काव्यबंध या स्पर्धेसाठी कवी.दिपेश दिनेश रूके यांची -करतो स्वागत तुझे हे गणराया, विघ्न हर सर्वांचे हे विघ्नेश्वरा!!!- हि कविता -Visarjan Marathi Status – या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
करतो स्वागत तुझे हे गणराया, विघ्न हर सर्वांचे हे विघ्नेश्वरा!!! By कवी.दिपेश दिनेश रूके| Best Visarjan Marathi Status 2023
करतो स्वागत तुझे हे गणराया, विघ्न हर सर्वांचे हे विघ्नेश्वरा | Visarjan Marathi Status 2023

संपता श्रावण तुटला तो घागर,
मनाची घालमेल संपली ती आगमनाने…
वर्षा तरीही करी स्वागत तुझे हे गणराया,
हर्ष उल्हासित निर्मळ मनाने…
मोर नि प्राणीही ही नाचे थुई थुई,
बागडत लहान बाळासमान सर्वत्र बालमनाने…
जणू राजा धरतीचा आला पुन्हा,
या हिरव्यागार धरणीवरी स्व-इच्छेने…
आला हो राजा राण्यांसोबत,
गौऱ्यांसह होण्या सर्वांच्या मनी विराजमान…
चला मोदक लाडूचा नैवेद्य दाखवू,
करू भूपती प्रथमेश्वरास प्रसन्न…
शेवटी प्रफुल्लित मनानें करू बाप्पांस विसर्जन,
दहा दिवसीय आठवणींच्या आनंदाश्रू तून…
पण तरी मन राहील तरीही बैचेन,
सोडूनही महेश्वरांस त्यांच्या गावी कैलासाहून…
वाजतगाजत उडवलेल्या गुलाबाच्या धुराळात,
राहील आठवण गौरीसुता तुझ्या हसतमुखाची…
हारून विघ्न आमचे घेऊन गेलास विघ्नेश्वरा,
मंगल होवो सर्वांचे हा आशीर्वाद देऊन आम्हासी…
हे भालचंद्रा होतास तेव्हा तू,
आनंदात होते गावकरी अन् सर्वजण…
सोडता तू आम्हांस एकटे सोडून,
हळवे अन् एकटे पडलो आमचे करूनमन…
आई सोबत तान्हे ही,
आनंदी होती तुझ्या आगमनाने…
तुझ्या बालस्वरुप मुखाची,
आरती करत वक्रतुंडा हर्ष चित्ताने…
लवकर ये तू पुढच्या वर्षी हे बाप्पा,
फुगडी खेळत लपंडाव खेळू आपण सावलींचा…
उंदीर मामांही आठवण काढत आहेत आपल्या घरचे,
लपत छपत तुझा चोरला होता त्यांनी नैवेद्याचा…
हे चतुर्भुजा लवकर ये पुन्हा,
ललाहित झाले पुन्हा बालमन हे…
मुठभर फक्त रेतीची आहे आठवण,
फक्त वात संपेपर्यंत असेल तुझे चार पायी स्थान ते…
हे बुद्धिविधाता दे आम्हा सर्वांस बुध्दी,
हाऊंदेत आम्हा सर्वांकडून सदा सत्कर्म…
तुझ्या भक्तितील गरीमा राहील सर्वांमध्ये,
ना होवो कधी कोणाकडून दुष्कर्म…
सदा सुखी राहो दे हेच वरदान लंबोदरा,
जाती धर्माचा ना करो कोणी एकमेकांचा द्वेष…
तुझ्याच संस्कारांचे बीज राहो मनी सर्वांच्या,
तुझेच नाव राहो मनी हिच सदिच्छा अवनीश…
करतो स्वागत तुझे हे गणराया, विघ्न हर सर्वांचे हे विघ्नेश्वरा!!! By कवी.दिपेश दिनेश रूके| Best Visarjan Marathi Status 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
करतो स्वागत तुझे हे गणराया, विघ्न हर सर्वांचे हे विघ्नेश्वरा!!! By कवी.दिपेश दिनेश रूके| Best Visarjan Marathi Status 2023
Superb, Ganpati Bappa morya
Chaan Kavita Aahe 😍
गणपती बाप्पा मोरया अतिशय अप्रतिम कविता झालेली आहे 🙏🏻🌹🎊🎈🥁
अप्रतिम सार्थक वर्णन केले आहे कवितेमध्ये विघ्नहर्त्यांचे 👌👌🙏🙏