Vasna Marathi Charoli Kavita

वासना मराठी कविता | Best Vasna Marathi Charoli Kavita 2024

काव्यबंध समूहात घेण्यात आलेल्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Vasna Marathi Charoli Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक- वासनांध
वासनांध नजर त्याची
स्त्रीदेहाकडे गेली
जिच्या उदरातून जन्म घेतला
तिच्यातच त्याने बाई पाहिली

डॉ वैशाली शेंडगे
सांगली

===============

शीर्षक -बदल
बदल तुझी वासनांद नजर,
नको स्पर्शू इतर स्त्री देहाला,
इज्जत ठेव स्वतःच्या आयुष्याची,
हातांचा‌ वापर कर स्त्री अस्तित्व जपण्याला.

मंगल राजाराम यादव.
शिराळा.

===============

शीर्षक जगणे कठीण झाले

जगणे कठीण झाले
सांगावे तरी कोणाला
आई, बहीण,घरी तुमच्या
असतील ना हो तुम्हाला

सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

===============

विषय : कोता वितार
गेलो जरी चंद्रावरी
पण मनात विचार कोतेच
घरची भगीनी-माता जवळची
परकी ती फक्त उपभोग्य होतेच

संचित कांबळे ,
कोल्हापूर

==================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

Best Vasna Marathi Charoli Kavita 2024

शिर्षक -: सवाल..
करतोय वाटचाल देश विकासाकडे
तरी का थांबत नाहीत महिलांचे हाल..
संपणार कधी निर्भया,दर्शनाची कहाणी
कधी न सुटणारा हाच मोठा सवाल..

✍️ .. प्रविण कसबे..
माळशिरस – सोलापूर

================

शीर्षक:पापी नजर

बघतोस काय पापी नजरेने
लावतोस शरीराला तिच्या गालबोट
तिच्यात आहे चंडिका दुर्गाचे
रुप, घेईल तुझ्या नरडाचा घोट!

सौ, मालती चव्हाण सटाणा नासिक

===============

शीर्षक: नजर

कोणत्याही उठावदार गोष्टीकडे
नजर आपसूक वळत असते
फक्त नजरेत दोष असतो
माता, भगिनिचे ही भान नसते

सौ संजना पाटील
कोल्हापूर

===============

शिर्षक:काळ सोकावलाय

विकृत वासनेने पछाडलेले
जागोजागी नराधम लिंगपिसाट
बाई सावध रहा
वाढलाय गुंडांचा थयथयाट

राहुल भोसले, पुणे
९८९०४६१८८६

===============

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक… नजर

नजर तुझी नराधमा
फिरते तिच्या शरीरावर….
स्पर्श करण्या आतुरला
ठेव ना ताबा स्वतःवर….

विजया भट. धुळे.

=============

शीर्षक- बाईपण भारी देवा

हल्ली वखवखलेल्या नझरांना आहे स्त्री शरीराचा हेवा….
मातृदेवो म्हणतात सर्व पण
खरच बाईपण भारी देवा…

भारी:इथे अर्थ जोखमीचे

कु.नुपूर सावंत(कोल्हापूर)

================

शीर्षक….स्त्री जन्मा

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
असशी जरी तू माता भगिनी…!
विषय वासना सरेना अजूनी
विखारी त्या नजरेतूनी…..!!

सौ.संगीता पोरे
माळशिरस जि.सोलापूर

=================

शिर्षक -विकृती
कसा विसरतोस तुझी आई बहिण
हात बळावतेस बिभित्स कृतीस
असुरक्षित होत आहेत बाईपण
कठोर शिक्षा व्हावी अश्या गुन्ह्यांस

सौ. अनिता डोंगरवार
मु .जि. गोंदिया

==================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

वासना मराठी कविता | Best Vasna Marathi Charoli Kavita 2024

शीर्षक – विखारी नजर

पश्चिमात्य शैलीचे,
अंधानुकारण अविचारी ..
स्त्रीदेह पाहता दाटे,
मनी विचार विखारी..

