Categories: लेख

Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशी | मृदुमान्य राक्षस कोण होता ?

आषाढी एकादशीच्या व्रताला सर्व व्रतांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या वर्षांमध्ये आषाढी एकादशी ही २९ जुन २०२३ या दिवशी आली आहे.
आषाढी एकादशी कधी आहे ? Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशी 2023 what is ashadhi ekadashi ?

आषाढी एकादशी मुहूर्त

ह्या वेळी उपवास सोडा : 30 जून रोजी दुपारी 1 वाजून 48 मिनिटे 15 सेकंद ते सायंकाळी ४ वाजून 35 मिनिटे 37 सेकंद
कालावधी : 2 तास 47 मिनिट
हरी वासरा समाप्ती : 30 जून सकाळी 08 वाजून 22 मिनिटे 14 सेकंद

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत पंढरपूर येथे येतात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात.पंढरपूरचा विठोबा (पांडुरंग) हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. आषाढी एकदशीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.आषाढी एकादशी या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची,तर पैठणहून संत एकनाथांची, आणि उत्तर भारतातून कबिर यांच्या पालख्या येतात . विठ्ठलाचा नामघोष करत लाखो वारकरी दिंडी मधून पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.हा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो.

आषाढी एकादशी कधी आहे ? Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशी 2023 what is ashadhi ekadashi ?

आषाढी एकादशी वारी

या एकादशी दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे. तसेच या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो. तो चातुर्मास कार्तिकी एकादशीला संपतो.या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात . आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी)असे मानले जाते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे असा समज आहे. त्यामुळेच या व्रताला अत्यंत महत्त्व आहे. वैकुंठभूमीच्या अगोदर पासूनच पंढरपूर अस्तित्वात आले .
असा येथील लोकांचा समज आहेत. म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन (जुन्या )अशा तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे .
दरवर्षी आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरमध्ये जातात. ही पंरपरा ८०० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते .

आषाढी एकादशी कधी आहे ? Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशी 2023 what is ashadhi ekadashi ?

पंढरपूरचे देवालय व विठ्ठल -रुक्मिणी यांच्या प्रतिमा अत्यंत पुरातन आहे. अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी करण्यात आली आहे . शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या मंदिराचा इ.स. ८३ मध्ये जीर्णोद्धार केला.ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले गाव (ग्राम) असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या ठिकाणी भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली. तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा सुरु केली .

चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून (नदीकाठच्या वाळूचे मैदान) सपाट कौलारू छपरे, उंच शिखरे,धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल-रखुमाई व पुंडलिक महाराज मंदिरांची
उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा खूपच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे मंदिर एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मी. रुंद व १०६ मी. लांब अशी ही जागा आहे.सभोवार अरुंद रस्ते आहेत. पूर्व दिशेला तीन द्वार, उत्तरेकडे तीन द्वार तसेच दक्षिण व पश्चिम या दिशेला प्रत्येकी एक-एक द्वार आहे. मंदिराचे महाद्वार पूर्वेकडे आहे.अकरा पायर्‍या चढून गेल्यावर त्यांतील एका पायरीला ‘नामदेवाची पायरी’ असे म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपतीची मूर्ती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर कमानी,वेकपत्ती ,सिंह यांचे नक्षीकाम आहे.

आषाढी एकादशी कधी आहे ? Ashadhi Ekadashi 2023 | आषाढी एकादशी 2023 what is ashadhi ekadashi ?

व्रत कथा:

भगवान श्री शंकर यांनी प्रसंन्न होऊन मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असे वरदान दिले होते . या वरामुळे मृदुमान्य राक्षस खूप उन्मत्त झाला .त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा विश्वास मनात ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी भगवान श्री शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला.पण वरदान दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीच करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली. आणि त्या देवीने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.राक्षस मरेपर्यंत सगळे देव एका गुहेत लपून राहिल्याने त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता.या देवीचे नाव होते एकादशी . त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याची प्रथा पडली. शास्त्र आणि वेद यानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी या देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असाही समज आहे. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

आषाढी एकादशीचे व्रत असे करावे:

भगवान श्री विठ्ठल हे श्री विष्णूचा अवतार समजण्यात येतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा पूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत-करत जागरण करावे.विठ्ठल नामाचा जयघोष करत पूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा.यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती तसेच विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि पारणं सोडावं.या दोन्हीही दिवशी श्री विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा तेवत ठेवावा .

वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय म्हणून ओळखला जातो . या संप्रदायात वार्षिक, सहामाही जशी दीक्षा घेण्यात आली आहे .तशा स्वरूपात वारी काढण्यात येते. पण ही वारी पायी केली तर शारीरिक तप घडते. म्हणूनच अत्यंत मनोभावे हे एकादशीचे व्रत केले जाते.

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉगवर जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago