Categories: लेख

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे ? डिमॅट खाते म्हणजे काय ?

आपण मागील काही वर्षांमध्ये वारंवार ‘डिमॅट खाते’ हा शब्द ऐकलाच असेल.डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? त्या बद्दल आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल. या पोस्ट मध्ये आपण हे समजून घेऊ या . डिमॅट अकाउंट ओपन कसे करावे ?

डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
हे अकाउंट कसे खोलावे?
डिमॅट अकाउंट चे प्रकार किती आहेत ? आणि कोणते आहेत?
डिमॅट खाते उघडण्यासाठी किती शेअर्स (shares) घ्यावे लागतात?
डिमॅट अकाउंटचे फायदे. डिमॅट अकाउंटचा अहवाल हा कसा घ्यावा?
अशा सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळून जातील. तर सुरु करूया. डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? डिमॅट अकाउंट डिमॅट खाते म्हणजे काय

Demat अकाउंटची संपूर्ण माहिती :

डिमॅट हे एका प्रकारचे बँक खाते आहे . ज्यामध्ये आपले शेअर्स सर्टिफिकेट्स आणि इतर सेक्युरीटीज् (securities) इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये सुरक्षित असतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक शेअर ठेवण्याच्या सुविधेस डिमॅट असे म्हणतात. डिमॅट खाते हे शेअर मार्केट मध्ये खरेदी – विक्री साठीचे शेअर्स, बॉन्ड्स, विमा , सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड्स,आणि ईटीएफ सारख्या गुंतवणूकीची प्रक्रिया सुलभ करते. याच बरोबर आपल्या शेअर्स चे कागद आणि संबंधित कागदपत्रे हाताळण्याची आणि त्याची देखभाल करण्याच्या अडचणी डिमॅट अकाउंट दूर करते .

डिमॅट म्हणजे “DEMATERIALLISATION”. डिमॅट हा Dmateriallisation याचा शॉर्ट फॉर्म आहे.

डीमॅटचे पूर्ण नाव “Dematerialize” असे आहे. सिक्युरिटीज म्हणजेच शेअर्स याचे रूपांतर भौतिक स्वरूपात करण्याच्या प्रक्रियेस डीमटेरियलायझेशन असे म्हणतात.

डिमॅट अकाउंट कसे काम करते :

डिमॅट खात्याचा अर्थ मराठी मध्ये समजून घेण्यासाठी, एक उदाहरण समजून घेऊ.

समजा, आपण “X” या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छिता . आपण हे शेअर्स जेव्हा खरेदी करतो , तेव्हा ते आपल्या नावे काही क्षणामध्ये ट्रान्सफर होतात .तुम्हाला माहीतच असेल कि कंपनीची शेअर्स ची मालकी शेअर सर्टिफिकेट मध्ये असते. पूर्वीच्या काळी तुमच्या नावावर एक्सचेंजकडून शारिरीक शेअर्सची सर्टिफिकेट मिळायची.आता आपण कल्पना करू शकतो , आपण घेतलेल्या शेअर्स ची हजारो कागदपत्रे आपल्याला हाताळावे लागायचे.प्रत्येक वेळी एखादा शेअर खरेदी करुन विकला जात असता की लगेच Certificate तयार करावे लागायचे.
व्यवहार झाल्याच्या प्रत्येक नोंदी कराव्या लागत असे . ही सगळी कागदपत्रांची कटकट दूर करण्यासाठी भारताने १९९६ मध्ये NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) मधील व्यापारासाठी डिमॅट खाते प्रणाली सुरू केली. डिमॅट अकाउंट डिमॅट खाते म्हणजे काय

डिमॅट अकाउंट ओपन कसे करावे :

डीमॅट खाते काय आहे हे आपल्याला माहित झाले आहे .जेव्हा आपण डीमॅट खाते उघडता तेव्हा केंद्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीएसडीएल) या सारख्या सेंट्रल डिपॉझिटरीसह एखादे खाते उघडत असतात. या डिपॉझिटरीज एका एजन्ट ची नेमणूक करतात. जे स्वतः आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून काम करत असतात. उदा. एचडीएफसी बँक आपली डीपी आहे आणि त्याद्वारे आपण डिमॅट खाते उघडू शकतो . स्टॉक ब्रोकर आणि वित्तीय संस्था देखील डीपी आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर डीमॅट खाते उघडू शकतो .

डिपॉझिटरी (डीपी) सहभागी निवडा:

नोंदणी फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सबमिट करा.हे खाते उघडण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. आपल्याला सत्यापनाच्या बाबतीत मूळ कागदपत्रांसह सज्ज असणे खूप आवश्यक आहे.अटी व नियम काळजीपूर्वक वाचा. तसेच, आपल्यावरील शुल्क तपासून घ्या .अर्ज फॉर्मवर प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याकडे आपला खाते क्रमांक आणि यूआयडी असेल.आपल्याला खात्यावर ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी हे तपशील वापरता येतात . वार्षिक देखभाल आणि व्यवहार शुल्कासारखे खाते शुल्क आपल्याला द्यावे लागेल.वेगवेगळ्या डीपींसाठी हे शुल्क वेगवेगळे आहे. तुम्ही Angel Broking चा वापर करून अगदी मोफत स्वरूपात हे अकाउंट सुरु करू शकता.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी पैसे किती लागतात?

आपण जर असा विचार करत असाल की आपल्याला डीमॅट खाते उघडण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील . तर आपण चुकीचा विचार करत आहात.आपण फक्त ३०० ते ७०० रुपया मध्ये डिमॅट खाते उघडू शकता . तसेच शेअर्स मध्ये गुंतवणूकही सुरू करू शकता.डीमॅट खाते उघडण्यासाठी फक्त ३०० रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करावा लागेल. परंतु Demat खाते चालविण्यासाठी डीपी (DP) जे आहेत ते तुम्हाला विविध फी आकारतात.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांची स्वतंत्र फी असते. ही फी कंपनीनुसार बदलूही शकते.डिमॅट अकाउंट डिमॅट खाते म्हणजे काय

यात प्रथम शुल्क आकारले जाते ते आहे खाते उघडण्याची फी . कंपनी ही फी अगदी सुरवातीला घेते आणि वर्षभर खाते manage करते.कस्टोडियन (Custodian) फी आपल्या शेअर्सच्या संख्येवर अवलंबून असते . एकतर कंपनी ते एकाच वेळी किंवा दर महिन्याला घेते . फी घेण्याचा कालावधी कंपनीवर अवलंबून असतो.Transaction fees चा अर्थ असा की जेव्हा दोन डिमॅट खात्यात शेअर्स ची देवाण-घेवाण होते , तेव्हा कंपनी त्यासाठी फी घेते. ही फी शेअर्सच्या संख्येनुसार किंवा त्यांच्या किंमतीनुसार असू शकते.

डिमॅट अकाउंट खात्यांचे प्रकार :

प्रामुख्याने तीन प्रकार आहेत

नियमित डिमॅट खाते : हे भारत देशात राहणार्‍या नागरिकांसाठी आहे.
प्रत्यावर्ती डिमॅट खाते : या प्रकारचे डीमॅट खाते अनिवासी भारतीय (एनआरआय) साठी आहे. यामुळे परदेशात पैसे हस्तांतरित करता येतात.
तसेच या प्रकारच्या डीमॅट खात्यास एनआरई बँक खात्यासह लिंक करण्याची आवश्यकता आहे.
नॉन-प्रत्यावर्ती डीमॅट खाते : हे अनिवासी भारतीयांसाठी आहे, परंतु या प्रकारच्या डीमॅट खात्यामध्ये परदेशात निधी हस्तांतरण करणे शक्य नाही.
तसेच, त्याला एनआरओ बँक खात्याशी जोडलेले असावे .

डिमॅट अकाउंटचे फायदे :

यामुळे फिसिकल सर्टिफिकेट हँडलिंग बंद झाली आहे . हे ऑपरेट करणे खूप सोयीचे आणि सोपे झाले आहे.व्यवहार देखील पेपरलेस असतात.फिसिकल सर्टिफिकेट हँडलिंग बंद झाल्यामुळे कागदपत्रे चोरीला जाण्याचा कोणताही धोका नसतो.शेअरचे सर्टिफिकेट्स खराब होण्याचा किंवा हरवण्याचा कोणताही धोका नाही.तुमचे शेअर सर्टिफिकेट इलेकट्रोनिक फॉर्म मध्ये डिमॅट खात्यामध्ये असल्यामुळे ते कोणीही कॉपी करून त्याबद्दल तुमची फसवणूक करू शकत नाही.डिमॅट अकाउंट डिमॅट खाते म्हणजे काय

बँक व्यवहारांमध्ये जसे प्रत्येक डेबिट आणि क्रेडिट ची नोंद होते. तसेच या अकाउंट मध्ये सुद्धा प्रत्येक शेअर ची खरेदी विक्री ची नोंद होत असते. या अकाउंट मुळे तुम्ही स्वतःचे शेअर तारण ठेवून कर्ज देखील काढण्याची सुविधा डिमॅट अकाउंट मध्ये उपलब्ध केलीली आहे.फक्त शेअर्स च नाही तर, डिमॅट खाती शेअर्स, बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड्स, विमा आणि ईटीएफ सारख्या गुंतवणूकीची प्रक्रिया देखील सुलभ करते.डिमॅट अकाउंट मुळे तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही क्षणी मोबाईल, टॅब, आणि Computer द्वारे आपले शेअर्स विकू कतात किंवा आणखी शेअर्स खरेदी करू शकतात.शून्य शेअर्स असताना सुद्धा तुमचे डिमॅट अकाउंट तुम्ही ओपन करू शकता .या अकाउंट ला कोणतही लिमिटेशन नाही. कोणत्याही एका कंपनीचा एक शेअर सुद्धा तुम्ही डिमॅट अकाउंट मध्ये दीर्घ काळ ठेवू शकतात.

डिमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

वोटर कार्ड ,पासपोर्ट ,ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड,रेशन कार्ड ,फोन बिल,वीज बिल. डिमॅट अकाउंट डिमॅट खाते म्हणजे काय

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago