर सोबत रहा
मी दुसरे काहीच मागत नाही…

प्रेम हे प्रेम असतं
सगळ्यांचं ते अगदी
“सेम सेम सेम सेम असतं…

Author:- Mrs. Swati Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *