Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

पंढरीच्या विठूरायाची कथा | Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi Great 4 Kidsविठ्ठल हे विष्णूचे दशावतार आहे असे लोक मानतात. भक्तांसाठी असलेलं त्यांचं प्रेम तुम्हाला या Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi या कथेतून समजून येईल.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

Vitthal Story in Marathi

विठ्ठल ज्यालाच आपण सावळा विठ्ठल म्हणून संबोधतो. त्यालाच वारकरी संप्रदायाचा प्रमुख देवता मानतात. त्यांना विविध नावाने संबोधले जाते जसे की विठ्ठला ,पांडुरंगा,सावळ्या विठ्ठला,
विठ्ठल म्हणजेच विष्णूचे दुसरे अवतार असे देखील लोक म्हणतात. आपण नेहमीच त्यांना विटेवर उभे राहून कमरेवर हात ठेवून पाहतो, सोबत त्यांची अर्धांगिनी म्हणजेच रुक्माई असते. विठोबा हे महाराष्ट्रातील एक असे मराठा देवता आहे. यांना हिंदू लोक पूजतात.

हिंदू देवता स्वरूप विठोबा

विठ्ठल श्रीकृष्णाचा म्हणजेच व्यापार युगातील दुसरा अवतार असे मानले जाते .त्याचप्रमाणे दशावतारातील नववा अवतार अशी संकल्पना लोक करतात.
बोध्य आणि बोधराज या नावाने देखील विठ्ठलाला ओळखले जाते.

विठोबाचे वर्णन

गरुड पुराणामध्ये या गोष्टीचा अभ्यास केला ,तर असे आढळून आले आहेत की, बोध्य हा अति तेजस्वी आणि एक उत्कृष्ट प्रतिमा असलेले, अति तेजस्वी नेत्र असलेले, प्रखर शांतता ग्रहण केलेले, आपला भक्त पुंडलिक याच्यासाठी काळजावर दगड ठेवून उभा असलेला हा विठ्ठल असे त्याचे उत्कृष्ट वर्णन गरुड पुराणांमध्ये केले गेले आहे. विठ्ठल एक दोन वर्ष म्हणून नाही तर 28 युगे विठेवर भक्त पुंडलिकासाठी उभे आहे असे लोकांचे मान्यता आहे. आणि सावळ्या विठ्ठला सोबत त्यांची अर्धांगिनी रुक्माई ही नेहमीच पाहायला दिसते. जेव्हा विठ्ठलाची वारी निघते तेव्हा शेकडो भक्त जय नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करतात.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

विठ्ठल आणि फक्त पुंडलिक यांची कथा

विष्णूचे परमभक्त पुंडलिक नावाचे होऊन गेले ते स्वतः आई वडील आणि पत्नी सोबत राहत होते विष्णूची कठोर तपस्या ते करत होते. त्यांचे वडील जाणूदेव , आणि आई सत्यवती यांच्याबरोबर ते दिंडी वन नावाच्या जंगलात राहत होते. आई बाबांचा चांगला पुत्र म्हणून गावांमध्ये त्याची नेहमीच चर्चा होत होती त्यालाच सद्गुनी पुत्र असे देखील म्हणत होते, पण लग्न झाल्यानंतर त्याचा व्यवहार बदलला ,तो आई-वडिलांशी योग्य रीतीने व्यवहार करीत नव्हता. लग्न झाल्यानंतर पुंडलिका बदलता व्यवहार पाहून आई-वडील कंटाळले त्याला त्रास देत आणि त्यांना दुःखाची यातनेची जाणीव होऊ लागली.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

_______________________

वाचा कोण होती देवी एकादशी :- Ashadhi Ekadashi 2023

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi 2023

_______________________

मुलाच्या वागणुकीला कंटाळून ते काशीला जायला निघाले. मुलाचा बदलता व्यवहार पाहून पत्नी देखील त्रासली होते आई-बाबा हे मुलाच्या त्रासाने काशीला निघाले हे तिला समजताच ते देखील काशीला जायला निघाली. पती पत्नी आणि आई वडील हे तिघेही निघाले वाटेवर ते एका आश्रमाजवळ थांबले. ते आश्रम कुक्कुट स्वामी या ऋषीचे होते. त्या आश्रमामध्ये जाऊन थांबण्याचा त्याने निर्णय घेतला आणि तिथे जाऊन त्या आश्रमात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या आश्रमामध्ये पुंडलिक सकाळी स्नान करून बसून होते तेव्हाच तिथे तीन स्त्री आल्या , आणि संपूर्ण आश्रमाला पाण्याने स्वच्छ करू लागल्या पुंडलिक विचार करीत होता की या कोणाचे असे दोन ते तीन दिवस सतत चालला स्त्रिया समोर जाऊन अदृश्य होत होत्या

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

त्या स्त्रियांना जाणण्यासाठी पुंडलिक ऋषी जवळ गेले आणि त्यांना आतुरतेने विचारू लागले की या तीन स्त्रिया कोण होत्या रेषेने सांगितले की त्या तीन स्त्रिया म्हणजे गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या होत्या. असे त्या स्वामिनी सांगितले मग कुंडलिकाने त्यांना प्रश्न विचारला की , रोज सकाळी येऊन आश्रम का स्वच्छ करीत आहे? तर त्यांनी त्यांना हसत उत्तर दिलं, तू तुझ्या आई-वडिलांशी वाईट वागणुकीने वागतो त्यांना यातना देतो ,त्रास देतो त्यामुळे त्यांना असं वाटतं की तु आल्याने आश्रम अपवित्र झालं म्हणून ,ते येतात आणि स्वतःच्या पाण्याने आश्रमाला पवित्र करतात.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

पुंडलिकाला त्याची चूक समजली आणि नंतर त्याने आई वडिलांशी चांगल्या वागणुकीने राहण्याच वचन दिलं, हे विष्णूचे खूप मोठे भक्त होते त्यामुळे देवाची पूजा थांबवून ते आई-वडिलांची पूजा करू लागले. नेहमीच आई-बाबांची सेवा करू लागले ते सेवेमध्ये इतके मग्न होत होते की त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची कल्पना राहत नव्हती. अशाप्रकारे भक्त पुंडलिकामध्ये बदल झाला आणि ते एक आज्ञाधारी पुत्र म्हणून ओळखला जाऊ लागले.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

एकदा पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता. त्याच वेळेला भगवान विष्णू आणि रुक्मिणी त्यांच्या कक्षेत असताना त्यांना मथुरेची आठवण झाली. त्यांना राधा आठवले आणि त्या गोपी या गोष्टीचा उल्लेख करतात रुक्मिणीला राग आला आणि ती रागाने निघून गेली विष्णू त्यांच्या शोधामध्ये सर्वप्रथम मथुरेला गेले. आणि नंतर रुक्मिणीच्या शोधात ते गोकुळला गेले.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

रुक्मिणीचा शोध घेता घेता ते शेवटी भीमा म्हणजेच जिला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. त्या तीरावर आले रुक्मिणी तिथे त्यांना सापडली आणि तिचा राग शांत करण्यासाठी त्यांनी तिला पुंडलिकेच्या आश्रमामध्ये नेले. पण त्या वेळेला पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता, त्याला माहिती होते की भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूची अवतार हे त्याला भेटण्यासाठी आले आहे. तरीसुद्धा त्यांनी दरवाजासमोर तिथे जाग्यावर पडलेली वीट उचलून दाराजवळ फेकले आणि त्यांना म्हटले की ,तुम्ही या विटेवर उभे रहा मी आई-वडिलांची सेवा झाल्याशिवाय तुम्हाला भेटू शकत नाही.

आई वडिलांची सेवा करून झाल्यानंतर भक्त पुंडलिकाने विठोबा रायाची क्षमा मागितली आणि त्यांना म्हटले की, भक्तांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला विटेवरच उभं राहावं लागेल. तेव्हापासून भगवान विष्णू हे विठ्ठलाच्या अवतारामध्ये विटेवर उभे राहताना आपल्याला नेहमी दिसतात.

Vitthal Rukmini Pandharpur Story in Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

प्रतीक्षा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
27 − 14 =