✍️ विजय तानाजी पाटील (तासगाव )

====================

शीर्षक – नजर

दिली दृष्टी देवाने पाहण्या सृष्टी
नको पाहू असा बिभीत्स नजरेने
असेल कधी माता-भगिनी तिथे
करतोस गुन्हा नजरेच्या हाताने ?

शालिनी सदाशिव पवार/प्राचार्या संकपाळ मॅडम कोल्हापूर/निपाणी

==============

शीर्षक:- वासनांध…

पाश्चिमात्यांच अनुकरण
फोफावत चाललाय
घाला चौकट मर्यादेची
वासनांध बळावलाय….

सौ. राधा खानझोडे ,नागपूर…

===============

शीर्षक:-शिकार

(वर्ण-१२)

वखवखलेल्या नजरेला देत
बरबटलेल्या हातांचा आधार
कृतीतून इरादा स्पष्टच आहे
साधायची आहे ना तिची शिकार?

सौ.संध्या यादवाडकर.
ठाणे.

=================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक- वासनामय दृष्टी

सतत वाईट विचारच मनात
झाली त्याची वासनामय दृष्टी
उपभोगासाठी वाटे सर्वकाही
जणू त्याच्या सुखासाठी सृष्टी

अरविंद कुळकर्णी
मलकापूर
जिल्हा – बुलडाणा

===============

शिर्षक- विकृती

विकृती येताच मनी
न राही नयनावरी ताबा।
वासनांध नजर तुझी
का स्त्रीला छळते बाबा।।

केशवराव चेरकु
नवी मुंबई

===============

शीर्षक -वासना

पाश्चिमात्य संस्कृती केली हद्दपार
गेला वासनेच्या आहारी…
नारीस माना मातेसमान
सारे जग तीच उद्धारी…

सौ.वंदना रमेश ढोले
उरुळी कांचन, पुणे.

=============

अश्लील नजर त्याची
वाईट नजरेने न्याहळती
काल्पनिक हात त्याचे
तिला स्पर्श करिती

सौ.शितल शशिकांत फुलगिरकर मुंबई

====================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक: दु:खी कष्टी

मागे वळून न पाहता
समजतेय तिला कामी दृष्टी
नकोसा भाव त्यातील
करतोय तिला दु:खी कष्टी

अर्चना कुलकर्णी ,ठाणे

===================

शीर्षक = विखारी नजर

समाजात वावरताना स्त्रीयांना
सुरक्षीत वाटत नाही अजुनी ,
कामांध वासनेन बरबटलेला
पाही विखारी नजरेने फिरूनी.

सौ . सुवर्णा पवार,इचलकरंजी

===================

🖊️🌹शीर्षक.. अभिशाप

सौंदर्य तिच्यासाठी अभिशाप बनले
किती वार झेलते नजर किती विखारी
वासनांधांची विकृत मानसिकता असे
कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाही नारी.

🖊️🌹 सौ.शारदा मालपाणी
(काव्य सम्राज्ञी)©️®️

===================

शीर्षक: नराधमा

स्त्री अनंत काळची माता
कसे समजेल तुला नराधमा
विकृत,राक्षसी वासनांधता
त्याज्य कर अन माग क्षमा.

सौ जयश्री नरहरी देशपांडे
छत्रपती संभाजीनगर

====================

वासनांधता बोकाळली
नजरेतल्या कटाक्षाने
माय बहिणीची अब्रू
राखावी ज्याची त्यानें

श्री दत्तात्रय नामदेव गुरव
कोल्हापूर.

===============

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक- सौंदर्यदृष्टी
जाण ठेवा संस्कृतीची
स्री असे परनारी
आठवण असूदे तीच्यागुणाची
काबुत ठेव इंद्रिय सारी….

✍️संजय शिवाजी देशमुख पिंपरी पुणे

=====================

शीर्षक – दृष्टी

आताच्या जगामध्ये
सुरक्षित नाही नारी
स्वावलंबी झाली ती
म्हणून तीज वर नजर विखारी

ज्या रंगाचा घालू चष्मा
त्या सारखे दिसते जग
चांगली दृष्टि नाही त्यांना
आले कलियुग बघ

सुंदर दिसणे तिचे
आहे का काही गुन्हा
आई बहिण मावशी
म्हणा की तुम्ही पुन्हा

पुष्पा उमेश ओंबासे
प्राचार्य उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल पुणे

=======================

शीर्षक – वासनांध

परस्त्री ही असते आई समान
भान राहिले नाही भामट्यांना
वासनेने भरलेल्या नजरेची मजल
स्पर्श करते,येता-जाता स्त्रीअंगांना.

सौ.क्रांती पाटील.
दुशेरे(कराड)✍️

=====================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक: दृष्टी

अरे माणसा, कसा वासनांध झाला
जडली वाईट नजर तुझी परस्त्रीवर
असावी दृष्टी निर्मळ, वासानाराहित
ठेव डोळ्यांसमोर महान ऋषीवर

©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे

=================

शीर्षक- वासनाधीन

वासनाधुंद नजरेने पाहतोस तिच्याकडे
घोटाघोटात पितोस तिची शालीनता
ना पर्वा कसली ना परिस्थितीचे भान तुला
इंद्रियांनी तिला स्पर्श करायची आतुरता

सौ.मोहिनी संजय डंगर रायगड

===================

शीर्षक… तू चाल पुढे पुढे…..

तू चाल पुढे पुढे..
मी मागे मागे येत आहेच
ये नराधमा डोळ्यातील वासनाना
बघ मिरची पुड कशी मी टाकतेच….

वीणा पाटील कोल्हापूर

===================

शीर्षक
विकृती

जगणे एकटीने कठीण झाले
विकृतीचे हात समोर आले
नजरेत वासना लवलवली
रिकामटेकडे गुंड तयार झाले

सौ माया मुत्यलवार

==============

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक पाश्चात्त्य संस्कृती


वाहवत निघाली युवापिढी
पाश्चात्य संस्कृतीच्या प्रवाहात
परिणामी वासनांध वृत्ती
वाढतेय पाहा समाजात

*
सौ. स्वाती कोरगावकर
कोल्हापूर


शीर्षक:- नागडा देह

स्त्री झाकली संस्कारी का असेना
पाहता नागडा देह नजरेस दिसतो
नैतिकतेची कास सोडून तो
वासनेचे हात पुढे सरसावतो

उज्वला धांडे
नागपूर

==================

शीर्षक…स्मरण.

आधुनिक या युगात तू
विकृत नजरेला घाल आळा
स्त्री जातीच्या थोरवीचे
नित्य स्मरण राहूदे बाळा.

सौ.संघमित्रा राहुल सोरटे .
माळशिरस.सोलापूर.

===============

शीर्षक __विखारी नजरा……
पावला पावलावर आहेत नजरा
विखारी स्पर्शासाठी आसुसलेल्या ,
माता बहिण लेक विसरून सारी नाती
पायाखाली स्त्रीत्व तुडवलेल्या !!

रुपाली देव हंबर्डे
चिंचवड पुणे

===============

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

बोकाळली वासना
झाला संस्कारांचा ऱ्हास
उमलती कळी ,माता , बहीण आजी
कळेना वासनांध नेत्रास

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

===================

शीर्षक -बलात्कार

पर स्त्री असते मातेसमान
कसे कळेल या पोरांना टुकार
वखवखलेली घाणेरडी मने
हा तर नजरेचा बलात्कार

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद पंढरपूर
7038313235

====================

शीर्षक:-दृष्टी.

अष्टाक्षरी चारोळी.

माज,वासना विकार
अत्याचार बळावला
दृष्टी देहावर सदा
गुंड मोकाट सूटला.

  विद्या प्रधान
   ठाणे.
======================

शीर्षक -चावट मन

तसे तर दोघे एकाच ठिकाणचे सहकारी
ऑफिसचे काम करून जाता जाता
चोरटी नजर फिरते मादक शरीरावरून तिच्या
चावट मन विकृत होते तिला पहाता..

भक्ती केंजळे
करंजे पुणे

=================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

विषय- विनयभंग

सुधारणेच्या नादात बघा
नष्ट झाले संस्काराचे रंग
वासनांध मनोविकारातून
होई नयनांनी विनयभंग

मनोहर गंगाराम राठोड पुसद जि यवतमाळ
8208861758

==================

पावलो पावली

शिक्षणाच्या नगरीतही
सुरक्षित नाही नारी
पावलो पावली करिती
नजर स्पर्श विखारी

सौ. जयश्री सं. धोका. पुणे.

=====================

शीर्षक.. पर स्त्री

दिसता देखणी पर स्त्री
किळसवाण्या नजरेने बघतात
तिला हाताने स्पर्श करण्यासाठी
कुठल्याही स्तराला ते पोहोचतात

Rash🌹

=================

विषय- विकृती

वासनारुपी विकृती नयनी
ती आज पाहिली
आदर अन् संस्कृती खरी
मनी न राहिली

 छाया नाळे (भुजबळ)सातारा

================

स्वतःची चिता

विकृती चे विखारी हात डोळ्यांवाटे

तिच्या निष्पाप देहाला स्पर्श करतात

याही पिढीतील काही काही माणसे

स्वतःची चिता स्वतःच रचत जातात

रवी आटे, सानपाडा, नवी मुंबई
९३२४७४५९७०

======================

शीर्षक – इज्जत करा

डोळ्यांनी पाहून हातानं कुकर्म
पुरूषांनी स्त्रियांची इज्जत करा
मानवताच हाच माना खरा धर्म
जीवनात सर्वांच्या आनंद भरा

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे

=================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

शीर्षक- सौंदर्यदृष्टी
लोपत चालली सौंदर्यदृष्टी
वाढला वासनेचा विकार
संस्कारहीन जीवनाला
मग कसा येईल आकार
✍️शीघ्रकवी पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर.मो.क्र.९७३०७९८२७९🤝

====================

शीर्षक – नजर

नजरेत वासनेचा कल्लोळ
आचार विचार कसा
कसं फिरावं या जगती
कसला हा संस्कृतीचा वसा

आनंदराव जाधव, सांगली
जिल्हा सांगली तालुका मिरज
स्वरचित चारोळी.
८८३०२००३८९

================

वासना मराठी कविता | Vasna Marathi Charoli Kavita

वाचा आमचे इतर ब्लॉग

मराठी चारोळी – प्रेम कसे असावे

BEAUTIFUL MARATHI KAVITA

66 thoughts on “वासना मराठी कविता | Best Vasna Marathi Charoli Kavita 2024”

 1. शीर्षक – नजर
  शालिनी सदाशिव पवार/प्राचार्या संकपाळ मॅडम कोल्हापूर/निपाणी

  1. Anand Dhulugade

   To Shalini Sadashiv Pawar Madam, तुमची चारोळी उत्कृष्ट व सुंदर आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा!!

  2. राम पाटील

   शीर्षक :- नजर
   शालिनी सदाशिव पवार/प्राचार्य संकपाळ मॅडम कोल्हापूर/निपाणी.
   यांची चारोळी अप्रतिम आहे.

  1. खूपच छान उपक्रम 👌पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹

 2. पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत)

  सर्वांच्याच सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळी आहेत

  1. खरंच काळ सोकावला आहे.
   by
   राहुल भोसले.(कवी) छान चारोळी तुझी.
   पुढचा वाटचाली साठी माझ्या कडून
   शुभेच्छा.
   निखिल सुधाकर कांबळे.

 3. सुनिल बंडू किरळे, निपाणी, जि. बेळगाव.

