काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.नरेंद्र आनंदराव मोरे यांची -ओढ लागली तुझी देवा- हि कविता -Visarjan Marathi Caption- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
ओढ लागली तुझी देवा By श्री.नरेंद्र आनंदराव मोरे | Best Visarjan Marathi Caption 2023
ओढ लागली तुझी देवा | Visarjan Marathi Caption 2023

उत्सव गणेशाचा येता
विराजमान थाटात झाले
पुत्र देवाधी देवाचा
मोषकावर बसुनी आले….!!१!!
स्वागत केले गजराजाचे
ढोल, ताशांच्या गजराने
विघ्नहर्त्याची आरती करू लागले
भक्त सारे आदराने….!!२!!
आवड तुला मोदकाची
प्रसाद म्हणुनी देतात
तल्लीन सारेच भक्त
तुझ्या नामस्मरणात होतात….!!३!!
गजर करीत तुझ्या नावे
हर्षीत भक्त राहत होते
येणारे संकट टाळण्या
दुर्वा तुला वाहत होते….!!४!!
पावन स्पर्शाने तुझ्या
वातावरण भक्तिमय होते झाले
आशीर्वाद भक्तांना देण्या
गजराज पृथ्वीवर होते आले….!!५!!
ओढ लागली तुझी देवा
जावू नकोस रे सोडून
विनवणी करतो भक्त तुझा
कर दोन्ही तुला रे जोडून….!!६!!
दहा दिवस तुझा लळा
लागून गेला होता भारी
तू निघून जाता गावाला
मन भक्तांचे राहेना थारी….!!७!!
खिन्न झाले भक्त सारे
आठवण काळजात ठेवून
परत निघाले गजराज
आशीर्वाद भक्तांना देवून….!!८!!
गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला
उदास वाटू लागले सारे
दुःख सांगावे तरी कुणाला….!!९!!
दहा दिवस तुझ्या चरणाशी येवून
आरती आम्ही भक्तिभावे गात होतो
मनोहर रूप देवा विनायका
तुझे साक्षात मूर्तीमध्ये पाहत होतो….!!१०!!
तुझ्या भक्तीच्या नादामध्ये गेलो होतो
तहान भूक आम्ही विसरून
गहिवरून येते मन भक्तांचे
क्षण दहा दिवसांचे स्मरून….!!११!!
धूप अगरबत्तीचा तुझ्यापुढे
सुगंध सर्वत्र राहत होता
भक्त मोठ्या श्रध्देने
तुझ्याकडे देवा पाहत होता….!!१२!!
गाव,खेडी शहरे सारी
तुझ्या आगमनाने सजली होती
लहान थोर स्वागता तुझ्या
नाचून नाचून भिजली होती….!!१३!!
देवा आठवू लागताच आम्हाला
तुझ्या सानिध्यात दिवस घातलेले
विरहात तुझ्या असते भक्तांचे
दुःखाने आभाळ फाटलेले….!!१४!!
आगमनाने देवा, तुझ्या भक्ताला
दहा दिवस आनंद मिळत होता
आता मात्र तुझ्या आठवणीत
भक्त तुझा जळत होता….!!१५!!
उतरून गेली तोरण खाली
मौज राहिली तिथे ना कशाची
झगमगाट थांबली तिथली
जी वाट होती प्रकाशाची….!!१६!!
आनंदी राहील कसा भक्त
विरह वेदना देवा तुझ्या सोसून
करमत नाही क्षणभर भक्ताला
बाप्पा गावा तू गेल्या पासून….!!१७!!
पुढल्या वर्षी लवकर येशील
हात जोडतो तुला देवा
पुन्हा आम्हा देशील संधी
तुझी करण्याची सेवा….!!१८!!
ओढ लागली तुझी देवा By श्री.नरेंद्र आनंदराव मोरे | Best Visarjan Marathi Caption 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
ओढ लागली तुझी देवा By श्री.नरेंद्र आनंदराव मोरे | Best Visarjan Marathi Caption 2023