navratri baby boy photoshoot

लहान मुलांचे फोटोशूट खूपच सुंदर पद्धतीने आपण करू शकतो. मी आज तुम्हाला नवरात्रीचे फोटो शूट कसे करायचे ते सांगणार आहे.

त्यासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे आहे  १. नवरात्रीचा ड्रेस/ घागरा चोळी/ संपूर्ण पांढरा ड्रेस  २. दांडिया   ३. मल्टी कलर दुपट्टा /वेगवेगळ्या कलरच्या ओढण्या   ४. सजावटीसाठी साहित्य

सर्वात प्रथम आपण खाली सरफेस वर एक शुभ्र पांढरा कपडा ठेवणार आहोत आणि सर्व डेकोरेशन याच कपड्यावर करणार आहोत. पांढरा कपड्यावर सर्व कलर खूपच उठून दिसतात त्यामुळे आपण पांढरा कपडा वापरणार आहोत.

मी या ठिकाणी पांढरा सँटिन चा कपडा वापरत आहे तुम्हाला जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता.

सगळ्या ओढण्यांमध्ये एक ओढणी जी डार्क असेल आणि थोडी चमकणारी असेल तर ती ओढणी आपण ज्या प्रकारे तोरण बांधतो त्या पद्धतीने ठेवणार आहोत आणि तिच्या बाजूने दोन सेम कलरच्या ओढण्या माळ सोडल्याप्रमाणे सोडणार आहोत.

अशाच पद्धतीने आपण तोरण बनवलेल्या ओढणीच्या बाजूला प्रत्येकी दोन दोन ओढण्या सोडणार आहोत

या ठिकाणी आपला वरचा पार्ट कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर आपण जिथे आपली ओढणी संपते त्या ठिकाणी दुसर्या एका ओढणीने डिझाईन करणार आहोत.

अशा पद्धतीने आपला ओढणीचा पार्ट कम्प्लीट होईल.त्यानंतर आपण दांडिया ठेवणार आहोत आणि डेकोरेशन करून आपला आपली पहिली थीम तयार आहे.

या ठिकाणी तुम्ही तुमच्या बाळाला झोपू शकता किंवा बाळाचा बसून देखील फोटो  किंवा व्हिडिओ काढू शकता.

Follow My Youtube Channel For Amazing Videos