  👌 सौंदर्यदृष्टी : सुसंस्कारानेच दृष्टी सुंदर व्हायला हवी. हा विचार मांडणारी सुंदर चारोळी

  शीघ्रकवी पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर.

  1. शिवाजी बनकर

   खुप छान चारोळी
   शालीनी पवार ताई

   आपलाच
   शिवाजी बनकर
   मुंबई

 4. Amol Bhaskar Pawar

  वाह खूप सुंदर
  सर्वोत्तम चारोळी उज्वला धांडे

 5. To Shalini Sadashiv Pawar Madam, तुमची चारोळी उत्कृष्ट व खूप गहन आहे. विचार करायला लावणारी आहे. तुमच्या ओळीतून तुमची वैचारिक उंची जाणवते. हृदय स्पर्शी. अति उत्तम. अनेक धन्यवाद व शुभेच्छा.

 6. रवी आटे

  मोहिनी डांगर यांची कविता सर्वात श्रेष्ठ वाटली.

 7. सौ जयश्री नरहरी देशपांडे यांची “नराधमा” ही कविता मला सर्वात जास्त आवडली. सरळ, साधा आणि रोखठोक भाव विषयाला प्रभावीपणे व्यक्त करतो!

  1. सौ. जयश्री देशपांडे मॅडम 🙏,खूप सुंदर कविता, आशय सुंदरच आहे अगदी मनाला भावली, पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

 8. सौ. प्राजक्ता देशपांडे

  सौ. जयश्री नरहरी देशपांडे यांची कविता मनाला अतिशय भावली.

 9. ‘सर्वोत्कृष्ट कवी’ (पद्माकर वाघरूळकर)
  खूप छान विचार, चारोळीतून मांडला आहे.

 10. मला पद्माकर वाघृळकर यांची कविता फार आवडली.. मी नेहमी त्यांच्या कविता वाचते.. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये मोठा आशय असतो. धन्यवाद कवी महोदय 🙏🏻

 11. याही पिढीतील काही काही माणसे
  स्वतःची चिता स्वतःच रचत जातात…
  अप्रतिम….रवी आटे सर

 12. गिरे राजेश

  माया मुत्यलवार यांची चारोळी खूपच सुंदर…👌👌👌

 13. dr Ashwini Gangshettiwar

  सौ मायाताई मुत्यलवार खूप चपखल आणि मार्मिक वर्णन आजच्या समाजाच्या मानसिकतेचे !
  सुंदर चारोळी

 14. Shivani kulkarni

  शीर्षक – नजर

  दिली दृष्टी देवाने पाहण्या सृष्टी
  नको पाहू असा बिभीत्स नजरेने
  असेल कधी माता-भगिनी तिथे
  करतोस गुन्हा नजरेच्या हाताने ?

  शालिनी सदाशिव पवार/प्राचार्या संकपाळ मॅडम कोल्हापूर/निपाणी
  मस्त लेख आणि
  रास्त भाषा मॅडम 👌

 15. वैशाली विजय यादव.

  पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर हे सर्वोत्कृष्ट कवी व उत्तम चारोळीकार आहेत..

  1. खूप छान…👌
   उत्तम शब्दरचना
   शालिनी सदाशिव पवार/प्राचार्या संकपाळ मॅडम कोल्हापूर/निपाणी

 16. पद्माकर वाघुरळकर सर्वात सर्वोत्कृष्ट कवी व चारोळीकार

  1. From- Saroj Utture.

   To,Shalini PawarMadam,
   तुमची चारोळी खूपच छान आहे.वैचारीक ऊंची दर्शविणारी आहे.सर्वोत्कृष्ट चारोळी आणि चारोळ्या.

 17. मनोज यादव सोनकांबळे लातूर

  शालिनी पवार…. संकपाळ मॅडम
  खूप छान चारोळी

 18. सरोज उत्तुरे

  शालिनी पवार मॅडम,
  खूप छान चारोळी
  उत्कृष्ट चारोळी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *