Veg Biryani Recipe In Marathi Language List

Veg Biryani Recipe In Marathi List | दम आलू बिर्याणी एकदम हॉटेल सारखी

काही लोकांचे भातावर अतिशय प्रेम त्यात बिर्याणी म्हटले तर त्यांचे डोळे बाहेर येतात कुठे जरी कोणी बिर्याणी खायचा विषय काढला तर हे लोक ताटात चमचे बाजूला ठेवतात आणि अगदी हाताची बोटे चाटून बिर्याणी खातात. पण अशी आवडणारी बिर्याणी त्यातल्या त्यात व्हेज बिर्याणी घरी कशी बनवायची हा प्रश्न आहे. मराठी तुम्हाला अशी बिर्याणी बनवायला नक्कीच आवडेल चला तर मग पाहूया आजची व्हेज बिर्याणी मराठी रेसिपी. Veg Biryani Recipe In Marathi Language List | दम आलू बिर्याणी मराठी रेसिपी एकदम हॉटेल सारखी लज्जतदार

ही बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला 60 मिनिटे वेळ लागेल आणि चार ते पाच लोकांसाठी बनेल एवढी कॉन्टॅक्ट असेल त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे.

Veg Biryani Recipe In Marathi List

पाव किलो छोट्या छोट्या आकाराचे बटाटे याला आपण बेबी पोटॅटो असेही म्हणतो. त्यांच्या साली काढा आणि त्यांना पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते काळे पडणार नाही.

दीड कप बासमती तांदूळ हा तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्यात धुवा आणि अर्धा तास भिजत ठेवा

दोन मोठ्या आकाराचे कांदे हे कांदे लांब चिरून ठेवावे

दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो जे तुम्ही बारीक चिरून ठेवा

एक कप दही , एक कप तळलेला कांदा , एक कप कोथिंबीर बारीक चिरलेली

हिरवा मसाल्याचे वाटण वाटण तयार करताना दहा-बारा लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घ्या

तेल , मीठ , तूप गरजेनुसार , एक दोन तमालपत्र , तीन चार हिरव्या इलायची , तीन-चार लवंग , अर्धा इंच दालचिनीचा तुकडा , अर्धा चमचा हळद , एक चमचा लाल मिरची पूड किंवा तुम्हाला जसे आवडेल , तसे एक चमचा गरम मसाला पावडर , अर्धा चमचा पिवळी मिरचीची पूड , एक चमचा धने पावडर

Veg Biryani Recipe In Marathi Language List | दम आलू बिर्याणी मराठी रेसिपी एकदम हॉटेल सारखी लज्जतदार

Veg Biryani Recipe In Marathi

बिर्याणीचा तांदूळ शिजवून घेण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या कढईत एक दीड लिटर पाणी उकळायला ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घाला मीठ घालने फार गरजेचे आहे नाहीतर बिर्याणीचा भात इतका लागतो साधारणतः तीन चमचे मीठ पुरेसे होते

यामध्ये दालचिनी इलायची लवंग तमालपत्र आणि एक चमचा तूप घालावे तूप भात मोकळा शिजण्यासाठी गरजेचा आहे.

आता तांदूळ गाळून घ्यावे त्यानंतर 90 टक्के पर्यंत भात शिजवावा नंतर गॅस बंद करावा आणि एका मोठ्या परातीत भात काढून तो पसरून ठेवावा

आता एक कढई घ्या त्यामध्ये पाच चमचे तेल टाकून गरम करायला ठेवावे. बटाटे कोरडे करून त्यांना टोचे मारावेत म्हणजे ते फुटणार नाहीत. बटाटे कढईमध्ये टाकून छानपणे परतून घ्यावेत बटाटे जेव्हा चांगले शिजतील तेव्हा गॅस बंद करावा आणि बटाटे एका भांड्यात वेगळे करून काढून घ्या

एक भांडे घ्या त्यात दही घेऊन ते फेटून घ्या त्यात गरम मसाला लाल मिरची पावडर हळद पिवळी मिरची पावडर धने पावडर आणि कोथिंबीर घालावी त्यातच आपण आधी तळलेला कांदा कुस्करून टाकावा त्यात चवीपुरते मीठ घालून ते सर्व एकत्र करून घ्यावे या मिश्रणात बटाटे टाकावेत आणि पंधरा मिनिटं झाकण घालून बाजूला ठेवून द्यावेत

ज्या तेलात आपण बटाटे तळले त्यास तेलाचा वापर आपण पुन्हा करणार आहोत आता लांब चिरलेला कांदा पारदर्शक होईपर्यंत या तेलात तळून घ्या कांदा नरम झाल्यावर हिरवे वाटण त्यामध्ये टाकावे आणि व्यवस्थित परतत राहावे

Veg Biryani Recipe In Marathi Language List | दम आलू बिर्याणी मराठी रेसिपी एकदम हॉटेल सारखी लज्जतदार

यामध्ये वरतून थोडे मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाका आणि त्याच्यावरती झाकण घालून पाच मिनिटे शिजू द्या

याच्यात आपले मगाशी बटाट्याचे मिश्रण टाका आणि आणखी मंद आचेवर गॅस ठेवून शिजू द्या

दहा मिनिटानंतर मसाल्याला तेल सुटलेले तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता.

एक मोठे हंडी सारखे भांडे घ्या त्याच्या तळाला आणि बाजूला सुद्धा तूप लावून घ्या त्यानंतर बटाट्याच्या अर्धा रसा त्यामध्ये टाकून त्याचा एक थर बनवा.

त्यावरती तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि अर्धा भात त्यावरती व्यवस्थित पसरून टाकून द्या त्यावरती पुन्हा तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाका.

Veg Biryani Recipe In Marathi Language List | दम आलू बिर्याणी मराठी रेसिपी एकदम हॉटेल सारखी लज्जतदार

जसा हा पहिला थर तयार केला तसाच दुसराही थर तयार करून घ्या.

यानंतर हे भांडे झाकणाने पूर्ण बंद करून घ्या आणि गॅस फुल करून तीन ते चार मिनिट त्यावर ही हंडी ठेवावी. भांडे व्यवस्थित बंद करण्यासाठी जर तुम्ही कणकेचा वापर केला तर अति उत्तम.

यानंतर ही हंडी दुसऱ्या एका लोखंडी तव्यावरती ठेवून तो तवा दहा मिनिटे मंद आचेवर ठेवाव.

अरे तुमची व्हेज बिर्याणी तयार होईल या बिर्याणीला आलू दम बिर्याणी असेही म्हणतात तुम्ही जर सर्व स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमच्या कुटुंबातील मंडळी नक्कीच याची फर्माईश वारंवार करतील.

VegBiryani Recipe | दम आलू बिर्याणी मराठी रेसिपी एकदम हॉटेल सारखी लज्जतदार

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *