काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी डॉ. मानसी पाटील यांची -सुटलेले कोडे – हि कविता -Visarjan Marathi Quotes- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
सुटलेले कोडे By डॉ. मानसी पाटील | Best Visarjan Marathi Quotes 2023
सुटलेले कोडे | Visarjan Marathi Quotes 2023

गणपती गेले गावाला गजर होता कानात
वेगळेच विचार चालू होते मात्र माझ्या मनात
गणपती मंडपात बसले होते उदास
एक कोडं पडलेलं उत्तर येत नव्हते मनास
डुलकी लागली बघता बघता
इतक्यात कोणी तरी आलं स्वप्नात
विचारले कोण आहे ?
‘मी गणपती ‘ आला आवाज कानात
पोहोचलो बरं का मी मुक्कामाला
पण काही गोष्टी पटत नाही माझ्या मनाला
काही सांगायचं आहे तुम्हाला ऐकाल ना?
सर्व करतो बाप्पा तुमच्याचसाठी मग सांगाना !
बोलू लागले गणपती नाराज होऊन थोडे
मग उलगडू लागले मला न सुटलेले कोडे
आलो होतो तुमच्याकडे थोडे दिवस आनंदासाठी
नका करू ती सजावट दिखाव्यासाठी
नका करू असा वेगळा खास देखावा
नका वाहू मला त्या सोन्याच्या दूर्वा
नको ते सोनेरी फूल नको तो झगमगाट
नको तो त्रास होणारा विजेचा चकचकाट
माझे साधेपण ,सात्विकता पार निघून जाते
डीजेच्या आवाजाने छाती दडपून जाते
झांजा घंटानाद शंखनाद पुरतो मला
अंगविक्षेप करत नाचणं आवडत नाही मला
उत्सवाचं सगळं पावित्र्यच निघून जाते
हताश होऊन बघण्याशिवाय माझ्याकडे काय असते
ज्या कारणासाठी उत्सव सुरू केला
त्यालाच आता पुरता हरताळ फासला गेला
घे तुझ्या बागेतील माती दे मला आकार
माझी गोल मटोल मूर्ती करायला त्रास नाही होणार
दे मला स्वच्छ पाट अन् स्थापना कर
आण फुलं दोन चार आणि छोटा दुर्वांचा हार कर
माझ्या साठी नको ओरबाडू झाडांची फुले हातोहात
माझ्या बरोबर तुझ्या आरोग्याची पण होईल वाताहात
दररोज साध्या गरम जेवणाचा प्रसाद दे मला
उत्तम आरोग्य राखायला तेच लागतं देहाला
तुझ्या ओंकार ध्वनीने होऊ दे पहाट तुझी
संध्याकाळी म्हण अथर्वशिर्ष कर आरती माझी
बघ पवित्र प्रसन्नता पसरेल मनामनात
माझे विसर्जन पण कर तुझ्याच घरात
विरघळेन मी पण छोट्याशा बादलीत
मग मला पसरव तुझ्या बगिच्याच्या मातीत
तिथेच मी थांबीन माझे लक्ष राहील तुझ्या घरात
तू अडचणीत सापडलीस तर येईन मी निमिषार्धात
खडबडून अशी जागा आली मला
पडलेले कोडे सुटले अचानक चला
बाप्पा म्हणाला ते खरेच आहे पटले मनाला
हेच ठसवून द्यायला हवे जनमानसाला
सुटलेले कोडे By डॉ. मानसी पाटील | Best Visarjan Marathi Quotes 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
सुटलेले कोडे By डॉ. मानसी पाटील | Best Visarjan Marathi Quotes 2023
वा! मानसी पाटील यांची कविता छानच..सद्यस्थितीवर भाष्य करणारी..आपला उपक्रम स्तुत्यच आहे..
शुभेच्छा!
छान काव्य रचना, अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा संदेश!